आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

बाळ लहान असताना त्याचं सर्व काही आईच्या दुधावर अवलंबून असतं. बाळाला परिपूर्ण जेवण दुधातून मिळावं म्हणून त्याच्या जन्मानंतर प्रत्येक आईला खूपच काळजी घ्यावी लागते. त्यात सर्वात महत्त्वाची काळजी असते ती म्हणजे आईने स्वतः आजारी पडून चालत नाही. समजामध्ये अनेक समज गैरसमजही आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आईच्या दुधातून बाळाला सर्व सत्व मिळत असतात. मग अशा वेळी आईला जर ताप आणि सर्दी अशा आजारांनी घेरलं असेल तर बाळाला तिने स्तनपान करावे का? हल्ली बाळाला दूध जास्त दिलं तर आपलं सौंदर्य कमी होईल अशा विचारांच्या महिलाही आहेत. पण खरं तर बाळाला योग्य स्तनपान मिळावं म्हणून आता महिलांची सुट्टीदेखील वाढवण्यात आली आहे. आता खरा प्रश्न असतो तो आईच्या आजारपणाचा. बाळाला अशावेळी दूध पाजावं की न पाजावं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. या लेखातून आपण हेच जाणून घेणार आहोत. 

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या 'या' 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

आईचं दूध हे बाळासाठी आरोग्यदायी

Shutterstock

आईला ताप आणि सर्दी अथवा कोणताही आजार असेल अशा परिस्थितीत बाळाने दूध पिऊन त्याचं काहीही नुकसान होणार नाही. बाळाची प्रतिकारशक्ती यातून वाढण्यास मदत होते. अनेक अभ्यासातूनही हे सिद्ध झाले आहे. इतर कोणत्याही आजारापासून बाळाचं रक्षण करण्याची शक्ती ही आईच्या दुधामध्ये जास्त असते. बाळाला आईच्या दुधातूनच सकस आहार मिळत असतो. आईच्या दुधामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल क्षमता अधिक असते हे सर्वात पहिले तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आईच्या नाळेशी जोडलं गेलेलं बाळ हे आईच्या आजारपणामुळे आजारी पडत नाही. तर दुधामध्ये कमतरता असल्यास, आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. आईच्या दुधावर वाढणारे बाळ हे अधिक प्रतिकारशक्ती असणारे आणि आजाराशी जास्त लढा देणारे असते हेदेखील अभ्यासातून सिद्ध झाले आहे. तरीही बऱ्याचदा नवजात मातांनी आपल्याला ताप असल्यास बाळाला दूध देणं योग्य नाही असं वाटतं. पण हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला साधा ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी या गोष्टी असतील तर तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या बाळाला स्तनपान करू शकता. यामुळे बाळाला कोणताही आजार होणार नाही हे नक्की. 

प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत 'हे' ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स

आईच्या आजारपणात स्तनपान केल्याने येतो थकवा

Shutterstock

आई आजारी असताना स्तनपान केल्याने थकवा येऊ शकतो. पण त्यावेळी नवजात मातेचे जास्तीत जास्त पाणी पिणे, वेळवेर आणि व्यवस्थित जेवणे आणि अधिकाधिक आराम करणे या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. आराम करण्याच्या वेळी बाळाला सांभाळण्यासाठी इतर कोणाची तरी मदत घ्यावी. मात्र नवजात आईने आराम घेणेही तितकेच आवश्यक आहे. कितीही बरं नसलं तरीही स्तनपान देणे आवश्यक आहे. त्यामुळे स्तनदाह कमी होतो आणि आईला पण त्रास होत नाही. अचानक दूध देणं थांबवलं तर आईला दूध साचून त्याच्या गाठी होण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं करू नये. ताप, सर्दी आणि खोकला या अत्यंत साध्या आणि लहान गोष्टी आहेत त्यासाठी स्तनपान थांबविण्याची गरज नाही. आजारपणातही तुम्ही आपल्या बाळाला योग्यरित्या वेळेत स्तनपान देऊ शकता. स्तनपान केल्याने बाळाला त्रास होईल हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. 

आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

स्तनपान करताना औषध घ्यावं की नाही?

स्तनपान करताना औषध घ्यावे की नाही असाही प्रश्न निर्माण होतो. औषध तर नक्कीच घ्यावे पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. अति डोस घेऊ नये. अर्थात कोणत्याही प्रकारची स्ट्राँग पेनकिलर घेणं टाळा. त्यामुळे आईचं दूध कमी होऊ शकतं. त्यामुळे अगदी माईल्ड औषधांचा वापर करावा. जेणेकरून बाळाच्या स्तनपानामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. अगदीच गंभीर आजार असेल तर डॉक्टर आईबरोबर बाळाचीही काळजी घेतात. पण सामान्य ताप आणि सर्दी असल्यास, तुम्ही कधीही बाळाला स्तनपान करू शकता. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.