फिट राहायचे असेल तर तुम्ही डब्यात न्यायलाच हव्यात या गोष्टी

फिट राहायचे असेल तर तुम्ही डब्यात न्यायलाच हव्यात या गोष्टी

 दुपारच्या वेळात आपण सगळेच ऑफिसमध्ये असतो. दुपारचे जेवण हे नेहमीच चांगले असावे कारण त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. जर तुम्ही दुपारी कसाही आहार घेत असाल तर तुम्हाला तुमची सवय बदलण्याची गरज आहे. आता फिट राहण्यासाठी तुम्हाला काही वेगळे करण्याची गरज नाही. तर तुम्ही तुमचा रोजचा पोळी भाजीच्या डब्यासोबत आणखी काही न्यायला हवे. म्हणजे तुमचे दुपारचे जेवण परिपूर्ण होईल आणि त्याचे तुम्हाला फायदेच फायदे होतील. तुम्हीही तुमच्या डब्यात भाजी पोळी किंवा वरण भात नेत असाल तर सोबत अजून काही गोष्टी नेण्यास तुम्ही सुरुवात करा. आता या गोष्टी कोणत्या ते पाहुया. 

इडली-डोशाचे बॅटर बिघडत असेल तर तुम्ही करत आहात या चुका

सलाद (Salad)

Instagram

तुम्ही वरण- भात किंवा भाजी-पोळी काहीही डब्याला नेले असेल तरी सलाद न्यायला विसरु नका. काकडी, टोमॅटो, गाजराचे काप तुम्ही तुमच्या डब्यासोबत न्यायला हवे. साधारण एक डबा भरुन सलाद हे तुम्हा एकासाठी पुरेसे असतात.सलादमुळे तुमचे पोट अगदी व्यवस्थित भरते. गाजर, काकडी, गाजराच्या सेवनामुळे तुम्हाला जेवण पचायलाही मदत मिळते. म्हणून शक्य असेल तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत सलाद घेऊन जा. आता तुम्ही आलटून पालटून काकडी, बीट कधी गाजर-टोमॅटो असं कॉम्बिनेशन कॅरी करा. 

अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट

चणे- शेंगदाणे (chana-peanut)

Instagram

जेवणानंतर एक अशी वेळ असते त्यावेळी आपल्याला खूप भूक लागते.मग अशावेळी काहीही खाण्याची इच्छा होते. सँडवीच, चाट पदार्थ आणि वडा पाव खाण्याची इच्छा तीव्र होते. जर तुम्हाला असे पदार्थ टाळायचे असतील तर तुम्हाला भूक मारुन चालणार नाही. त्यावेळी तुम्ही काही चांगले खावू शकलात तर फार उत्तम. म्हणूनच तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा डब्यात चणे- शेंगदाणे नक्की कॅरी करा.  

ड्रायफ्रुट्स (Dry fruits)

Instagram

आता सगळ्यांना चणे- शेंगदाणे आवडतातच असे नाही. जर तुम्हाला त्यापेक्षाही थोडा सरस पर्याय हवा असेल तर तुम्ही तुमच्या ड्रायफ्रुट्स नेऊ शकता. एका छोट्याशा डब्यात चार काजू, चार बदाम, काही मनुके, पिस्ता इतके तरी तुम्ही घेऊन जा. म्हणजे तुम्हाला इतर काही खाण्याची इच्छा होणार नाही. ड्रायफ्रुटमुळे तुम

एखादं केळ (Banana)

Instagram

केळं हे असं फळ आहे जे तुम्हाला बाराही महिने आणि खिशाला परवडणाऱ्या दरात मिळू शकते. त्यामुळे तुम्ही एखादं तरी केळ डब्यात न्या. केळ्यामुळे अन्न पचनाला मदत मिळते. जर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी केळं एकदम बेस्ट पर्याय आहे कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी नियंत्रणात राहते. त्यामुळे तुम्ही एखादं केळ तुमच्या बॅगमध्ये नक्की ठेवा. कधी कधी मधल्या भूकेवरही केळं चांगलं असतं. कारण तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी केळं हे उत्तम फळ आहे. 

ताक (Buttermilk)

Instagram

खूप जणांना कोल्ड्रींक पिण्याची सवय असते. पण सतत कोल्ड्रींक्स पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच तुम्हाला अशी सवय असेल तर तुम्ही तुमच्यासोबत ताक घेऊन जा. कारण जेवल्यानंतर तुमचे जेवण जिरवण्यासाठी ताक हा उत्तम पर्याय आहे. ताकामध्ये तुम्हाला पुदिना कुस्करुन घालता आला तर फार उत्तम कारण त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते. कोल्ड्रींक्सच्या सेवनामुळे तुमच्या शरीरात अनावश्यक असलेली साखर जाते. त्यामुळे तुमचे वजनही वाढते. त्यामुळे तुम्ही ताकाचे सेवन करा तुमचे वजनही नियंत्रणात राहील.


आता तुम्ही तुमच्या डब्यामध्ये चांगल्या गोष्टी न्या आणि हेल्दी राहा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/