स्वादासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते पनीर, जाणून घ्या फायदे

स्वादासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते पनीर, जाणून घ्या फायदे

पनीरची भाजी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पनीर आवडत नाही अशा व्यक्ती विरळाच. हल्ली तर पनीर हा सगळ्यांच्याच घरचा अविभाज्य भाग झाला आहे. पनीर हा कॅल्शियमचा चांगला स्रोत मानला जातो. पनीर खाण्यात जितका स्वादिष्ट आहे तितकाच आपल्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होत असतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पनीरपासून शरीराला फायदे होतात. दुधापासून बनणारा हा पनीर आपण वेगवेगळ्या स्वरूपात वापरतो. पनीरच्या विविध भाज्या बनवतो. त्याशिवाय यापासून मिठाईदेखील बनवली जाते. पनीरमध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन आणि फॉस्फरस आढळतं, ज्यामुळे दात आणि आपली हाडं मजबूत बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. पनीरचे नक्की कोणकोणते फायदे (Benefits of Paneer for health) आहेत ते आपण या लेखातून पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया पनीरचे आरोग्याला होणारे खास फायदे -

1. कॅन्सर असल्यास, फायदेशीर ठरतो पनीर

Shutterstock

हल्ली कॅन्सरचं प्रमाणही वाढलेलं दिसून येत आहे. दुधापासून बनलेला पनीर हा कॅन्सरसारख्या गंभीर आजारामध्ये फायदेशीर ठरतो. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजापासून वाचण्यासाठी मदत करतं. त्यामुळे आपल्या जेवणात नेहमी पनीरचा समावेश करून घ्या.  पनीर आवडत असेल वा नसेल याचा उपयोग आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी नक्कीच करून घ्यायला हवा. 

2. सांधेदुखीसाठीही पनीरची होते मदत

Shutterstock

शरीराला योग्य पोषण न मिळाल्यास,  शरीर कमकुवत होते. त्यामुळे शरीरात सांधेदुखीसारखे आजार बळावतात. ही सांधेदुखी कधी मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि शरीरात त्याच्या कधी गाठी होतात याचा पत्ताही लागत नाही. यापासून वाचण्यासाठी नियमित आहारात पनीरचा समावेश करून घ्यायला हवा. यातील कॅल्शिमय शरीराला सांधेदुखीपासून दूर राखण्यास मदत करतात. पनीरमध्ये शरीराला मिळणारी आवश्यक पोषक तत्व असतात. जे आजारापासून  दूर राहण्यासा मदत करतात. 

3. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी

Shutterstock

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला जेवणाच्या वेळा नीट सांभाळताना कष्ट घ्यावे लागतात. कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ नेहमीच टळून जाते. त्यामुळे फारच कमी वयात रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार बळावतात. त्यामुळे अशा रूग्णांना नेहमीच आपल्या जेवणाची वेळ आणि खाण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. पनीर खाल्ल्याने तुम्ही तुमचा रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही नियंत्रणात आणू शकता. पनीरमुळे शरीरातील साखरेची पातळी ही प्रमाणात राहण्यास मदत करते. त्यामुळे डॉक्टरही तुम्हाला अशावेळी पनीर खाण्याचा सल्ला देतात. तेलकट नाहीतर योग्य प्रमाणात भाजी करून याचा आपल्या जेवणात समावेश करून घेतल्यास, निरोगी शरीरासाठी पनीरचा नक्कीच फायदा होतो. 

घाटकोपरच्या खाऊ गल्लीत काय आहे चविष्ट पदार्थ, टाकूया एक नजर

4. स्नायू बनवण्यासाठी फायदेशीर

Shutterstock

आजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त  प्रमाणात मिळू शकतं. त्यामुळे नियमित योग्य प्रमाणात पनीरचं सेवन केल्यास, स्नायू बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. 

कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स

5. पोटासाठी फायदेशीर ठरतं पनीर

Shutterstock

पोटाची समस्या अनेक जणांना असते. पचनक्रिया व्यवस्थित नसल्याने सतत पोट दुखत राहण्याची तक्रार बरेच जण करत असतात. पण पनीर खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि पचनक्रियादेखील नीट होते कारण पनीरमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पोटाची समस्या असल्यास, तुम्ही पनीरचा आपल्या आहारात समावेश करून घेणं नक्कीच फायदेशीर ठरतं. 

पनीरच्या शोधाची ही रंजक कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

6. नैराश्य कमी करण्यासाठीही होते मदत

Shutterstock

पनीरमध्ये अमिनो अॅसिडचं प्रमाण जास्त असतं जे नैराश्य दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. नैराश्य आलेल्या लोकांना पनीर जास्त प्रमाणात खायला घालायला हवं. ज्या व्यक्ती जास्त त्रस्त असतात त्यांच्यामध्ये नैराश्य आणि तणाव जास्त वाढतो. तणावापासून वाचण्यासाठी योग्य झोप आणि पोषक तत्व असलेल्या जेवणाची गरज असते. त्यासाठी रात्री तुमच्या जेवणामध्ये पनीरचा वापर करणं हे फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही याचा नियमित वापर करून नक्की फरक पाहू शकता. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.