ब्रेकअप (Breakup) नक्की का होतं, 'ही' आहेत महत्त्वाची कारणं

ब्रेकअप (Breakup) नक्की का होतं, 'ही' आहेत महत्त्वाची कारणं

कोणतीही व्यक्ती प्रेमात असल्यावर खूपच आनंदी असते आणि सर्वात जास्त दुःख होतं ते ब्रेकअप (break up) झाल्यावर.  आपण एकत्र घालवलेले क्षण, आनंदी क्षण हे सगळं आठवून आठवून दुःख अधिक वाढतं. कोणालाही आपल्या नात्यात ब्रेकअप आणि दुरावा नको असतो. पण कधीतरी अशी वेळ येते की, दोन व्यक्तींचं पटत नाही आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊन ब्रेकअप होतं. पण ब्रेकअप नक्की का झालं किंवा याची नक्की कारणं काय आहेत हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येकाचं ब्रेकअप होण्याचं कारण वेगळं जरी असलं तरी त्याची मूळ कारणं मात्र समानच असतात. आपण या लेखातून नक्की काय कारणं आहेत हे जाणून घेणार आहोत. खरं तर नात्यात असातना दोन व्यक्ती एकमेकांशी इतक्या जोडल्या जातात की, त्यांच्यासाठी वेगळं होणं अत्यंत कठीण असतं. पण बऱ्याचदा असं होतं की, दोघेही एकमेकांच्या सवयी आणि वागण्यावरून भांडण करतात. अशा परिस्थितीत एकमेकांबरोबर राहणं अशक्य असतं. असं नातं पुढे नेणं नक्कीच योग्य नसतं. त्यामुळे योग्य वेळी ब्रेकअप करणं योग्य ठरतं. बऱ्याचदा दोघांपैकी एका जोडीदाराकडून नात्यामध्ये योग्य रूची न दाखवल्यामुळेही नातं टिकत नाही. पण अशी काही महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे ब्रेकअप होतं. पाहूया काय आहेत ही कारणं - 

1. प्रत्येक बाबतीत टोमणे मारणं

Shutterstock

आपल्या जोडीदाराला ताणे मारणं अथवा आपल्या जोडीदाराने आपल्याला सतत टोमणे मारणं हे नात्यात सर्वात मोठा दुरावा निर्माण करू शकते. विशेषतः जोडीदाराची चूक असताना सतत त्याला त्याच गोष्टीबद्दल ऐकवत राहणे हे नात्यातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. तुमचा जोडीदार जर सहनशक्तीच्या बाबतीत चांगला असेल तर कदाचित हे नातं टिकू शकतं पण तरीही त्याला सतत अशा तऱ्हेने बोलणं योग्य नाही. त्याने केलेली चूक सतत त्याला ऐकवून दाखवू नये. कोणत्याही ठिकाणी सतत त्याचा पाणउतारा करणं हे ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. एका विशिष्ट मर्यादेनंतर नात्यामध्ये सहनशक्तीचा अंत होत असतो. हा अंत झाला की, ब्रेकअप होते. 

वाचा - ब्रेकअपच्या 5 पायऱ्या

2. जुन्या गोष्टी सतत उगाळणं

Shutterstock

तुमच्या जोडीदाराने भूतकाळात अशा काही चुका केल्या असतील ज्या करणं योग्य नव्हतं. पण सतत जोडीदाराला त्याच त्याच गोष्टींनी टोचत राहणं हे तुमच्या नात्यासाठी खूपच त्रासदायक ठरू शकतं. सतत तुम्ही या चुकांबद्दल जोडीदाराला बोलर राहिलात तर त्याला हे नक्कीच आवडणार नाही आणि एखाद्या दिवशी त्याच्या सहनशक्तीचा बांध फुटून तुमच्यापासून दूर निघून जाईल. तुमच्या नात्यात यामुळे अधिक दुरावा येईल आणि त्यामुळे ब्रेकअप होतं. एकदा केलेली चूक तुम्हाला मान्य नसेल तर तेव्हाच नातं तोडा अन्यथा पुढे तेच नातं नेऊन तुमच्यात भांडणं होऊन अधिक त्रास होऊन ब्रेकअप करणं त्रासदायक ठरेल. 

१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी

3. दोघांमधील संवाद कमी होणं

Shutterstock

तुम्ही जर तुमच्या जोडीदाला सगळ्या गोष्टी सांगत नसाल तर त्यानेही आपल्याला सगळ्या गोष्टी सांगायलाच हव्यात हा अट्टाहास तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. वास्तविक सर्व गोष्टींवर दोघांनीही विश्वास ठेवून शांत डोक्याने चर्चा करायला हवी. किमान एकमेकांसह संवाद साधणं आवश्यक आहे. पण एकमेकांमध्ये संवाद नसेल तर त्याचा सर्वात मोठा होतो तो नात्यावर. तसंच आपल्या जोडीदाराने सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंही ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही ही गोष्ट करू शकता. अन्यथा जोडीदारालाही त्याचं वाईट वाटेल आणि नात्यात दुरावा येईल. 

योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर

4. एक्सबद्दल बोलणं आणि तुलना करणं

तुम्ही सध्या ज्या नात्यात आहात त्यामध्ये समोरच्या व्यक्तीला आपल्या भूतकाळाबाबत माहीत असणं चांगली गोष्ट आहे. पण जोडीदाराबरोबर असताना सतत आपल्या एक्सबद्दल सांगणं अथवा त्याच्या वा तिच्याशी तुलना करणं हे योग्य नाही. यामुळे जोडीदाराला नक्कीच त्रास होईल आणि त्यामुळे तुमच्यातील भांडण वाढून दुरावा येऊ शकतो. याचा परिणाम होतो तो ब्रेकअपमध्ये.  जर दुसऱ्या नात्यात येऊनही तुम्ही एक्स डोक्यातून आणि मनातून काढून टाकू शकत नसाल तर दुसऱ्या व्यक्तीबरोबर ब्रेकअप होण्याचं हे कारण नक्कीच आहे.

Valentines Day: नातं प्रेमाचं

5. फसवणूक

Shutterstock

कोणतंही नातं टिकतं ते विश्वासावर. विश्वास तुटला अर्थात फसवणूक झाली तर नात्यात काहीच अर्थ राहात नाही. एका नात्यात असताना तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीसह नातं ठेवलं तर नक्कीच ती फसवणूक आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक नात्यात योग्य नाही. यामुळे ब्रेकअप होणं हे तर नक्की आहे. असं असताना कोणतीही व्क्ती एकमेकांसह राहणं शक्य नाही. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.