फळं खाणं हे नेहमीच आपल्या त्वचेसाठी लाभदायक ठरतं हे प्रत्येकाला माहीत आहे. वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळी फळं (Fruits) येत असतात. आपल्या घरीही आपण ही फळं आणून खातो. पण याचा आपल्या सौंंदर्यासाठी कसा उपयोग करून घेता येतो आणि सौंदर्य खुलवता येतं याची माहिती तुम्हाला आहे का? फळांमध्ये त्वचा अधिक उजळवण्याचे नैसर्गिक पोषक तत्व असतात. कोणत्या फळांमध्ये काय तत्व आहेत आणि त्याचा कसा उपयोग होतो ते आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. फळं ही जितकी आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत तितकीच ती आपल्या त्वचेसाठी अर्थात सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत. काही फळांच्या बाबतीत प्रत्येकाला माहिती असते. पण प्रत्येक फळ नक्की काय फायदा आपल्या त्वचेला देतो याची सगळ्यांना माहिती नसते. संत्र अथवा पपई यामुळे त्वचा अधिक नितळ होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण इतर फळांमुळे नक्की आपल्या त्वचेला काय मिळतं याची माहिती करून घेऊया. याचा नक्की कसा उपयोग करून घेता येईल ते पाहूया.
संत्र्यामधून विटामिन सी मिळतं आणि त्याने त्वचा अधिक नितळ होते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र संत्र्याची साल उन्हात वाळवा आणि त्याची पावडर करून घ्या. ही पावडर दुधात मिक्स रका आणि ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना यामुळे फायदा होईल. तेलकटपणा कमी होऊन त्वचा अधिक उजळण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो हे लक्षात ठेवा. ही घरगुती पद्धत (Home remedies) आहे. त्यासाठी तुमचा जास्त वेळही जात नाही आणि खर्चही होत नाही.
संत्र्याची साल ठेवा जपून.. कारण संत्र्याच्या सालीचे आहेत भरपूर फायदे
फेब्रुवारी महिना सुरू झाला की, बाजारात ठिकठिकाणी कैरी आपल्याला दिसतात. कैरी महाग असली तरी त्वचेपेक्षा नक्कीच मोठी नाही. कैरी तुमची त्वचा अधिक मुलायम बनवण्यासाठी मदत करते. त्यासाठी एक कैरी घेऊन ती पाण्यात उकळवा. त्याचा आलेला गर आपला चेहरा आणि मानेवर लावा. हा गर वाळला की, चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला तुमची त्वचा अतिशय मुलायम जाणवेल. तुमचा चेहरा कोरडा झाला असेल तर तुम्ही हा सोपा आणि घरगुती उपाय नक्की करून पाहा.
पिकलेले डाळिंब जितकं आरोग्यदायी असतं तितकाच त्याचा सौंदर्यासाठीही महत्त्वाचा फायदा होतो. हे दाणे चेहऱ्यावर चोळा आणि त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग अधिक हलका आणि गुलाबी होतो. नैसर्गिक लालसरपणा चेहऱ्यावर येतो. तुम्हाला तुमचे ओठ गुलाबी हवे असतील तर तुम्ही ओठांवरही डाळिंबाचा रस लावा. ओठांचा रंग सुधारण्यास मदत मिळते. तसंच तुम्हाला चेहऱ्यावर डाग आले असतील तर डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटा आणि त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहरा आणि मानेवर लावा. सुकल्यावर धुवा. यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरील डागात फरक दिसून येईल.
पपईचा वापर सौंदर्यासाठी केला जातो हे खूपच पूर्वीपासून सर्वांना माहीत आहे. बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्येही पपईचा वापर करण्यात आलेला दिसून येतो. पपईचा गर तुम्ही चेहऱ्यावर चोळल्यास, चेहऱ्यावरली पुरळ आणि डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा अधिक चमकण्यासही मदत मिळते. त्वचेचं आरोग्य पपईच्या नियमित वापराने सुधारतं.
केळीदेखील परंपरागत सौंदर्यासाठी वापरण्यात येतात. पिकलेल्या केळ्याचा गर आणि मलई एकत्र करून फेसपॅक बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावा आणि साधारण 15 मिनिट्सने चेहरा धुवा. दुसरा उपाय म्हणजे केळ्याच्या पातळ चकत्या करून मधात बुडवून ठेवा. या चकत्या मधासह चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिट्सने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा जाऊन चेहरा अधिक मुलायम होतो. तसंच चेहऱ्यावर मुरूमं आली असतील तर केळ्याचा गर त्यावर चोळून ठेवा. अर्धा तास ठेवा आणि मग कच्च्या दुधाने चेहरा धुवा. तुम्हाला योग्य परिणाम चेहऱ्यावर दिसून येईल.
सफरचंद हे असं फळ आहे जे अत्यंत गुणकारी आहे. सफरचंदाचा रस काढून घ्या. त्यात गुलाबपाण्याचे थेंब घालून मिक्स करा आणि हे चेहऱ्यावर लावा अथवा सफरचंदाचा गर उकडवून घ्या आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा उजळण्यास मदत मिळते. तसंच चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबीपणा दिसायला लागतो.
तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही कलिंगडाचा वापर सौंदर्यासाठी करायला हवा. कलिंगडाच्या गरामध्ये तुम्ही एक अंड्याचा पांढरा भाग आणि थोडीशी मिल्क पावडर मिक्स करा आणि याची पेस्ट करून ती चेहऱ्याला लावा. तुमची कोरडी त्वचा मुलायम होण्यास मदत मिळते. तसंच तुम्हाला नैसर्गिक आणि घरगुती उपायाने सौंदर्य अधिक खुलवण्यास मदत मिळते.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.