ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
कचऱ्यापासून तयार करा असे केमिकल फ्री औषध … पळवा पाली आणि चिलटं

कचऱ्यापासून तयार करा असे केमिकल फ्री औषध … पळवा पाली आणि चिलटं

 

घरातील चिलटं आणि पालीमुळे तुम्ही हैराण असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक असं औषध शोधून काढले आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाही. घरच्या घरी कचऱ्यापासून तुम्ही हे औषध तयार करु शकता. आम्ही हे घरी करुन पाहिले आहे. त्याचे फायदे लक्षात घेतच आम्ही ही DIY रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे औषध तयार करणे फारच सोपे आहे. त्यामुळे कोणताही वेळ न घालवता आपण या करुया याला सुरुवात

उरलेल्या चहाच्या चोथ्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकीत

तुम्हाला आहे या गोष्टींची गरज

कांद्याची साली

shutterstock

 

आता तुम्हाला आम्ही कचऱ्यापासून हे औषध बनवण्याचे सांगत आहोत. म्हणजे तुम्हाला स्वयंपाकघरातील कचरा लागणार आहे. यासाठी तुम्हाला भाजी आणि फळांचा कचरा चालू शकेल. अगदी केळी, संत्र्याच्या साली, प्रत्येक भाजीजा उरलेला कचरा, कांद्याच्या साली असे सगळे काही तुम्हाला चालू शकेल.  त्यामुळे तुम्ही तुमच्या किचनमधील कचरा एकत्र करा. हे एन्झामाईन किंवा औषध तयार करण्यासाठी तुम्हाला साधारण एक ते दोन आठवडे लागतील. हे औषध तयार करण्यासाठी तुम्हाला प्लास्टिकची बॉटलसुद्धा हवी. तुम्ही जर मिनरल वॉटरची उरलेली बॉटल वापरली तर फारच उत्तम 

ADVERTISEMENT

असे तयार करा औषध

भाज्यांचा कचऱ्या

Shutterstock

 

  • पालींसाठी जालीम उपाय 

एका बॉटलमध्ये अर्धे पाणी घेऊन त्यात कांद्याच्या साली, कांद्याचा कचरा एकत्र करायला घ्या. तुम्ही दररोज यामध्ये कांद्याच्या साली टाकत राहा. कांद्याच्या साली भरुन झाल्यानंतर तुम्ही बॉटल भरली की, ही बॉटल तुम्ही उन्हामध्ये व्यवस्थित ठेवून द्या. कांद्याच्या सालीचा अर्क पाण्यामध्ये चांगला उतरायला हवा. साधारण दोन ते तीन दिवसांनी जर तुम्ही बॉटल उघडली तर तुम्हाला त्यातून कांद्याचा उग्र वास येईल. शिवाय पाण्याचा रंगसुद्धा बदलेल. कांद्याच्या साली जितक्या गडद असतील तितके ते पाणी अधिक गडद दिसेल. हल्ली बाजारात स्प्रे करण्यासाठी प्लास्टिकचे बूच मिळते. त्याचा उपयोग करुन तुम्ही घरात पाल आल्यानंतर तेथे मारु शकता. कांद्याचा रस आणि त्यामध्ये असलेले घटक पालींना पळवून लावतात. जर तुम्ही पाल घरात येण्याच्या ठिकाणावर हा रस मारला तर पाली येण्याचे प्रमाण कमी होताना तुम्हाला दिसेल.

  • फळांचा रस 

आता दुसऱ्या प्रकारे तुम्हाला औषध तयार करायचे आहे त्यासाठी तुम्हाला संत्र्याच्या किंवा लिंबाच्या साली लागणार आहेत. तुम्हाला संत्र्याच्या आणि लिंबाच्या  साली फेकून न देता त्याही कांद्यांच्या सालीप्रमाणे तुम्हाला एका भांड्यात एकत्र करायच्या आहेत. तुम्हाला या सालीसुद्धा पाण्यात ठेवायच्या आहेत. या सालींवरही प्रक्रिया झाल्यानंतर एक वेगळा वास तुम्हाला यातून येईल. पण साधारण दोन आठवड्यांनंतरही याचा वास तसा येत नाही. उलट संत्र्याचा वास अधिक गोड आणि एखाद्या रुम फ्रेशनरप्रमाणे येऊ लागतो. आता हे तयार औषध तुम्हाला चिलटं, माशा आणि डासांवर जालीम उपाय म्हणून कामी येतील. अनेकदा खिडकीत असलेली झाडं आणि त्यामुळे येणारी चिलटं आणि माशा हैराण करतात. त्यामुळे तुम्ही याचा वापर करु शकता. 

वाचा – संत्र्याचे फायदे आहेत अफाट फायदे

ADVERTISEMENT

या शिवाय हे रस केमिकल फ्री असल्यामुळे तुम्ही याचा वापर झाडांच्या वाढीसाठीही करु शकता. फुलझाडं आणि फळझाडांची वाढ यामुळे चांगली होते.त्यामुळे तुम्ही घरी नक्की हा प्रयोग करुन पाहा.

रोजच्या जीवनात कापूराचा असा वापर ठरेल फायदेशीर

 

या शिवाय हे रस केमिकल फ्री असल्यामुळे तुम्ही याचा वापर झाडांच्या वाढीसाठीही करु शकता. फुलझाडं आणि फळझाडांची वाढ यामुळे चांगली होते.त्यामुळे तुम्ही घरी नक्की हा प्रयोग करुन पाहा.

28 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT