आजकालच्या धावपळीच्य आयुष्यात जेवणाकडे नीट लक्ष दिलं जात नाही. मग त्याचा परिणाम होतो तो वजन वाढीवर. वजन कमी करण्यासाठी जेवणाची योग्य पद्धत माहीत असणं आवश्यक आहे. पण तुम्हाला त्वरीत वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी कॉफी आणि मध या दोन्ही पदार्थांंचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. वेट लॉस डाएट प्लॅन (Weight Loss Diet Plan) फॉलो करूनही तुम्ही वजन त्वरीत कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. योग्य व्यायामदेखील शरीरातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांची (Home remedies) मदत घेतली जाते. नक्की कोणते घरगुती उपाय करता येतील याचा शोध घेण्यात येतो. बाकीच्या गोष्टींनी जेव्हा काहीच होत नाही तेव्हा आपण घरगुती उपायांकडे जास्त लक्ष देतो. या घरगुती उपायांमध्येच कॉफी आणि मधाचा उपयोग करून घेता येतो. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा आणि आम्ही तुम्हाला काही उपाय देत आहोत ते नक्की करून पाहा.
कॅफीनमुळे कॉफी एका एनर्जी ड्रिंकप्रमाणे वापरली जाते कारण कॉफी डोपामाईनसारख्या न्यूरोट्रान्समीटरला रिलीज करत असते आणि आपल्याला अधिक उत्साही बनवण्यासाठी मदत करते. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, कॅफीन हे चरबी घटवण्यासाठी सप्लिमेंटप्रमाणे काम करतं आणि वजन त्वरीत कमी करण्यासाठी मदत करतं. कॉफी दोन तऱ्हेने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. पहिले मेटाबॉलिजम वाढवून आणि दुसरे फॅट टिश्यूमधून फॅट बर्न करून. मधाच्या फायद्याबाबत सर्वांनाच माहीत आहे. मधामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. पण या दोन्हीचं मिश्रण केलं तर त्याचा अधिक फायदा होतो. लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या दोन्हीचं मिश्रण करून त्याचं सेवन करू शकता.
मधामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि कॉफीमधील कॅफीनमुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. तुमचं मेटाबॉलिजम चांगलं असेल तर तुमच्या शरीरातील चरबी लवकर कमी होण्यास मदत मिळते. यामुळे केवळ वजनच नाही तर वजन कमी करण्याची प्रक्रियादेखील लवकर होते. मधामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात आणि त्याचं नियमित स्वरूपात आपण सेवन केल्याने कॅलरीज बर्न करण्यासाठी फायदा मिळतो. त्याशिवाय मध ट्रायग्लिसराईड्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे चरबी लवकर कमी होऊन शरीराबाहेर जाण्यास मदत मिळते.
1. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये गहू, बाजरी, ज्वारी, चण्याचा समावेश करून घ्या
2. हिरव्या भाज्या, तसंच सलाड म्हणून कांदा, मुळा, गाजर, रताळं अशा जमिनीखाली येणाऱ्या भाज्यांचा जास्त वापर आहारात करा
3. प्रोसेस्ड फूडचं सेवन कमी करा तसंच ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतील त्यांचं सेवन कमी करा
4. खराब फॅट असणारे पदार्थांचं सेवन कमी करा. जेवणामध्ये हेल्दी फॅट समाविष्ट करा. यामध्ये ऑलिव्ह ऑईल, नारळाचं तेल, अंडं, पनीर, दूध, दही यासारख्या पदार्थांचा अधिक समावेश करून घ्या
5. साखर जितकी कमी शरीरात जाईल याकडे लक्ष द्या. सहसा साखर खाणं टाळा
चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.