दररोज पेरू खाण्यामुळे शरीरावर होतात हे फायदे

दररोज पेरू खाण्यामुळे शरीरावर होतात हे फायदे

तिखट मीठ लावलेला पेरू खायला अनेकांना आवडतं. पिकलेल्या  पेरूच्या वासाने पोपटही मंत्रमुग्ध होतात. बाहेरून पिवळसर हिरव्या आणि आतून लाल असलेल्या पेरूच्या फळाला एक छान आंबटगोड चव असते. एवढंच नाही तर या पेरूच्या फळात अनेक पौष्टिक घटक दडलेले आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीराला नक्कीच पेरू खाण्याचे फायदे मिळतात.  पेरूमध्ये मुबलक अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर्स असे गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराचे पोषण होते. यासाठी जाणून घ्या पेरूच्या फळ आणि पानांमधील औषधी गुणधर्म 

बद्धकोष्ठता कमी होते -

पेरू हे एक तंतूमय फळ असल्यामुळे भरपूर प्रमाणात फायबर्स असतात.  त्यामुळे एक पेरू खाण्यामुळे तुमच्या पोटात एका दिवसासाठी पुरेसे फायबर्स जातात. सहाजिकच एक पेरू खाण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. पेरूमधील बिया तुमच्या आतड्यांमधील पचनाचे कार्याला प्रोत्साहित करतात. म्हणूनच अपचनाची समस्या असेल तर नियमित पेरू खा. 

Shutterstock

ह्रदयाचे कार्य सुधारते -

पेरूमुळे शरीरातील पोटॅशियम आणि सोडीयमचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. शिवाय पेरू खाण्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते आणि तुमचे ह्रदय निरोगी  राहते. 

रोग प्रतिकारशक्ती वाढते -

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. संशोधनानुसार एका पेरूमध्ये चार संत्र्यांएवढे व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी मुळे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला चालना मिळते. म्हणूनच आजारपणांपासून दूर राहण्यासाठी पेरू जरूर खाण्याची सवय लावा. 

Shutterstock

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते -

काही संशोधने सांगतात की पेरू खाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहते. काही संशोधनात आढळले आहे की पेरूच्या पानांमध्येही रक्तातील साखरेला कमी करणारे घटक असतात. सहाजिकच मधुमेहींसाठी पेरू आणि पेरूची पाने वरदानच आहेत. 

कर्करोग होण्याचा धोका कमी असतो -

पेरूतील व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ होत नाही. म्हणूनच कर्करोगापासून संरक्षण व्हावे असं वाटत असेल तर आहारात पेरूचा समावेश करा. 

दृष्टी सुधारते -

पेरूत व्हिटॅमिन ए चे प्रमाणदेखील मुबलक आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए ची गरज असते. मात्र पेरूमुळे तुमच्या शराराला पुरेसे व्हिटॅमिन ए मिळतात. पेरू खाण्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येत नाही. डोळ्यांची नजर चांगली राहण्यासाठीनियमित पेरू खाण्याने नक्कीच चांगला फायदे होईल. 

मासिक पाळीच्या समस्या -

मासिक पाळीच्या काळात अनेकींना  डायरिया, पोटात दुखणे, कंबर दुखणे, डोकेदुखीचा त्रास होतो. मात्र जर तुम्ही या काळात पेरूच्या पानांचा अर्क घेतला तर तुमच्या वेदना कमी होतात. पेरूच्या पानांचा अर्क या काळात एखाद्या  पेनकिलरप्रमाणे कार्य करतात.

वजन कमी होण्यासाठी मदत करते -

पेरूमध्ये पोषक घटक असले तरी त्यामधून कॅलरिजमध्ये मात्र नक्कीच कमी मिळतात. एका मध्यम आकाराच्या पेरूमधून 37 कॅलरिज मिळतात. शिवाय त्यामधून पुरेसे फायबर्सही शरीराला मिळतात. ज्यामुळे पेरू खाल्यावर तुमचे पोट भरलेले राहते. ज्यामुळे वारंवार भुक लागल्यामुळे तुम्ही  कमी खाला आणि तुमचे वजन कमी होते. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

पावसाळ्यात आवर्जून खायला हवीत ही 5 चविष्ट फळं

हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

जाणून घ्या अॅनिमियाची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार (Anemia Symptoms And Home Remedies)