फळं स्वच्छ करण्याची ही पद्धत आहे सगळ्यात सोपी

फळं स्वच्छ करण्याची ही पद्धत आहे सगळ्यात सोपी

फळं खाणे ही आरोग्यासाठी चांगली असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून आवर्जून आपण फळांचे सेवन करतो. बाजारातून आणलेली ताजी फळं खायला कोणाला आवडत नाही. पण सध्याचं वातावरण इतकं प्रदुषित आहे की, भाज्या, फळं जास्त काळ टिकाव्यात किंवा त्यांना किड लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणात केमिकल्स आणि खतांची फवारणी केली जाते. तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत फळांनी फ्रेश राहावे हा त्या मागचा हेतू असला तरीसुद्धा ही किटकनाशकं पोटात गेली की, मानवी आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे फळं धुवून खाणे फारच आवश्यक आहे. ही फळं धुण्याचीही विशिष्ट पद्धत आहे ती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. चला करुया सुरुवात 

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

फळं धुताना

shutterstock

आपण सगळेच बाजारातून फळं आणल्यानंतर नळाखाली धरतो, ती धुतो आणि खातो. पण कसे करण्यामुळे फळांवरील केमिकल्स जात नाही. तर फळं वरवर स्वच्छ होतात. तुम्ही सोशल मीडियावर फिरणारे अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले असतील ज्यामध्ये फळंं चमकावी यासाठी मेण देखील लावलेले पाहिले असेल. अशा गोष्टी फळांमधून पटकन निघत नाहीत. म्हणूनच फळं नीट धुतली जायला हवीत.

Vastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली

फळं स्वच्छ करण्याच्या या काही सोप्या पद्धती

shutterstock

  • एका भांड्यात फळं काढून घ्या. ती छान पाण्यात बुडवून ठेवा. त्यात साधारण एक चमचाभर मीठ घालून ती तशीच 5 मिनिटे ठेवून द्या. पाच मिनिटांनी  मीठाच्या पाण्यातून फळं बाहेर काढा. घरच्या घरी करण्यासारखा हा सोपा उपाय आहे. मिठामुळे फळांमधील किड निघण्यास मदत होते. 
  • व्हिनेगरच्या मदतीनेदेखील तुम्हाला फळांची स्वच्छता करता येते. तुम्हाला एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर घ्यायचे आहे. व्हिनेगर आणि पाण्याचे प्रमाण 1:2 असे असायला हवे. पाण्यात व्हिनेगर मिसळून तुम्ही त्यामध्ये फळं बुडवून ठेवा. साधारण 15 मिनिटं तरी तुम्ही त्यामध्ये बुडवून ठेवा. व्हिनेगर थोडे आंबट असते. त्यामुळे तुम्ही ते स्वच्छ करणे आवश्यक असते. तुम्हाला फळ पाण्यातून काढणे त्यानंतर गरजेचे असते.
  •  हल्ली बाजारात बायोवॉश नावाने लिक्वीड मिळते. त्याचा उपयोग करुन फळं  स्वच्छ होतात. पाण्यामध्ये बायोवॉश टाकून तुम्ही फळ साधारण 5 मिनिटे ठेवा. त्यानंतर तुम्ही ही फळं स्वच्छ धुवून घ्या. बायोवॉश केल्यानंतर तुम्हाला फळं धुण्याची गरज नसते. पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका पाण्यातून पुन्हा फळं काढू शकता. 

हे ही असू द्या लक्षात

  • कलिंगड, सफरचंद यासारखी फळं तुम्ही अगदी आरामात धुवू शकता. पण द्राक्ष, स्ट्रॉबेरी अशी फळं धुताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. 
  • द्राक्ष धुताना ही काळजी थोडी जास्त घ्यावी लागते. कारण द्राक्षांमध्ये केमिकल्स जास्त अडकून राहतात. त्यामुळे तुम्ही ही फळं नीट धुवा. 
    आता फळ धुताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.