उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी आणि बघा चमत्कार

उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी आणि बघा चमत्कार

आपल्याकडे तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचं झाड हे अतिशय पवित्र मानण्यात येतं. घरामध्ये अनेकदा तुळशीचं झाड लावलेलं पाहायला मिळतं. त्याशिवाय तुळशीच्या झाडामुळे वास्तूदोषही दूर होतात असं म्हटलं जातं. तर दुसऱ्या बाजूला तुळशीचं झाड हे आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. ही आयर्वेदिक वनस्पती अनेक आजारांवर रामबाण इलाज आहे. यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरल,  अँटिइन्फ्लेमेटरी, होणारा त्रास दूर करणारे गुण आहेत. त्यामुळे अनादी काळापासून तुळशीची पानं ही औषधासाठी वापरण्यात येतात. घरगुती उपायांमध्ये याला खूपच महत्त्व आहे. श्वासाचा त्रास, तोंडाचा आजार, ताप, दमा, हृदयरोग अथवा ताण या सगळ्यापासून तुळशी सुटका मिळवू देते. तसंच तुळशीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचं सामर्थ्य अधिक आहे. त्वचेचा रोग अथवा केसांच्या समस्यांपासूनही तुळशीचं पाणी सुटका मिळवून देतं. तुळशीचे अनेक फायदे आहेत पण तुळशीचं पाणी उपाशीपोटी तुम्ही प्यायलात तर काय फायदा होतो ते तुम्हाला माहीत आहे का? याचविषयी माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. 

घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)

उपाशीपोटी तुळशीचं पाणी प्यायचा फायदा

Shutterstock

तुळशीचा चहा प्यायल्याने सर्दी खोकल्यासारखे आजार दूर होतात. तर उपाशीपोटी तुळशीचं पाणी प्यायल्यास, याचा जास्त फायदा शरीराला मिळतो. आपल्या शरीरामध्ये अनेक पदार्थांद्वारे अशा काही गोष्टी पोहचतात ज्या शरीराच्या अजिबातच कामाच्या नसतात. ज्याला टॉक्झिन्स अर्थात विषारी पदार्थ असं म्हटलं जातं. यातील काही गोष्टी या आतड्यांमध्ये  अडकून राहतात. पण रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही तुळशीचं पाणी प्यायलात तर शरीरातील हे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. शरीर डिटॉक्स होते. तुळशीच्या पाण्याने असलेले अँटिऑक्सिड्ंटस तुमच्या पचनक्रिया आणि किडनी निरोगी राखण्यास मदत करतात. तसंच तुळशीची पानं आपण जी पाण्यात भिजत घालतो यामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स आणि अशी तत्व असतात जे तुम्हाला आतड्यांशी संबंधित आजारांपासून  दूर ठेवतात. जेव्हा तुम्ही तुळशीच्या अर्काचे पाणि पिता तेव्हा तुम्हाला श्वासाचा त्रास, खोकला, खवखव, कॅन्सर, दमा यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते. 

जाणून घ्या तुळशीच्या रोपाविषयी या '7' गोष्टी

शरीरातील सूज होते कमी

Shutterstock

तुळशीच्या पाण्यातील अँटिअलर्जिक गुणांमुळे शरीराला अधिक फायदा मिळतो. तसंच यामध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे शरीरामध्ये आतून झालेली सूज कमी करायला मदत करतात. त्याचप्रमाणे सध्या प्रत्येक जण तणावात असतो. हा तणाव कमी करण्यासाठी तुळशीचं पाणी अतिशय चांगली साथ देते. त्याशिवाय तुमच्या मेंदूला चालना देण्याचं कामही तुळशीचं पाणी करतं. तुमचा मेंदू अधिक चांगलं कार्य करेल अशी क्षमता या तुळशीच्या पाण्यामध्ये आहे.

कलियुगातही वरदान ठरणारी तुळशीची पानं (Benefits Of Tulsi Leaves In Marathi)

असे बनवा तुळशीचे पाणी

Shutterstock

तुळशीचं पाणी बनविण्यासाठी तुम्हाला केवळ दोनच गोष्टी लागतील. एक म्हणजे तुळशीची पानं आणि दुसरे पाणी.

सकाळी उठून एका भांड्यात 2 कप पाणी घ्या आणि तुळशीची 10-12 पाने धुऊन मग या पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी साधारण 5 मिनिट्स उकळवून घ्या. उकळल्यावर गॅस बंद करा आणि पाणी कोमट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी प्या. लक्षात ठेवा हे पाणी  तुम्हाला उपाशीपोटी असताना प्यायचं आहे. रोज सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने तुमचे मेटाबॉलिक स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत होते त्याशिवाय तुमचं वजनही नियंत्रणात राहातं. त्यामुळे हे पाणी प्यायला सुरूवात करा आणि चमत्कार बघा. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.