ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
शरीरात विटामिन सी ची असेल कमतरता, नियमित प्या हे ज्युस

शरीरात विटामिन सी ची असेल कमतरता, नियमित प्या हे ज्युस

 

विटामिन सी (Vitamin C) अप्रतिम त्वचा आणि केसांसाठी एक महत्त्वाचा हिस्सा आहे. विटामिन सी कमी अथवा अधिक असण्याच्या तक्रारी आपण सगळेच ऐकत असतो. विटामिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी अनेक औषध घेत असतात. पण यामुळे इतर शरीराचं नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना येत नाही. मग अशावेळी नक्की काय करायचं? त्वचा चांगली राहण्यासाठी विटामिन सी ची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्हाला त्वचा निरोगी ठेवायची असेल तर विटामिन सी ची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्की कोणत्या गोष्टीमध्ये जास्त विटामिन सी आहे आणि कोणते ज्युस करून प्यायलाने शरीराला विटामिन सी योग्य प्रमाणात मिळेल हे आपण बघणार आहोत. त्याआधी आपण जाणून घेऊया विटामिन सी आपल्याला नक्की कोणकोणत्या पदार्थांमधून मिळतं आणि त्याचा काय उपयोग आहे ते बघूया.

विटामिन सी युक्त पदार्थांचा उपयोग

Shutterstock

 

विटामिन सी म्हणजे ज्यामध्ये आंबटपणा आणि हिरव्या भाज्यांचा पोषकपणा जास्त प्रमाणात आढळतो असे पदार्थ अथवा फळं. हाडांंसह आपल्या शरीरातील आयरनची काळजीदेखील विटामिन सी मुळे घेतली जाते. पण त्वचेत कोलेजन निर्माण करण्यासाठी याचा जास्त हातभार लागतो. त्याचबरोबर विटामिस सी त्वचेची गुणवत्ता सुधारून त्वचा अधिक नितळ बनवते. विटामिन सी च्या पदार्थांचा आपल्या आहारात जास्त प्रमाणात समावेश करून घ्यायला हवा. कारण शरीरात विटामिन सी बनवलं जात नाही तर शरीरासाठी लागणारं हे विटामिन सी आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचे ज्युस समाविष्ट करून आपण याचा आपल्या शरीरासाठी उपयोग करून घेऊ शकतो. लिंबू, संत्र यासारख्या फळांमध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी सापडतं. आता पाहूया आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्युस बनवून शरीरासाठी विटामिन सी मिळवता येते. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

ADVERTISEMENT

विटामिन सी साठी उपयुक्त ज्युस

1. मिंट किवी लेमोनेड

Shutterstock

 

हे एक अतिशय रिफ्रेशिंग असं ज्युस आहे. ज्यामध्ये लिंबू आणि किवी या दोन्ही फळांचा स्वाद एकत्र करण्यात येतो. तुम्ही हे ज्युस 15 मिनिट्समध्ये तयार करून देऊ शकता. त्याशिवाय यामध्ये 60 टक्के विटामिन सी असतं. यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही आंबादेखील मिक्स करू शकता. 

रेसिपी – पाण्यात साखर घालून ती वितळेपर्यंत उकळवा. किवीचा पल्प काढून त्यात लिंबाचा रस मिक्स करा. त्यात पुदिन्याचा सिरप मिक्स करा. हे सर्व मिश्रण एकत्र नीट ढवळा आणि फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. नंतर ग्लासात बर्फ घाला आणि मग हे ज्युस सर्व्ह करा. यातून तुम्हाला विटामिन सी मिळेल. 

‘या’ गोष्टी ज्या वाढवतील तुमची प्रतिकारशक्ती आणि ठेवतील तुम्हाला एकदम फिट!

ADVERTISEMENT

2. संत्र आणि आल्याचा ज्युस

Shutterstock

 

आपल्या आहारातून विटामिन सी मिळवण्यासाठी सर्वात उत्तम फळ म्हणजे संत्र. IOM नुसार 100 ग्रॅम संत्र्यामधून साधारण 64 टक्के विटामिन सी मिळतं. तुम्हाला अधिक चांगला ज्युस बनवायचा असेल तर यात आलं मिक्स करून तुम्ही हा ज्युस तयार करू शकता. तुम्हाला हवं तर यात हळद मिक्स करा. आरोग्यासाठी संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत, अँटिऑक्सिडंट म्हणून संत्र्यांचा फायदा होतो.

रेसिपी – संत्र आणि गाजराचा वेगवेगळा रस काढून घ्या. दोन्ही रस ब्लेंडरमध्ये घालून त्यात चिमूटभर हळद आणि आल्याचा किस घाला. 30 सेकंद ब्लेंड करा आणि त्यात नंतर लिंबाचा रस पिळून घ्या.  हे डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला उत्तम विटामिन सी मिळवून देईल. 

डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

ADVERTISEMENT

3. अननसाचं पन्हं

Shutterstock

 

अननसामधूनही शरीराला विटामिन सी मिळतं. अननस हे नेहमीच आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगलं आणि उपयुक्त फळ ठरतं. याचा स्वाद अप्रतिम असतो. 

रेसिपी – अननसाची प्युरी काढून त्यात लिंबाचा रस, जिरे पावडर आणि थोडंसं काळं मीठ घाला. ड्रिंक तयार. तुम्हाला हवं असल्यास, यात तुम्ही बर्फ घालून प्या. अननस आणि यात मिक्स केलेल्या जिरे पावडरचा स्वाद तुम्हाला अधिक रिफ्रेश करेल.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. 

ADVERTISEMENT

You Might Like These :

केस आणि त्वचेवर होणारे ‘व्हिटॅमिन ई’ चे फायदे

व्हिटॅमिन बी 6 चे फायदे (Benefits of Vitamin B6 In Marathi)

कोकम सरबत पिण्याचे फायदे (Kokam Sharbat Benefits In Marathi)

ADVERTISEMENT
29 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT