ADVERTISEMENT
home / Vastu
VaastuTips  : चुकूनही उशीखाली ठेवू नका या गोष्टी

VaastuTips : चुकूनही उशीखाली ठेवू नका या गोष्टी

घरातील मोठी लोकं नेहमीच झोपण्याआधी देवाचं नाव घेऊन किंवा हनुमान चालीसा वाचून झोपण्याचा सल्ला देतात. असं केल्याने तुम्ही झोपल्यावर तुम्हाला शांत झोप लागते आणि रात्रीची भीती वाटत नाही. काही लोकांना सवय असते की, रात्री झोपताना उशीजवळ केसांची क्लीप, वॉलेट किंवा पुस्तक अशा वस्तू ठेवण्याची. आजकाल या गोष्टींमध्ये मोबाईलची भर पडली आहे. वास्तूशास्त्रानुसार पाहायला गेल्यास बऱ्याच गोष्टी तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी नसाव्यात असं सांगण्यात आलं आहे. कारण या गोष्टी फक्त नकारात्मक उर्जा वाढवतात असं नाहीतर तुमच्या नात्यातील दुरावा वाढण्यासही कारणीभूत ठरू शकतात. आज जाणून घेऊया कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी किंवा उशीजवळ ठेवू नयेत.

Vastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली

औषधं : अनेक जणांना रात्रीसुद्धा औषध घेण्याची गरज असते किंवा सकाळी उठल्यावर औषधं घ्यायची असतात. अशा परिस्थितीत पटकन हाताजवळ औषधं असावं म्हणून ते जवळ घेऊन झोपतात. पण वास्तूशास्त्रानुसार हे चुकीचं मानलं जातं. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो. ही सवय तुम्हालाही असल्यास ती वेळी च बदला. 

ADVERTISEMENT

चपला : बरेच जण घरात चपला वापरतात. त्यामुळे झोपण्याआधीही त्यांच्या बेडजवळ चपला ठेवलेल्या आढळतात. असं केल्यानेही नकारात्मक उर्जा वाढते. त्यामुळे झोपतेवेळी चपला किंवा स्लीपर या तुमच्या बेडपासून लांब ठेवा. 

वॉलेट किंवा पर्स : झोपतेवेळी कधीही तुमच्या उशीजवळ वॉलेट किंवा पर्स ठेवू नका. पैशांना लक्ष्मीमातेचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचं स्थान तिजोरीत आहे. उशाशी पर्स ठेवल्याने तुमचा विनाकारण खर्च वाढू शकतो आणि सोबतच नात्यातील गोडवाही कमी होऊ शकतो. त्यामुळे झोपण्याआधी तुमचं वॉलेट किंवा पर्स कपाटात ठेवा. 

पाण्याची बाटली : कधीही झोपण्याच्या बेडजवळ किंवा उशीजवळ पाण्याने भरलेलं भांडं किंवा बाटली ठेवू नका. यामुळे चंद्र प्रभावित होतो. चंद्र प्रभावित झाल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता वाढते आणि  ती व्यक्ती अनेक आजारांना बळी पडू शकते. 

किल्ल्या : काहींना तिजोरीच्या किंवा घराच्या किल्ल्या उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. त्यामुळे झोपताना ते उशीखाली किल्ल्या ठेवतात. पण ही सवय तुम्ही ताबडतोब बदलायला हवी. कारण या सवयीमुळे तुमच्या घरामध्ये पैशांची चणचण वाढते. 

ADVERTISEMENT

मोबाईल : वास्तूशास्त्रानुसार नाही पण मोबाईल तुमच्या उशीजवळ ठेवून झोपणं हे कधीही वाईटच आहे. कारण मोबाईलमधील हानीकारक किरणांमुळे तुम्हाला आरोग्याशी निगडीत कॅन्सरसारख्या रोगाची समस्याही जाणवू शकते.

Vastu Tips: नव्या वर्षात व्हा मालामाल फॉलो करा या टिप्स

मग पुढच्या वेळी झोपण्याआधी उशीखाली वर सांगितलेल्या गोष्टी आठवणीने ठेवू नका. तुम्हाला फायदा नक्कीच होईल. #POPxoMarathi वर तुम्हाला अजून कोणत्या वास्तूविषयक टीप्स जाणून घ्यायला आवडतील ते आम्हाला सांगा. 

ADVERTISEMENT

घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

27 Feb 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT