अक्कल दाढ दुखणे ही अनेकांना अचानक जाणवणारी समस्या आहे. साधारणपणे जबड्यामध्ये चार दाढा असतात. अक्कल दाढ ही शेवटची दाढ असते. ज्यामुळे ती बऱ्याचदा उशीरा येते. मात्र मोठं झाल्यावर जबड्यामध्ये हिरड्यांमध्ये ही दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसते. सहाजिकच ही दाढ अपुऱ्या हिरड्यांमध्ये येऊ लागते. ज्यामुळे तिला वाढण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नाही. ज्यामुळे अक्कलदाढ येताना प्रचंड वेदना होतात. बऱ्याचदा या वेदना काही काळाने आपोआप कमी होतात. अक्कल दाढ येण्याचे वय हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. कधी कधी अक्कल दाढ चुकीच्या पद्धतीमुळे आल्यामुळे इतर दात आणि दाढीवर वाईट परिणाम होतो. जर अक्कल दाढ जबडा अथवा हिरड्या फाडून वाढू लागली की ती काढून टाकणे हाच एक पर्याय तुमच्याजवळ असू शकतो. काही घरगूती उपाय करून तुम्ही अक्कल दाढ दुखणे सुसह्य करू शकता. यासाठी जाणून घ्या अक्कल दाढ दुखीवर उपाय कसे करावेत.
अक्कल दाढ वाढू लागल्यावर दाढीमधुन प्रचंड वेदना होऊ लागतात. या वेदना सहन करण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्या फायद्याचे ठरतात. बर्फ हा दुखणं थांबवण्यावर एक चांगला पर्याय आहे. दुखऱ्या भागावर बर्फ लावल्यामुळे त्या भागावरील दाह कमी होतो. यासाठी आईस पॅकने पंधरा मिनीटे शेकवा. ज्यामुळे तुमचं दुखणं नक्कीच कमी होऊ शकेल.
वाचा - हिरड्यांना सूज असेल तर जाणून घ्या हिरडी सुजणे घरगुती उपाय
निलगिरी तेलामुळे बॅक्टेरीया कमी होतात. म्हणूनच दाढ दुखीवर निलगिरी तेल हमखास लावलं जातं. निलगिरीच्या तेलामुळे तोडांतील जीवजंतू मरतात. अक्कल दाढ येताना कीड लागल्यामुळे दाढ दुखत असेल तर निलगिरीच्या तेलामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासाठी निलगिरीच्या तेल कापसावर घ्या आणि दुखऱ्या भागावर लावा.
मीठामुळे नैसर्गिक पद्धतीने जीवजंतू कमी होतात. काही संशोधनानुसार मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तोंडातील घाणेरडा वास आणि जीवजंतू कमी होतात. कधी कधी अक्कल दाढ येताना हिरड्या दुखावल्या जातात. ज्यामुळे त्या भागात जीवजंतू निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे अक्कल दाढीच्या दुखण्यातून आराम मिळू शकतो. यासाठी दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. दातांना कीडण्यापासून वाचवण्यासोबतच तुम्ही समुद्री मीठा वापर सौंदर्यासाठी देखील करू शकता.
लवंग तेल हे देखील दाढ दुखीवरील फायदेशीर आहे. अक्कल दाढीचे दुखणे हे अतिशय त्रासदायक आणि वेदनादायक दुखणे असते. अक्कलदाढ दुखू लागली की काहीच सूचत नाही. यासाठी या भागावर कापसाच्या मदतीने लवंगाचे तेल लावा. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तुम्ही दाढ दुखत असलेल्या भागावर लवंग देखील ठेवू शकता. हळू हळू लवंग दात अथवा दाढेखाली दाबली गेल्यामुळे त्यातील अर्क तुमच्या दाढेला लागून बरे वाटू लागते. लवंग औषधीय असून लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कांद्याच्या रसामध्ये अॅंटिबॅक्टेरिअल आणि अॅंटि इन्फ्लैमॅटरी गुणधर्म असतात. सहाजिकच यामुळे अक्कल दाढ दुखणे नक्कीच कमी होऊ शकते. यासाठी कांदा कापून त्याचा रस काढा तो रस कापसाच्या मदतीने दाढेला लावा. या शिवाय तुम्ही कापलेला कांद्याचे तुकडे अक्कल दाढेवर ठेवून तो चावल्यास त्याचा रस दाढेत जाऊ शकतो.
टी ट्री ऑईलमध्ये जीवजंतू मारण्याची क्षमता असते. पण हे तेल तुम्ही थेट तुमच्या दाढेवर लावू शकत नाही. यासाठी ट्री ट्री ऑईल नारळाचे तेलात मिसळून वापरा. ज्यामुळे ते सौम्य होईल. शिवाय तुम्ही हे ते गिळू शकत नाही. त्यामुळे तेल लावल्यावर तोंडात येणारी लाळ तुम्हाला थुंकून टाकावी लागते. काही गोष्टींची काळजी घेतल्यास या तेलामुळे तुमचे अक्कल दाढ दुखणे नक्कीच कमी होऊ शकते. यासाठीच टी ट्री ऑईलचे फायदे तुम्हाला माहीत असायला हवे.
पुदिन्याची पानं तुम्ही तुमच्या अक्कल दाढदुखीला कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. कारण पुदिन्याची पाने आणि पुदिना तेलामध्ये दाह कमी करण्याचे आणि थंडावा देणारे गुणधर्म असतात. यासाठी पुदिन्याचा रस अथवा तेल कापसावर घ्या आणि तुमच्या अक्कलदाढीवर लावा. पुदिन्याचे तेल संपूर्ण दातांवर चोळल्यानेदेखील तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. पुदिन्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत त्यामुळे तुम्ही त्याचा वापर अनेक प्रकारे करू शकता. यासाठी त्याबद्दल अवश्य जाणून घ्या.
अनेक वर्षांपासून हळद अनेक सौंदर्योपचार आणि औषधोपचार करण्यासाठी वापरली जात आहे. हळद एक मसाल्याचा पदार्थ असल्यामुळे तो स्वयंपाकासाठी हमखास वापरला जातो. सहाजिकच प्रत्येकाच्या घरात हळद ही असतेच. त्यामुळे अक्कल दाढ दुखणे सुरू झाल्यावर तुम्ही लगेचच हळद त्यावर लावू शकता.
आलं आणि लसणामुळे तुमचं हानिकारक जीवजंतूपासून संरक्षण करतं. म्हणूनच स्वयंपाकात आवर्जून आलं - लसणाची पेस्ट वापरली जाते. ज्यामुळे पचनाच्या समस्या अथवा इनफेक्शन होत नाही. दाढेच्या दुखण्यावर आलं आणि लसणाची पेस्ट फायदेशीर ठरू शकते. यासाठी कच्च्या लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्या. दुखऱ्या भागावर अथवा अक्कल दाढी जवळच्या हिरडीवर या पेस्टने मसाज करा.
जर तुम्हाला अक्कल दाढीचे दुखणे असह्य झाले असेल तर त्यावर पेरूच्या पानांचा वापर केल्यास नक्कीच आराम मिळेल. कारण पेरूच्या पानांमध्ये दुखणं कमी करणारे गुणधर्म असतात. यासाठी पेरूची पाने अक्कलदाढेच्या भागावर चावा. पेरूच्या पानांच्या रसामुळे तुमचे अक्कल दाढ दुखणे कमी होऊ शकते. पेरूची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यामुळेही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
जेव्हा एखाद्याला अक्कलदाढ येते तेव्हा त्याला होणारा त्रास हा नक्कीच भयंकर असतो. मात्र काही गोष्टींची आधीपासूनच व्यवस्थित काळजी घेतली तर अचानक होणारी अक्कल दाढ दुखी कमी होऊ शकते. यासाठी या काही गोष्टींबाबत आधापासूनच सावध राहा.
दात आणि तोंडाची स्वच्छता राखा - लहानपणापासून आपल्याला दातांची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासण्याची सवय लावली जाते. मात्र मोठं झाल्यावर नकळत ही सवय सुटण्याची शक्यता असते. असं मुळीच करू नका. कारण दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणं गरजेचं आहे. यासोबतच जेवल्यानंतर चुळ भरणे, वेळच्या वेळी माऊथवॉशचा वापर करणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरीया कमी होतील आणि तोंडाचे आरोग्य चांगले राहील.
भरपूर पाणी प्या - दिवसभरात शारीरिक क्रिया करण्यासाठी तुमच्या शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पाणी पिता तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स पाण्यावाटे बाहेर टाकले जातात. पाणी पिताना तुमच्या तोंडाची स्वच्छता राखली जाते. यासाठी दिवसभरात मुबलक पाणी प्या.
साखरेचे पदार्थ कमी खा - गोड पदार्थ हा अनेकांचा विकपॉईंट असतो. मात्र जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ खाता तेव्हा त्याचे अन्नकण दातात अडकतात. दातात जर गोड पदार्थांचे अन्नकण अडकले तर त्यामुळे दात कीडण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच तोंडाच्या आरोग्यासाठी साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खा.
1- अक्कल दाढ येताना नेहमीच त्रास होतो का ?
नाही. जर अक्कल दाढ येण्यासाठी तुमच्या जबड्यामध्ये पुरेशी जागा असेल तर कोणताच त्रास होत नाही. मात्र जेव्हा अपुऱ्या जागेत अक्कल दाढ येते तेव्हा हिरड्या आणि जबड्याला दुखापत झाल्यामुळे तीव्र वेदना जाणवतात. जेव्हा दाढ पूर्णपणे वाढते तेव्हा हा त्रास कमी होतो.
2- चुकीच्या पद्धतीने वाढलेली अक्कल दाढ म्हणजे काय ?
Impacted wisdom tooth म्हणजे अक्कल दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसणे अथवा ती अपुऱ्या जागेमुळे वाकडी तिकडी येणे. चुकीच्या पद्धतीने वाढल्यामुळे ती इतर दाढ आणि हिरड्यांमध्ये फसते. अशा अक्कल दाढीला डेटिंस्ट Impacted wisdom tooth असं म्हणतात
3- अक्कल दाढीचा एक्स - रे का काढतात ?
डेंटिस्ट अक्कल दाढ नेमकी कशा पद्धतीने वाढलेली आहे हे पाहण्यासाठी एक्स - रे काढतात. ज्यामुळे दुखऱ्या भागावर नेमके काय उपचार करायला हवे हे ठरवणं सोपे जाते.
4- अक्कल दाढ काढणे त्रासदायक असते का ?
अक्कल दाढची वाढ चुकीच्या पद्धतीने झाल्यास ती इतर दातांच्या आणि दाढीच्या वाढीसाठी त्रासदायक ठरते. शिवाय यामुळे तुमच्या हिरड्या आणि जबड्याला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच डेंटिस्ट अशा चुकीच्या पद्धतीने वाढलेली अक्कल दाढ काढून टाकतात. यासाठी आधी एक्स - रे च्या मदतीने त्या दाढीची मुळे कशी वाढत आहेत हे पाहीले जाते. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने वाढलेली वरच्या जबड्याची अक्कल दाढ काढणे काही अंशी सोपे असते मात्र खालच्या जबड्यावरील अक्कल दाढ काढणे कठीण असते. यासाठी तज्ञ्ज ओरल सर्जनची मदत घ्यावी लागते.
5- अक्कल दाढ काढण्याच्या सर्जरीचा अंदाजे किती खर्च येतो ?
अक्क्ल दाढ सर्जरीचा खर्च हा तुमच्या अक्कलदाढीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. ज्यासाठी तुमच्या अक्कल दाढीची अवस्था पाहून तुम्हाला किती खर्च येणार हे लेखी स्वरूपात सांगण्यात येते.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
अधिक वाचा -
तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे