चित्रपट तान्हाजी – द अनसंग वॉरियर ने या वर्षी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटाने यश मिळवलं आहे. त्याप्रमाणेच यातील स्टारकास्टही आता सगळ्यांच्या परिचित झाली आहे. या सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री इलाक्षी गुप्तानेही लक्ष वेधलं आहे. तिच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या POPxoMarathi च्या आदिती दातारने आणि जाणून घेतला इलाक्षीचा फिटनेस, ब्युटी आणि फॅशन फंडा.
इलाक्षी ही मूळची अकोल्याची आहे. ती व्यवसायाने डेंटल सर्जून असून तिचं पुण्यात स्वतःचं क्लिनीकही आहे. यासोबत तिने आता मॉडेलिंग आणि अभिनयातही आपली ओळख निर्माण केली आहे. चित्रपट तानाजी- द अनसंग वॉरियरमधून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं आहे. इलाक्षीला पाहल्यावर तुम्हाला वाटेल की, ती तिच्या फिटनेस आणि ब्युटीबाबत खूपच काटेकोर असेल. पण खरंच असं आहे का?
इलाक्षीच्या फिटनेसचं सिक्रेट
इलाक्षीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर तिने किक बॉक्सिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. मी फिटनेस फ्रीक नाही. कारण मला देवाने दिलेले बॉडी फिचर्स म्हणजे उंची आणि स्किन फारच छान आहेत. एका भूमिकेसाठी मी मार्शल आर्ट शिकले पण ती भूमिका राहूनच गेली. पण नंतर मला किक बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सचा खूप फायदा होतो. त्यामुळे मी जिमलाही जाते आणि एक दिवसाआड किक बॉक्सिंग किंवा मार्शल आर्ट्सही करते. ज्यामुळे माझ्या बॉडी टॉनिंग आणि एनर्जीसाठी फायदा होतो.
इलाक्षीचा डाएट फंडा
मी अजिबातच डाएट पर्सन नाही. पण मी डाएट प्लॅन आठवड्यातून किमान तीन दिवस तरी कंपल्सरी फॉलो करते आणि इतर दिवशी माझे चीट डे असतात. मी स्ट्रीट फूडची फॅन आहे. मला गोड पदार्थही खूप आवडतात. सुरूवातीला मला गोड खाण्यावर कंट्रोल करणं खूपच कठीण गेलं. कारण मला रसमलाई खूपच आवडते. घरच्या गोड पदार्थांमध्येही मला गोड पदार्थ आवडतात. मी मुंबईत माझ्या आईबाबांजवळ राहत नाही. पण मला माझ्या आईच्या हातची खीर खूप आवडते. जेवणामध्ये मला पनीर खूप आवडतं. सर्वात जास्त मला चीज बटर मसाला मला खूप आवडतो. पण ही डिश मुंबईत मिळत नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यावर खास शेफला सांगून मी ती बनवून घेते.
इलाक्षीचं डाएट रूटीन
सकाळी जिम किंवा मार्शल आर्ट्सला जाताना मी प्रोटीन शेक किंवा बनाना शेकसोबत सुकामेवा खाते. तिथून आल्यावर अंडी खाते. नंतर दुपारच्या जेवणात उकडलेल्या भाज्या खाते. संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणात फळं किंवा सुकामेवा खाते.
इलाक्षीचं ब्युटी सिक्रेट्स
एवढी सुंदर दिसणाऱ्या इलाक्षीकडे पाहून तुम्हाला वाटेल की, तिचं ब्युटी रिजीम खूपच लांबलचक असेल पण तसं नाहीयं. इलाक्षीच्या सौंदर्याबाबत तिने सांगितलं की, मला जेनेटिकलीच चांगली स्किन मिळाली आहे. पण तरीही मी त्वचेची बेसिक काळजी घेते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा फेसवॉशने चेहरा धुते. रात्री झोपताना आठवणीने नाईट क्रीम लावते. मी त्वचेला जास्तीतजास्त मॉईश्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करते. तसंच भरपूर पाणी पिते. जे मला जमतंच असं नाही. पण तरीही मी प्रयत्न नक्की करते.
इलाक्षीचा हॅपीनेस मंत्रा
इलाक्षीच्या मते, तुम्ही स्ट्रेस फ्री असणं आवश्यक आहे. जर तुम्ही निरोगी असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. हेल्दी डाएट फॉलो करा. बेसिक ब्युटी रेजिम फॉलो करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मी कधीच कोणताही फेसपॅक लावत नाही किंवा फेशियल ट्रीटमेंटही घेतली नाही.
फॅशन स्टेटमेंट ऑफ इलाक्षी
मला वेस्टर्न आणि कॅज्युअल आऊटफिट्स जास्त आवडतात. पण साडी हा प्रकारही मला आवडतो. कारण माझ्या बॉडी टाईप आणि पर्सनॅलिटीला साडी खूपच छान दिसते. पण ती कॅरी करणं किती अवघड असतं ते सगळ्यांना माहीत आहेच. त्यामुळे मी ज्यात कंफर्टेबल आणि ज्यात छान दिसते ती फॅशन कॅरी करते.
तान्हाजीत मिळालेली संधी आणि नऊवारीचा अनुभव
तान्हाजीमध्ये आम्हा सगळ्या फिमेल आर्टिस्टना नऊवारी नेसून अभिनय करायचा होता. त्यामुळे आम्हाला तयार व्हायला खूपच वेळ लागायचा. त्यातच नऊवारी साडी सांभाळून काम करणं खरंच अवघड होतं. पण खूप मजा यायची. सगळ्या दिग्गज स्टारकास्टसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता. त्यात सिनेमाला यश मिळाल्यामुळे जास्त आनंद आहे.
मराठी प्रोजेक्टमध्ये संधी
माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे पण त्याबाबत आता सांगू शकत नाही. मला मराठी बोलता येतं आणि कळतंही पण एवढंही छान नाही. मी मुंबईत गेल्या साडे तीन वर्षांपासून आहे. पण मी मूळची अकोल्याची आहे. त्यामुळे मराठी माझ्यासाठी सोपं आहे.
इलाक्षीच्या फ्युचर प्रोजेक्टससाठी तिला POPxoMarathi कडून खूप खूप शुभेच्छा.