या राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण

 या राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण

प्रेम करण्याचा प्रत्येकाचा अंदाज वेगळा असतो. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत फार वेगळी असते. काही व्यक्ती प्रेमात फार फिल्मी असतात. काही प्रॅक्टिकल.. तर काहींना प्रेमात पाडणे हे फारच अशक्य असते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही लोकांबद्दल ज्यांना प्रेमात पाडणे फारच कठीण असते. आता अशी लोक ओळखायची कशी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर काही ठराविक राशीचे लोकच असे असतात. ज्यांना प्रेमात पाडणे कठीण असते. तुम्ही ही कोणाला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करत असाल पण प्रेमात सहज पडत नसतील तर ते कदाचित या राशीचे लोक असू शकतात. जाणून घेऊया या राशींबद्दल

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

कर्क (Cancer)

shutterstock

कर्क राशीचे लोक हळवे असतात त्यांना पटकन कोणत्याही गोष्टीवर रडू येऊ शकते हे जरी 100 टक्के खरं असलं तरी प्रेमाच्या बाबतीत मात्र या राशीच्या व्यक्ती फारच सतर्क असतात. म्हणजे यांना पुढे होणारा ब्रेकअप किंवा वाट्याला येणारे दु:ख नको असते. त्यामुळे या राशीचे लोक प्रेमात पटकन पडत नाही. आता ही लोक हळवी असली तरी ते त्यांचं खरं करणारी असतात. त्यांना सगळ्यात जास्त स्वत:वर प्रेम करायला आवडते. त्यामुळे ते सहज कोणावरही प्रेम करत नाहीत. 

वृश्चिक (Scorpio)

shutterstock

विंचूचे चिन्ह असलेली ही रास प्रेमाच्या बाबतीत जरा कठीणच असते. वृश्चिक राशीचे लोक कमालीचे लहरी असतात. एका क्षणाला ते आकंठ प्रेमात बुडालेले असतात तर दुसऱ्या क्षणाला ते त्यालाच कधी ओरडतात ते त्यांना कळत नाही. त्यांचा राग आणि प्रेम एकत्रच त्यांच्यासोबत असते. ते इतके वेंधळे असतात की, लोकांना पहिल्याच भेटीत ते आवडतील असे होत नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे ते कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही. जर तुम्हाला वृश्चिक राशीच्या व्यक्तिला प्रेमात पाडायचे असेल तर तुम्हाला ते सिद्ध करावे लागते.

मकर (Capricon)

shutterstock

मकर राशींच्या लोकांच्या अपेक्षा फारच मोठ्या असतात. त्यामुळे ते प्रेमात पटकन पडत नाही. अशा व्यक्ती त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीमध्ये सगळे काही शोधण्याचा प्रयत्न करते. जर ते प्रेमात पडले आणि त्यांना एखादी गोष्ट खटकली की मग त्या नात्याचा अत्यंत वाईट असा शेवट ते करतात. स्वत:कडे काय हे पाहण्यापेक्षा ते समोरच्या व्यक्तीकडे काय ते पाहात बसतात आणि त्यामुळेच त्यांना प्रेमात पाडणे आणि त्यांच्यासोबत नात्यात राहणे थोडे कठीण असते.

धनु (Saggitarius)

shutterstock

धनु राशीचे लोक प्रेमात पडायला थोडा वेळ घेतात. पण जर प्रेमात ते असतील आणि ते नाते तुटले तर ते स्वत: ला कायम त्यासाठी दोष देत राहतात. त्यांच्याकडून काय चुका झाल्या ते त्यांना कळत नाही. त्या चुकांमधून सधारण्यासारखे भरपूर काही असते. पण ते त्यातून काहीच शिकत नाही. उलट ते कायम त्यांच्या अपेक्षा जास्त ठेवतात.ज्याच्या इतरांना त्रास होतो. त्यांच्या या स्वभावामुळे ते पटकन प्रेमात पडायचा विचार करत नाही. 

जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग

वृषभ ( Tarus)

shutterstock

वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या भावना कधीही नियंत्रणात ठेवता येत नाही. त्यामुळे ते खूप वेळा समोच्यांना दुखावतात. पण ते त्यांना कळत नाही. वृषभ राशीच्या लोकांना प्रेमात पाडणे कठीण असते याचे कारण असे ते इतरांच्या सांगण्यात पटकन येतात. त्यामुळे त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवत नाही. पण एकदा त्यांच्या मनाला ही गोष्ट पटली की, मग ते त्या व्यक्तीवर मरेपर्यंत प्रेम करतात. 


जर तुमचा जोडीदारही या राशीचा असेल आणि त्याचे वागणेही तुम्हाला विचित्र पाटत असेल तर त्यासाठी त्यांची रास जबाबदार आहे हे कायम लक्षात ठेवा. 

 

 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/