रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी आणि बघा जादू!

रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी आणि बघा जादू!

तुम्हाला जर कोणी सांगितलं की आमच्याजवळ अशी जादूची छडी आहे जी तुम्ही जिमला न जाता अथवा व्यायाम करता तुमचं वजन कमी करू शकतं. हे ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला वाटेल की मस्करी चालू आहे. पण असं अजिबात नाही. हे खरं आहे आणि ही किमया करून शकतं जिऱ्याचं पाणी. जिऱ्याच्या पाण्याने ही किमया नक्कीच घडू शकते. केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर शरीरासाठी जिऱ्याचं पाणी हे लाभदायक आहे. हे पाणी बनवणं आणि त्याचं सेवन  करणंही अतिशय सोपं आहे. एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे जिरे घालून साधारण 5 मिनिट्स पाणी उकळवा आणि हे पाणी गाळून प्या. आपल्यापैकी अधिक लोक तर सकाळी लवकर उठून जिममध्ये जाण्याला प्राधान्य देतात. पण तरीही तुम्हाला सकाळीच हे जमत नसेल तर तुम्ही जिऱ्याच्या पाण्याचा हा उपाय नक्की करून पाहायला हवा. त्याशिवाय आपल्या शरीरासाठी जिऱ्याच्या पाण्याने किती लाभ होतात हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही तुमच्या आयुष्यात रोज जिऱ्याच्या पाण्याचा उपयोग करून घ्या. जिऱ्याच्या पाण्याचे कसे फायदे होतात ते पाहूया -

1. पचनाची प्रक्रिया निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर

Shutterstock

जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. हे आपली पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. डायजेस्टिव्ह सिस्टिम अर्थात पचनतंत्राला अधिक निरोगी ठेवण्याचं काम जिऱ्याचं पाणी करतं. त्याशिवाय हे प्यायल्याने उलटी - जंत, मॉर्निंग सिकनेस आणि बद्धकोष्ठ यासारख्या त्रासांपासूनही सुटका मिळते. जिऱ्याच्या पाण्याने शरीरामध्ये इंजाइम तयार होतात जे कार्बोहायड्रेट, चरबी अर्थात फॅट आणि ग्लुकोज या गोष्टी पचवण्यासाठी सहायक म्हणून काम करतात. 

2. अँटिऑक्सिडंट्सच जास्त प्रमाण

Shutterstock

जिऱ्यामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात एकत्र येणाऱ्या विषारी पदार्थांना बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील आतील भाग हा योग्य तऱ्हेने काम करतो. जिरं तुम्ही थोड्याशा पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या यामुळे तुमच्या लिव्हरमधील बाईल प्रॉडक्शन वाढतं. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटी अथवा गॅसच्या समस्या असतील तर त्यातून सुटका मिळते. बाईल हा असा एक तरल पदार्थ आहे ज्याचं निर्माण लिव्हर करत असतं. चरबी पचवायचं काम बाईल करत असतं. त्यामुळे जिऱ्याचं पाणी पिणंं हा यावर उत्तम उपाय आहे. 

सकाळच्या घाईत झटपट बनवा टेस्टी नाश्ता, जाणून घ्या रेसिपीज

3. प्रतिकारशक्ती वाढवण्यास होते मदत

Shutterstock

जिऱ्याचं पाणी हा आयरनचा खूपच चांगला स्रोत आहे. आयरन अर्थात लोह चांगलं असेल तर तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीचं काम योग्य प्रमाणात होतं. या जिऱ्याच्या पाण्यामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी असल्याने दोन्ही अँटिऑक्सिडंटचं काम योग्य प्रकारे करते. जिऱ्याचं पाणी तुम्ही रोज प्यायल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वजन वाढू देत नाही. 

दररोज धण्या-जिऱ्याचं पाणी प्या आणि निरोगी राहा

4. चांगली झोप मिळते

Shutterstock

लठ्ठपणा वाढल्यामुळे झोप न येणं ही अतिशय कॉमन समस्या आहे. तुम्हाला जर अशी समस्या असेल तर तुम्ही जिऱ्याचं पाणी नियमित प्यायलाच हवं. यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळते आणि तुमचं शरीर अधिक निरोगी राहण्यास मदत मिळते. 

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत

5. शरीराची सफाई

जिऱ्याचं पाण्यात फायबर असतं जे शरीरातील टॉक्झिन अर्थात विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. शरीराची योग्य सफाई होण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. आपल्या शरीराला योग्य हायड्रेट ठेवून वजन कमी करण्यासाठीही या पाण्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. 

जिऱ्याचं पाणी आपल्या शरीराला खूप फायदे मिळवून देतं. तुम्हीही रोज या पाण्याचा वापर करून आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. इतर कोणत्याही गोष्टी करणं जर त्रासदायक ठरतं असले तरीही जिऱ्याचं पाणी रोज एक ग्लास करून पिण्यात कोणतेही कष्ट नाहीत.  तुमच्या शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही हे रोज नक्कीच करू शकता. फक्त याचं प्रमाण एक ग्लासापेक्षा अधिक ठेवू नका. तसंच जास्त बदल करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.