पोटातील जंतावर घरगुती उपाय करा आणि आराम पाहा (Home Remdies For Stomach Worms)

जंतावर घरगुती उपाय

लहानपणापासूच आपण जंताबद्दल ऐकत आलो आहोत. लहानपणी काहीही खाण्याच्या सवयीमुळे हा त्रास बळावतो हे देखील तुम्ही ऐकले असेल. लहान मुलांना हा आजार अगदी सहज होतो. पण मोठ्यांनाही जतांचा त्रास होण्याची शक्यता असते. आता जंताचा त्रास म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत नसेल तर जंताचा त्रास झाल्यानंतर सतत पोटात दुखत राहणे, पोट फुगणे, अशक्तपणा जाणवणे असे त्रास होऊ लागतात. असं म्हणतात की, जंताचा आजार हा एका वाळवीसारखा आहे जो पसरतच जातो. त्यामुळे जंत बरे झाले असे वाटले तरी तुम्हाला काही काळापर्यंत औषधोपचार करावे लागतात. आज आपण जंताविषयी आणि जंतावरील घरगुती उपायासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत.

बद्धकोष्ठता, वजन वाढीमुळे आहात हैराण करा 'हे' उपाय

जंत म्हणजे काय आणि जंताची लक्षणं कोणती?

shutterstock

वैद्यकीय शास्त्रात जंताचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. यामध्ये प्रामुख्याने स्फीत कृमी, हुक कृमी, गोल कृमी असे प्रकार सांगितले जातात. जंताच्या स्थानावरुन त्याचा प्रकार निश्चित होत असतो. जंताचा त्रास होऊ लागला की, काही बदल होऊ लागतात. सतत पोटदुखी होऊ लागते. डॉक्टरांकडे जाऊन एक्सरे काढला तरी त्यात फार काही हाती लागत नाही. पण जंताची काही लक्षण तुम्हाला माहीत हवीत. जंताचा त्रास तुम्हाला झाला असेल तुम्हाला सतत पोटदुखी होत राहते. लहान मुलांमध्ये जंताची लक्षण पटकन जाणवून येतात. ती सतत चीडचीड करु लागतात. काहींना सतत खावेसे वाटते. तर काहींना भूक लागत नाही. वजन कमी जास्त होणे. अशक्तपणा जाणवणे. गुद्द्वाराला सतत खाज येत राहणे. पोट साफ न होणे. शरीरावर पांढरे डाग येणे असे काही त्रास या दरम्यान होऊ लागतात. 

मुतखड्यामुळे त्रस्त झाला आहात मग करा 'हे' घरगुती उपचार (Home Remedies For Kidney Stones)

जंतासाठी घरगुती उपाय

shutterstock

जंतावर डॉक्टरी इलाज करणे गरजेचे आहेच. पण आजाराच्या काही काळानंतरही तुम्हाला काही पथ्य  पाळावी लागतात. आता पाहुया जंतावरील काही घरगुती उपाय

  • वावडिंगाचे चूर्ण हा जंतावर उत्तम उपाय आहे. रोज सकाळी हे चूर्ण मधासोबत घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो. 
    जेवणानंतर ताकात बाळंतशेप,बडिशेप, ओवा हिंग वाटून घालावे. पोटाला आराम मिळतो.
  • कारल्याच्या पानांचा, मुळांच्या पानांचा रस प्यायलाने जतं पडण्यास मदत मिळते. 
  • टाकळा या पालेभाजीची बी चावून खावी. त्यावर थोडेसे एरंडेल तेल प्यावे त्यामुळे तुमचे जंत पडण्यास मदत मिळते.
  • कडूनिंबाची सालही यासाठी फायदेशीर आहे. कडूनिंबाची साल आणि हिंग एकत्र करुन त्यामध्ये मध घालून हे चाटण चाटावे  जंताला आराम मिळतो. 
  • डाळिंबाचे सालही फार बहुगुणी आहे. डाळिंबाचे साल वाळवून तुम्ही त्याचे चूर्ण करुन रोज घ्यावे जंत कमी होण्यास मदत मिळते. 
  • शेवगाच्या शेंगा खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. शेवगाच्या शेंगा स्वच्छ करुन त्यात काळेमीठ आणि मिरेपूड टाकावे . याचे सेवन केल्याने तुम्हाला मदत मिळेल. 
  • ताकामध्ये पळसपापडीचे चूर्ण घालून ताक प्यावे जंताचा त्रास कमी होतो. 

आता तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणालाही जंताचा त्रास झाला असेल तर तुम्ही हे काही सोपे उपाय करुन पाहू शकता.