स्टॉबेरी खाण्यामुळे त्वचा आणि आरोग्यावर होतात 'हे ' फायदे

स्टॉबेरी खाण्यामुळे त्वचा आणि आरोग्यावर होतात 'हे ' फायदे

सध्या स्टॉबेरीचा सिझन सुरू आहे. स्टॉबेरी हे आकर्षक फळ आहे. लाल गुलाबी रंगाचं गोडसर आंबट चवीचं स्टॉबेरी हे फळ सर्वांनाच आवडतं. स्टॉबरीला मन मोहवून टाकणारा सुंगध असतो. स्टॉबेरी जितकी आकर्षक असते तितकीच ती शरीर आणि सौंदर्यांसाठी फायदेशीर असते. स्टॉबेरीमध्ये अॅंटिऑक्सिडंट आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. स्टॉबेरीत  कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, झिंक, व्हिटॅमिन सी, ए, बी, के भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. यासाठीच जाणून घ्या स्टॉबेरीचे शरीर आणि त्वचेवर काय फायदे होतात.

वजन कमी होते -

स्टॉबेरीमध्ये कॅलरिजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी स्टॉबेरीज खाण्याचा तुम्हाला चांगला  फायदा होऊ शकतो. एक कप स्टॉबेरीमधून अंदाजे 50 कॅलरिज मिळतात. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. 

Shutterstock

कॅन्सर पासून बचाव होतो -

अनेक गंभीर आजारांवर स्टॉबेरी खाणं गुणकारी ठरतं. काही संधोधनानुसार स्टॉबेरीमध्ये कर्करोगाच्या पेशीची वाढ कमी करणारे गुणधर्म असतात. यासाठीच कर्करोगापासून बचाव करण्यासाठी नियमित स्टॉबेरी खाण्याचा फायदा होऊ शकतो.

ह्रदयाचे आरोग्य सुधारते -

स्टॉबेरीमधील अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्मामुळे तुमच्या ह्रदय समस्या कमी होतात. ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आठवड्यातून तीन ते चार वेळा स्टॉबेरीज खाणं गरजेचं आहे.

Shutterstock

दात आणि हाडे मजबूत होतात -

स्टॉबेरीमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे तुमच्या दातांचे बॅक्टेरिआपासून संरक्षण होतं. शिवाय यामधील मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात. यासाठीच घरातील लहान मुले आणि वयोवृद्ध मंडळींना स्टॉबेरी जरूर खाण्यास द्या. 

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते -

रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे निरनिराळी आजारपणे होण्याचा धोका वाढतो. यासाठीच रोगप्रतिकारशक्ती बळकट असणं फार गरजेची आहे. स्टॉबेरीतून तुम्हाला  पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते. ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

गरोदर महिलांसाठी गुणकारी -

गर्भधारणेदरम्यान महिलांना व्हिटॅमिनआणि कॅल्शियमची सर्वात जास्त गरज असते. स्टॉबेरीमध्ये व्हिटॅमिन बी, सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.स्टॉबेरी खाण्यामुळे गरोदर महिलेच्या गर्भाचं चांगले पोषण होतं. ज्यामुळे गर्भारपणातील समस्या देखील कमी होतात. यासाठी गरोदर महिलांनी स्टॉबेरी जरूर खावी. 

त्वचेच्या समस्या कमी होतात -

स्टॉबेरीमध्ये Polyphenols हे अॅंटिऑक्सिडंट असतं. ज्यातील अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्मामुळे तुमच्या त्वचेचं हानिकारक सुर्यकिरणांपासून संरक्षण होतं. म्हणूनच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टॉबेरीचा वापर केला जातो. स्टॉबेरीचा फेसपॅक लावल्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि उजळ दिसते. 

एजिंगच्या खुणा कमी होतात -

स्टॉबेरीमध्ये अॅंटि एजिंग गुणधर्म असतात. वाढत्या वयानुसार त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र नियमित स्टॉबेरी खाण्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग कमी होतात. ज्यामुळे तुम्ही नेहमीच चिरतरूण दिसता. 

केस गळणे कमी होते -

केसांसाठी तर स्टॉबेरी अतिशय गुणकारी आहे. स्टॉबेरी खाण्यामुळे केसांचे गळणे कमी होते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस कमजोर होतात आणि केस तुटून गळतात. यासाठी गळणाऱ्या केसांवर उपाय करण्यासाठी हेअर ऑईलमध्ये स्टॉबेरीचा मास्क मिसळून केसांना लावा. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

सलाड आणि फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळणं आवश्यक

फायबरयुक्त पदार्थ आणि फळं खाल्ल्यामुळे होणार फायदे

अशी ओळखा केमिकल-फ्री फळं