भिजवलेले बदाम मिक्सरमध्ये वाटून त्यापासून बदामाचे दूध काढले जातं. भरपूर पाण्यात भिजवलेले बदाम चांगल्या प्रकारे दळले जातात. वाटून तयार केलेल्या या पेस्टला गाळणीच्या मदतीने गाळून बदामाचं दूध तयार केले जातं. असं हे घरी तयार केलेलं बदामाचे दूध जगभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहारात वापरलं जातं. याचं प्रमुख कारण म्हणजे या दूधात अनेक पौष्टिक घटक असतात. बदामाच्या दुधात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, प्रोटिन्स, मॅग्नेशियम,लोह असे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. शिवाय या दुधाला एक छान सुंगध आणि चवही असते. बदामाचं दुध अगदी गाईच्या अथवा म्हशीच्या दूधासारखंच दिसतं. काही लोक प्राणी प्रेमापोटी वेगन आहार घेतात. अशा वेगन आहारशैलीमध्ये प्राणी आणि प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ वर्ज्य असतात. सहाजिकच वेगन आहार घेणारे लोक प्राण्यांपासून मिळणारं दूध आहारातून घेऊ शकत नाही. अशावेळी बदामाच्या दुधाचा वापर अगदी रेग्युलर दुधाप्रमाणे केला जातो. आजकाल अनेक सुपरमार्केट्स मध्ये बदामाचे दूध सहज उपलब्ध असतं. शिवाय ते घरी तयार करणंही फारच सोपं आहे. बदामाचे दूध कॉफी, चहा, स्मूदी, आईस्क्रीम, सूप, सॉस, सलाडच्या ड्रेसिंग, बेकरीचे पदार्थांमध्ये वापरलं जातं.ज्यांना गाईच्या दुधाची अॅलर्जी आहे अशा लोकांसाठी बदामाचे दूध एक चांगला पर्याय ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या बदामाचे दूध कसे तयार करावे आणि या दूधाचे आरोग्यावर होणारे चांगले फायदे.
बदाम आठ ते दहा तास अथवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याचे साल काढून सोलून घ्या. सोललेले बदाम स्वच्छ धुवून घ्या. ब्लेंडर अथवा मिक्सरमध्ये बदाम आणि त्याच्या चार पट पाणी घालून एक छान स्मूदी तयार करा. एका गाळणीच्या साहाय्याने हे दूध गाळून घ्या आणि स्वयंपाकासाठी वापरा. बदामाचे दूध फाटत नसल्यामुळे ते फ्रिजरमध्ये न ठेवताही चांगले राहते. तसेच आयत्यावेळी तयार करता येत असल्यामुळे साठवून ठेवण्याची गरज लागत नाही.
एक कप बदामाच्या दुधातून तुम्हाला जवळजवळ 60 कॅलरिज मिळतात. मात्र गाईच्या अथवा म्हशीच्या एक कप दुधातून मात्र मिळणाऱ्या कॅलरिजचे प्रमाण हे 146 असतं. सहाजिकच बदामाचे दूध पिण्यामुळे तुमच्या शरीराला कमी कॅलरिज मिळतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
बदामाच्या दुधात कोलेस्ट्रॉल अथवा सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण नगण्य असते. शिवाय यामध्ये सोडियमही कमी प्रमाणात असते. बदामाच्या दुधातून तुम्हाला आरोग्यासाठी उत्तम असलेले ओमेगा फॅटी अॅसिडसारखे हेल्दी फॅट्स मिळतात. सहाजिकच जर तुम्हाला ह्रदयाच्या समस्या असतील किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवायचं असेल तर नियमित आहारातून बदामाचे दूध घेण्यास काहीच हरकत नाही.
गाईच्या दुधाप्रमाणेच बदामाच्या दुधातूनही तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळते. व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही बदामाच्या दुधाचा आहारात समावेश करू शकता. कारण यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. बदामाचे दूध पिण्यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थ्राटिस अथवा हाडांच्या आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो. बदामाच्या दुधामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.
बदामाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई मुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारचा नैसर्गिक ग्लो येतो. बदामाच्या दुधात अॅंटिऑक्सिडंट घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं सुर्यप्रकाशापासून संरक्षण होते.
बदामाच्या दुधात कार्बोहाडड्रेट कमी प्रमाणात असतात. ज्यामुळे यात साखरेचे प्रमाण कमी असते. जर तुम्ही मधुमेही असाल तर तुमच्यासाठी बदामाचे दूध अगदी वरदान ठरू शकते. कारण यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही.
जर तुम्हाला वारंवार अपचनाची समस्या होत असेल तर कधी कधी तुम्हाला आहारात दुधाचे प्रमाण कमी करण्यास सांगितले जाते. मात्र बदामाच्या दुधात फायबर्स असल्यामुळे या दुधामुळे तुम्हाला अपचन होत नाही.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला
अधिक वाचा -
भेसळयुक्त दूध घरबसल्या ओळखण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या