नोकरीच्या ठिकाणी तुम्हालाही झाले का कोणावर प्रेम... तर या गोष्टी लक्षात ठेवा

नोकरीच्या ठिकाणी तुम्हालाही झाले का कोणावर प्रेम... तर या गोष्टी लक्षात ठेवा

प्रेम कधी.. कुठे आणि कोणावर होईल हे कधीच काही सांगता येत नाही. अनेकदा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तिंच्याच प्रेमात आपण कधी पडतो हे आपल्यालाच कळत नाही. हल्ली तर सगळ्याच नोकरदारवर्गाचा जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी जातो. दिवसातील साधारण 9 तास तरी नोकरीच्या ठिकाणी हा वेळ जातो. अशावेळी ऑफिसमध्ये असणाऱ्या लोकांसोबत घनिष्ठ नाते निर्माण होते. अनेकदा नोकरीच्या ठिकाणीच काहींना त्यांचे खरे प्रेम सापडते. तुम्हालाही नोकरीच्या ठिकाणी कोणावर प्रेम जडले असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजीही घेणे तितकेच गरजेचे आहे. या गोष्टी कोणत्या ते आधी जाणून घेऊया.

#Relationship सुरु करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

जाणून घ्या संपूर्ण व्यक्ती

shutterstock

विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांना जितकी स्थळाची माहिती नसते. त्याहून कितीतरी जास्त माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते. तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस त्या व्यक्तीसोबत घालवत असता. त्यामुळे तुम्हाला त्याचा स्वभाव, काम करण्याची पद्धत, विचार आणि आवड- निवड याचा अंदाज येणे जरा सोपे जात असते. त्यामुळे तुम्ही नुसत्या रुपावरुन प्रेमात पडण्याऐवजी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित पडताळा करुन घ्या. तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या निकषांमध्ये बसणारी वाटत असेल तरच मग तिला विचारण्याचे पाऊल उचला.( जर ती व्यक्ती आधीच कोणाशी कमिटेड असेल तर मग तुम्ही तो विचार डोक्यातून काढून टाका)

प्रेम आणि कामाची करु नका गल्लत

प्रोफेशन असं कितीही मनाशी म्हटलं तरी बरेचदा प्रेमाचं पारडं कामापेक्षा जास्त जड होऊ लागतं. कोणत्याही बाबतीत तुमचं फेवरेटिझम वाढायला लागतं. तुमचं प्रेम तुमच्या कामाच्या ठिकाणी जरी जुळलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मर्यादा कळायला हव्यात. एखाद्याला कामाला मदत करणे हे ठिक आहे. पण त्याची संपूर्ण जबाबदारी कामाच्या ठिकाणी घेणे अजिबात चांगले नाही. त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ शकेल आणि कदाचित हे तुम्हाला अजिबात चालणार नाही. त्यामुळे प्रेम लंच ब्रेक पुरतं मर्यादित ठेवा. कामाच्या वेळी कामच करा. तुमचे प्रेम हे इतरांसाठी चर्चेचा विषय अजिबात होऊ देऊ नका.

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

स्पर्धा हवी पण तुलना नको

आता ऑफिस किंवा काम म्हटलं की स्पर्धा आली. तुम्ही कितीही एकमेंकाच्या प्रेमात असलात. तरी तुमच्या कामाची जिद्द ही तशीच असायला हवी.तुमच्यापैकी कोणालाही कामाची पोचपावती मिळाली तर त्याचा आनंद साजरा करा तुलना करुन भांडण करु नका. कारण नोकरीच्या ठिकाणी असलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे हा त्रास होऊ शकतो. कदाचित तुम्हाला यंदा प्रमोशन मिळेल असं वाटलं असेल पण तुमच्या जोडीदाराला ते मिळालं त्याचा राग करण्यापेक्षा सकारात्मक विचार करुन त्यांच्या आनंदात सहभागी व्हा.

संशयाला नको जागा

shutterstock

नाते कोणतेही असो कुठेही संशय हा नसलाच पाहिजे. कामाच्या ठिकाणी अनेक मिटींग असतात. या मिटींगसाठी बॉसशी संवाद साधणे किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणे होऊ शकते. जर तुमचे काम मार्केटींगशी संदर्भात असेल तर अशावेळी अगदी साहजिक आहे की, तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटावेच लागणार आणि बोलावेच लागणार. पण असे करत असताना संशय घेण्याची काहीच गरज नाही. उलट तुम्ही एकमेकांच्या कामाचे स्वरुप ओळखत आहात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेता यायला हव्यात. 


आता कामाच्या ठिकाणी प्रेमात पडताना या काही गोष्टी कायम लक्षात ठेवा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/