प्रेमात असूनही लग्न करु शकल्या नाहीत या सेलिब्रिटी जोड्या

प्रेमात असूनही लग्न करु शकल्या नाहीत या सेलिब्रिटी जोड्या

ब्रेकअप फक्त सर्वसामान्यांचे होतात असे नाही. तर सेलिब्रेटींचेही ब्रेकअप होतात. फक्त त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा या जास्त पसरतात. अशा अनेक जोड्या बॉलीवूडमध्ये आहेत ज्यांनी एकमेकांशी प्रेम केले त्यांनी एकमेकांसोबत एकत्र राहण्याच्या आणाभाका ही घेतल्या पण या जोड्या भविष्यात एकत्र येऊ शकल्या नाहीत. त्यांची लग्न काही कारणास्तव होऊ शकली नाहीत. जाणून घेऊया अशा काही सेलिब्रिटी जोड्या

बॉलीवूडमध्ये ठरले अपयशी पण दुसरे करिअर निवडून झाले स्टार सेलिब्रिटी

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी

Instagram

‘बंटी आणि बबली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान  अभिषेक आणि राणी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या लग्नाच्या चर्चा ही पुढे येऊ लागल्या. त्यांची जोडी लोकांना आवडू लागली. त्यामुळे त्यांनी एकामागोमाग एक अनेक चित्रपटात काम केले. त्यांची केमिस्ट्री इतकी खरी होती की, त्यांनी लग्न करावे असे अनेकांना वाटू लागले. पण त्यांच्या नात्याला बच्चन कुटुंबियांकडून परवानगी नसल्याचे कळले. जया बच्चन यांना हे नाते मंजूर नव्हते असे कळले. पण त्यांच्या नात्यामध्ये आली ती ऐश्वर्या रॉय. राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या  या सख्या मैत्रिणी असूनही त्यांच्यामध्ये केवळ ऐश्वर्याच्या एका निर्णयामुळे वितुष्ट आले. 

शाहीद कपूर आणि करिना कपूर

Instagram

शाहीद- करिनाची जोडी आजही अनेकांना स्क्रिनवर पाहायला आवडते. जब वी मेट या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री तर लोकांना फारच आवडली होती. या दोघांचे आधीपासूनच अफेअर्स सुरु होते हे अनेकांना माहीत होते. या दोघांचे लग्न होईल असेही वाटले होते.  पण शाहीदचे करिअर सुरु झाले नव्हते. करिनाच्या घरी ही गोष्ट चालणारी नव्हती. त्यामुळे शाहीद आणि करिनाच्या नात्याला फुलस्टॉप मिळाला. या सगळ्यामध्ये शाहीद आणि करिनाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते एकमेकांना किस करत होते. पण दोघांनी एकमेकांचे मार्ग बदलले. करिनाने सैफसोबत लग्न केले आणि शाहीदने मीरा राजपूतशी लग्न केले. 

टीव्हीवरील हे सेलिब्रिटी कपल विभक्त होणार असल्याची चर्चा

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली

Instagram

बॉलीवूडमधील ही सिंगर जोडी फारच प्रसिद्ध होती. पण काहीच महिन्यांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले. हिमांश कोहलीने एका रिअॅलिटी शो दरम्यान नेहाला प्रपोझ केले. नेहा तिला हो देखील म्हणाली. पण काहीच दिवसात तिने अशी काही पोस्ट टाकली की, त्यांच्यात काहीतरी बिनसले असे कळले. नेहाने भरभरुन हिमांशबद्दल सोशल मीडियावर लिहिले. पण हिमांशने तिच्याबद्दल काहीच लिहिले नाही. त्यांचे नेमके कोणत्या कारणामुळे ब्रेकअप झाले हे अजुनही कळले नाहीत. पण त्यांनी त्यांच्या नात्यामध्ये इतकी कटुता आणली की, नेहा आता या सगळ्याबद्दल बोलू शकत नाही. 

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर

Instagram

 आपल्या वयापेक्षा मोठ्या मुलाला डेट करण्यावरुन श्रद्धा कपूर  आधीच ट्रोल झाली होती. फरहान अख्तर घटस्फोट घेतल्यानंतर श्रद्धा कपूरला डेट करत होता. श्रद्धा त्याच्या प्रभावामुळे त्याच्यासोबत  लिव्ह- इन- रिलेशनशीपमध्ये राहू लागली. श्रद्धा कपूर हाताच्या बाहेर जाऊ लागल्यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. या दोघांना वेगळे करण्यात त्यांना यश मिळाले. आकंठ प्रेमात बुडालेल्या या दोघांनी नंतर एकमेकांचे तोंडही पाहिले नाही

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ

Instagram

कतरिनासोबतच्या सतत दिसण्यामुळे कतरिना आणि रणबीरचे लग्न होईल असे वाटले होते. पण  त्यांचे रिलेशनशीपही अचानक तुटले. कतरिनाचे रणबीरच्या कुटुंबासोबत अनेक फोटोही व्हायरल झाले होते. पण रणबीर कतरिनासोबत असताना प्रामाणिक नव्हता. त्यामुळेच शेवटी कंटाळून तिने रणबीरला सोडून दिले. त्यामुळे आपसुकच या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना फुलस्टॉप बसला. 


तर या काही जोड्या आहेत ज्यांचे एकमेकांवर प्रेम असूनही लग्नाआधीच त्यांनी ब्रेक अप केले.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.