कॉर्पोरेट मिटिंग असो किंवा लग्न समारंभ... बदलत्या जीवनशैलीनुसार अप-टु-डेट राहण्यासाठी प्रत्येक जण नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. चारचौघांमध्ये आपण उठून दिसावं, अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. त्यासाठी केसांपासून ते त्वचा एकूणच संपूर्ण शरीराची बरीच काळजी घ्यावी लागते. यासाठी काही जण घरगुती उपाय करतात तर काही जण सलून किंवा पार्लरमध्ये जातात. व्यस्त वेळापत्रकामुळे बऱ्याच जणींना घरगुती उपाय करणं शक्य होत नाही. वेळ वाचावा आणि देखभाल देखील व्हावी, यासाठी बहुतांश तरुणी-महिला अपॉईंमेंट बुक करून सलून ट्रिटमेंट घेतात. तुम्हाला पुण्यातील बेस्ट हेअर सलून माहिती आहेत का? आज आम्ही खास तुमच्यासाठी पुण्यातील बेस्ट 12 हेअर सलूनची माहिती आणली आहे.
लंडनमध्ये 1963 रोजी ‘टोनी अँड गाय’ कंपनीच्या पहिल्या सलूनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आता संपूर्ण जगभरात या सलूनच्या 400 हून अधिक शाखा उपलब्ध आहेत. या सलूनमध्ये काम करणारे हेअर स्टायलिस्ट अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित आहेत. हे सलून हेअर कट तसंच अत्याधुनिक पद्धतींनी करण्यात येणाऱ्या हेअर स्पा ट्रिटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
टोनी अँड गायमधील सर्व्हिस : हेअरकट, हेअर कलर, केरेटिन स्मूदिंग ट्रिटमेंट, ड्राय स्टायलिंग, मेन्स ग्रुमिंग, हेअर एक्सटेन्शन, वेडिंग हेअर, ब्युटी, फॅशन, फिक्स, एक्स्प्रेस कलर, हेअर ट्रिटमेंट
पत्ता : शॉप 10, पहिला मजला, द हब, काया स्किन क्लिनिकच्या जवळ, मॅड ओव्हर डोनटच्या वर, लेन 6, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क, पुणे महाराष्ट्र 411014
संपर्क क्रमांक : +918956045714/ 020 6689 0607
वेळ : सोमवार ते रविवार - सकाळी 10.30 वाजल्यापासून ते रात्री 9.30 वाजेपर्यंत
रेटिंग : 3.6 स्टार
वाचा : कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा 'हे' 15 बेस्ट शॅम्पू
कॉर्पोरेट लूक, नवविवाहित वधू किंवा कॉलेजमधील तरुण-तरुणी असोत...लॅक्मे सलूनमध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी विशेष अशा सेवा उपलब्ध आहेत. येथील हेअर स्टायलिस्ट केवळ अत्याधुनिक तंत्राचा वापर करत नाहीत तर त्यांना दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण देखील दिले जाते. शिवाय, लॅक्मे फॅशन वीकमध्ये काम करण्याचा अनुभवही त्यांना दिला जातो. या सलूनमध्ये कोणतीही हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर तुम्ही एखाद्या मॉडेल प्रमाणे दिसाल, यात काही वाद नाही.
लॅक्मे सलूनमधील सर्व्हिस : स्किन : स्किन केअर ट्रिटमेंट, बॉडी केअर, स्किन केअर, स्किन केअर बेसिक्स, स्किन केअर डेपिलेशन
हेअर : हेअर केअर, कलर, स्टालिंग, हेअरकट, ऑल हेअर सर्व्हिस
मेक अप : स्टायलिंग, मेकअप, साडी ड्रेप, ऑल मेकअप सर्व्हिस, हँड केअर, फीट केअर, नेल्स, ऑल हँड-फीट सर्व्हिस
पत्ता : ग्राउंड फ्लोअर, इस्ट ब्लॉक, अमनोरा टाउन सेंटर, हडपस, पुणे
वेळ : सोमवार ते रविवार - सकाळी 10.30 वाजल्यापासून ते रात्री 9.30 वाजेपर्यंत
संपर्क क्रमांक : 02067260472, 02067260471
रेटिंग : 3.9 स्टार
जेव्हा निरनिराळ्या प्रकारच्या हेअर स्टाईलची चर्चा केली जाते, तेव्हा ‘द बॉम्बे हेअर कंपनी’सोबत कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असं म्हटलं जातं. रोहित आणि अनुष्का हे या सलूनचे संस्थापक आहेत. स्वतःच्या मालकीचं हेअर सलून असावं, असं या दोघांचंही स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रोहित-अनुष्कानं आपला कॉर्पोरेट जॉब देखील सोडला. या सलूनमध्ये तुम्हाला अनोख्या प्रकारचे हेअर कट करून मिळतील. महत्त्वाचे म्हणजे अविस्मरणीय सेवा मिळाल्याचा अनुभव तुम्ही मिळेल.
द बॉम्बे हेअर कंपनीतील सर्व्हिस : हेअर कलर, हेअर केअर, हेअर टेक्सचर, हेअर स्टायलिंग
पत्ता : रॉ हाउस 3, लुनकड गार्डन, एचडीएफसी बँकेच्या समोर, विमान नगर, पुणे
संपर्क क्रमांक : +919579181386/ 091582 14111
रेटिंग : 4.4 स्टार
वाचा : केस गळतीवर वेळीच करा उपचार
‘द लिटिल हेअर’ सलून ही एक अशी जागा जेथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अतिशय आरामदायक वाटेल. अत्यंत साधी सजावट, आरामदायी वातावरण, कर्मचाऱ्यांकडून मिळणारी उत्तम सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या उत्तम सेवेद्वारे ग्राहकांना मानसिकरित्या विश्रांती मिळवून देणे, हे ‘द लिटल हेअर’ सलूनमधील प्रत्येक हेअर स्टायलिस्टचे उद्दिष्ट आहे. दिवसभराचा थकवा कमी करायचा असल्यास ‘द लिटिल हेअर’ सलूनमध्ये जाऊन हेअर स्पा ट्रिटमेंट नक्की घ्या.
‘द लिटिल हेअर’ सलूनमधील सर्व्हिस : हेअर कट, हेअर वॉश, हेअर कलर, हेअर स्पा, स्ट्रेटनिंग/पर्मिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग, पेडिक्युअर, मेनिक्युअर, फेशिअल, फुट मसाज, मसाज, हेड मसाज, बॉडी ट्रिटमेंट, ब्लो ड्राय, हेअर स्टायलिंग, हेअर ट्रिटमेंट, ब्लीच, टॅनिंग ट्रिटमेंट
पत्ता : दत्त मंदिर चौक, रॉ हाउस क्रमांक 4, लुनकेड गार्डन, सत्यम मार्ग, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र 411014
संपर्क क्रमांक : 088888 86650/ +919579549626
वेळ : सोमवार ते रविवार - सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8.30 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.3 स्टार
केसांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तुम्ही केवळ एनरिच सलूनमध्ये धाव घेणारे एकनिष्ठ ग्राहक आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण पुण्यामध्ये सध्या एनरिच सलूनच्या बऱ्याच शाखा उपलब्ध आहेत. येथे तुमच्यासाठी हेअर कटव्यतिरिक्त अन्य ब्युटी ट्रिटमेंट्सही उपलब्ध आहेत. स्वच्छता, योग्य देखरेख यामुळेच बहुतांश ग्राहकांकडून एनरिच सलूनला अधिक पसंती दिली जाते.
एनरिच सलूनमधील सर्व्हिस : रोल ऑन वॅक्स, जेल पॉलिश, बॉडी स्क्रब, नेल आर्ट, मेनिक्युअर, हेड मसाज, थ्रेडिंग, हेअर स्टायलिंग, मसाज, ब्लीच, ब्लो ड्राय, पेडिक्युअर, हेअर स्पा, हेअर कलर, स्किन ट्रिटमेंट, हेअर ट्रिटमेंट, मेक अप, वॅक्सिंग, हेअर कट
पत्ता : गोळविलकर लॅबच्या समोर, दिनकर बाग अपार्टमेंट, 852/1, तळ मजला, भांडारकर रोड, पुणे, महाराष्ट्र 411004
संपर्क क्रमांक : 088794 23000
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.1 स्टार
उत्कृष्ट ब्युटी आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, दर्जेदार सौंदर्य प्रसाधने तुम्हाला 'बिग बँग्स थीअरी युनिसेक्स सलून' मध्ये मिळतील. पुण्यात आल्यानंतर या सलूनमध्ये जाऊन तुम्ही एखादी हेअर ट्रिटमेंट घेतली नाही, तर मग तुम्ही बऱ्याच गोष्टींना मुकला आहात, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. ही जागा अत्यंत सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलेली आहे. तुम्हाला वेगवेगळी हेअर स्टाईल, स्पा ट्रिटमेंट घ्यायची आवड असेल तर या सलून नक्की भेट द्या.
बिग बॅंग्स थीअर युनिसेक्स सलूनमधील सर्व्हिस : हेअर कट- स्टायलिंग, हेअर कलर, स्किन ट्रिटमेंट, नेल आर्ट, मेक अप
पत्ता : शॉप क्रमांक एल 23, ईस्ट कोर्ट फीनिक्स मार्केट सिटी, सकोरे नगर, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र 411014
संपर्क क्रमांक : 088883 26925
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 11:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.2 स्टार
मजासपासून ते हेअर कटपर्यंत तुम्हाला हव्या असलेल्या सर्व प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंट्स 'हेअर टू ऑर्डर' सलूनमध्ये उपलब्ध आहेत. या सलूनमध्ये तुम्हाला ट्रेंडी लुक मिळेल.
हेअर 2 ऑर्डर सलूनमधील सर्व्हिस : हेअर सर्व्हिस, नेल्स सर्व्हिस, ब्युटी सर्व्हिस, स्किन सर्व्हिस, मेक अप, ब्रायडल पॅकेज
पत्ता : लेन क्रमांक 6, मीरा नगर गार्डन सोसायटी, मीरा नगर, कोरेगाव पार्क, पुणे महाराष्ट्र 411001
संपर्क क्रमांक : 098501 80031
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.3 स्टार
'बी ब्लंट' सलून प्रामुख्यानं हेअर कटसाठीच प्रसिद्ध आहे. पण येथे तुम्हाला हेअर कट व्यतिरिक्त अन्य ब्युटी ट्रिटमेंट्स देखील करून मिळतील. सलूनमधील सजावट, वातावरण ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. देशभरात 'बी ब्लंट' सलूनच्या 18 पेक्षा अधिक शाखा आहेत.
बी ब्लंट सलूनमधील सर्व्हिस : हेअर कट, हेअर कलर, हेअर स्पा, पेडिक्युअर, ब्लीच, वॅक्सिंग, मसाज, ब्रायडल मेक अप
पत्ता : लेन क्रमांक 7-12, पहिला मजला, हर्मीस विशाल डी इमारत, कॅफे कॉफी डे शॉपच्या वर, कोरेगाव पार्क, पुणे महाराष्ट्र 411001
संपर्क क्रमांक : 074474 41931
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.4 स्टार
व्हीएलसीसी हे स्लिमिंग आणि वेलनेस सेंटर आहे. पण येथे ग्राहकांसाठी सलून सर्व्हिस देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ट्रेंडी हेअरकटपासून हेअर स्पा, थ्रेडिंग, क्लासिक मेनी-पेडी क्युअर सर्व्हिसपर्यंत सर्व ब्युटी ट्रिटमेंट्स येथे उपलब्ध आहेत. व्हीएलसीसीमध्ये तुमचा योग्य पद्धतीनं मेकओव्हर होईल.
व्हीएलसीसीमधील सर्व्हिस : स्लिमिंग, ब्युटी अँड ग्रुमिग, लेझर ट्रिटमेंट, हेअर कट, हेअर बिल्ड, हेड मसाज
पत्ता : औंध, संघवी आर्केड, पहिला मजला, परिहार चौक, पुणे, महाराष्ट्र 411007
संपर्क क्रमांक : 02040195959
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 6.30 वाजल्यापासून ते रात्री 8.30 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.2 स्टार
संपूर्ण देशभरात 'जावेद हबीब' सलूनच्या शाखा उपलब्ध आहेत. त्यामुळे जेव्हा हेअर कट किंवा हेअर ट्रिटमेंटची चर्चा केली जाते, त्यावेळेस 'जावेद हबीब' चं नाव विसरून चालणार नाही. बहुतांश जणांच्या खिशाला परवडणारे असे हे सलून आहे.
जावेद हबिब सलूनमधील सर्व्हिस : ब्रायडल पॅकेज, हेअर ट्रिटमेंट, ड्राय हेअर कट, ब्लो ड्राय, डिझायनर कट, हेअर ट्रिटमेंट, हेअर स्टायलिंग, हेअर कलरिंग, ब्युटी अँड ग्रुमिंग, हेअर केअर, सेमी फेशिअल, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज
पत्ता : डेस्टिनेशन सेंटर, ऑफिस क्रमांक 25, बी विंग, पाचवा मजला, मगरपट्टा, हडपसर, पुणे, महाराष्ट्र 411013
संपर्क क्रमांक : 090491 06885
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 9.30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.3 स्टार
हेअर आणि ब्युटी केअर सेंटरमध्ये 'लुक्स सलून' सर्वात मोठा ब्रँड मानलो जातो. ग्राहकांना सर्वात चांगली सेवा देणे, हे लुक्स सलूनचं उद्दिष्ट आहे. 1989 साली 'लुक्स सलून' ब्रँडनं हेअर-ब्युटी केअर क्षेत्रात पर्दापण केलं.
लुक्स सलूनमधील सर्व्हिस : हेअर कट, ग्लोबल कलरिंग, ब्लो ड्राय, रूट टच अप, शॅम्पू अँड कंडिशनिंग, रोलर सेटींग, ऑइलिंग, पार्टी मेक अप, ब्रायडल मेक अर, बेस मेक अप, आय मेक अप, रिबाँडिंग, पर्मिंग, केरेटिन, कलर प्रोटेक्शन, स्मूदनिंग, स्पा ट्रिटमेंट, स्कॅल्प ट्रिटमेंट
पत्ता : दुसरा मजला, द पेव्हिलियन, सेनापती बापट रोड, दुर्गा नगर, मॉडेल कॉलनी, पुणे, महाराष्ट्र 411016
संपर्क क्रमांक : 70201 04600
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.3 स्टार
मंगेश कदम यांनी 2015मध्ये MKAY skin & Hair Salon ग्राहकांसाठी आणलं. ग्राहकांच्या समस्येनुसार सलूनकडून हेअर-ब्युटी केअर सर्व्हिस दिली जाते.
सलूनमधील सर्व्हिस : हेअर ट्रिटमेंट, हेड मसाज, मेनिक्युअर, पेडिक्युअर, स्किन ट्रिटमेंट, फेशिअल ट्रिटमेंट, वॅक्सिंग, अँटी एजिंग ट्रिटमेंट, इन्स्टंट मेकओव्हर
पत्ता : 101, श्री विद्यानंद सोसायटी, डॉक्टर केतकर रोड, भोंडे कॉलनी, एरंडवन, कलमाडी शाळेजवळ, पुणे, महाराष्ट्र 411004
संपर्क क्रमांक : 098224 84444/ +91 20 2542 4254
वेळ : सोमवार ते रविवार सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध
रेटिंग : 4.6 स्टार
1. पुण्यामध्ये हेअर स्टायलिस्ट हेअर कटसाठी किती शुल्क आकारतात?
कोणत्याही सलूनमध्ये तुमच्या केसांच्या लांबीवरून तसंच तुम्हाला कोणता हेअर कट करायचा आहे, त्यावरून हेअर कटची फी ठरवली जाते. पुण्यामध्ये हेअर स्टायलिस्ट अंदाजे 500 रुपये ते 2,500 रुपयांपर्यंत शुल्क आकारतात.
2. पुण्यातील कोणते सलून हेअर कटसाठी चांगले आहे?
तसे पाहायला गेलं तर पुण्यामध्ये तुम्हाला हेअर स्टायलिंगसाठी बऱ्याच सलूनचा पर्याय उपलब्ध आहे. पण 'लिटिल हेअर सलून' सर्वात चांगला पर्याय आहे. या सलूननं हेअर-ब्युटी क्षेत्रात पुरस्कार देखील पटकावले आहेत. हे सलून युनिसेक्स आहे, येथे तुमच्या मुलांसाठीही हेअर स्पाची सुविधा उपलब्ध आहे. या सलूनमध्ये तुम्हाला हेअर कटपासून ते नेल आर्टपर्यंत सर्व गोष्टी ब्युटी केअर सुविधा उपलब्ध आहेत.
3. हेअर कटसाठी पुण्यातील सर्वोत्तम जागा कोणती?
पुण्यात बहुतांश सलून तुम्हाला कोरेगाव पार्कमध्ये आढळतील. जेथे तुम्हाला अतिशय चांगला ट्रेंडी लुक दिला जातो. पण काही सलून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत.