या कारणांसाठी नियमित खा डाळिंबाचे दाणे

या कारणांसाठी नियमित खा डाळिंबाचे दाणे


निसर्गाच्या पॅकेजिंग कलेचा अविष्कार म्हणजे डाळिंबाचं फळ. या फळामधील लालचुटूक, नाजूक दाण्यांच नुकसान होऊ नये म्हणून निसर्गाने त्याचं पॅकेजिंग अगदी लीलया केलेलं आहे. हे फळ सोलायला तसं थोडं अवघड असलं तरी काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही ते अगदी सहज सोलू शकता. सहाजिकच हे फळ दिसायला फारच आकर्षक दिसतं. मात्र एवढंच नाही तर या डाळिंबाच्या दाण्यांचा तुमच्या शारीरिक आरोग्य आणि सौंदर्यावरही चांगला परिणाम होतो. म्हणूनच डाळींबाची गणना सुपरफ्रुट्समध्ये केली जाते. डाळींबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स, साखर, व्हिटॅमिन सी, के, फोलॅट, पोटॅशियम असतात. दररोज डाळिंबाचे दाणे खाण्याने तुमच्या शरीराला काय चांगले फायदे मिळतात हे अवश्य वाचा. 

शरीराचा दाह कमी होतो -

डाळींबाच्या दाण्यांमध्ये अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. मधुमेह, कर्करोग, अल्झामर अशा काही  आजारपणांमुळे शरीराचा दाह होतो. अशावेळी हा दाह कमी करण्यासाठी डाळिंबाचे दाणे खाणं फायदेशीर ठरू शकतं. कारण यामध्ये तुमच्या शरीरातील दाह कमी करण्याचे सामर्थ्य आहे. 

Shutterstock

रोगप्रतिकार शक्ती वाढते -

डाळींबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. डाळिंबाचे दाणे अथवा रस घेतल्याने शरीरातील धोकादायक जीवजंतूंपासून तुमचा बचाव होतो. म्हणूनच आहारात नियमित डाळिंबाचे दाण्यांचा समावेश करा. 

तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होतो -

तोंडाची अस्वच्छता अथवा काही आजारपणांमुळे बऱ्याच जणांना तोंडाला वास येण्याचा त्रास होत असतो. या समस्येपासून सुटका मिळवण्याचा सोपा उपाय म्हणजे तोंडाची स्वच्छता राखणे आणि आहारात डाळिंबाच्या दाण्यांचा समावेश करणे. डाळींबाच्या रसामुळे तुमच्या दात आणि हिरड्या स्वच्छता होतात. 

Shutterstock

पचनक्रिया सुधारते -

डाळींबाच्या दाण्यांमुळे तुमचे पोषण होते. मात्र एवढंच नाही डाळिंबाच्या दाण्यांमध्ये मुबलक फायबर्स असतात. ज्यामुळे डाळींबाच्या दाणे आणि पानांमध्येही पचनक्रिया सुधारणारे गुणधर्म असतात. यासाठी अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी डाळींबाचा आहारात अवश्य समावेश करा. 

स्मरणशक्ती वाढते -

वयोमानानुसार कधी कधी काही  गोष्टी लक्षात ठेवणं कठीण जातं. ज्याचा परिणाम पुढे अल्झामरमध्ये रूंपातरीत होऊ शकतो. यासाठीच जर नियमित डाळिंबाचे दाणे खाण्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होत नाही. 

त्वचेची काळजी -

डाळींबामध्ये असलेल्या पोषक घटकांचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन, सुरकुत्या कमी करण्यासाठी डाळींबाच्या दाणे फायदेशीर ठरतात. यासाठीच सौंदर्य उत्पादनांमध्ये डाळिंबाचे दाणे, पाने आणि सालींचा वापर केला जातो. 

ताणतणाव कमी होतो -

एका संशोधनानुसार डाळींबाच्या दाण्यामुळे कोर्टिसोल या स्ट्रेस हॉर्मोन्सवर नियंत्रण राहते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो, मेटाबॉलिझम नियंत्रित राहण्यास मदत होते, शरीराचा दाह कमी होतो, स्मरणशक्ती वाढते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या  ताणतणावावर नियंत्रण ठेवता येते.

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

गुळवेल (Gulvel) म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)

या कारणांमुळेही दुखू शकतं तुमचं डोकं

उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी आणि बघा चमत्कार