ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचेच्या संसर्गापासून हवी आहे सुटका, तर वापरा घरगुती उटणे

त्वचेच्या संसर्गापासून हवी आहे सुटका, तर वापरा घरगुती उटणे

त्वचा हा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्वचा चांगली ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. काही जणी पार्लरमध्ये जातात तर काही जणी घरगुती उपाय करत त्वचेची काळजी घेतात. तात्पर्य त्वचेची योग्य काळजी घेतली जाणे. बरेचदा पार्लरमध्ये गेल्यानंतर किंवा अगदी घरीही त्वचेची काळजी घेत असताना अनेक केमिकल असणारे क्रिम्स अथवा अन्य गोष्टी वापरून त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा त्वचेच्या संसर्गापासून  सुटका हवी असेल तर घरगुती उटणे वापरणे हे कधीही चांगले. खरं तर उटणे हे केवळ दिवाळीच्या दिवसात वापरले जाते असा समज आहे. पण त्वचेसाठी सर्वात जास्त आणि योग्य उपाय असेल तर तो म्हणजे उटणे. आपल्यापैकी काही जणांना उटणे घरामध्ये तयार केले जाते याची माहितीही नसते. पण तुम्हाला जर तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल आणि संसर्गांपासून सुटका मिळवून हवी असेल तर घरगुती उटणे वापरा. त्यासाठी आता नक्की काय वापरायला हवे आणि त्याचा कसा वापर करायचा असाही प्रश्न लगेच तुमच्या मनात आला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा ‘हे’ फेसपॅक

याचा उपयोग नक्की कसा होतो?

Shutterstock

ADVERTISEMENT

त्वचेवर उटणे वापरणे अतिशय चांगले. यामध्ये कोणतेही केमिकल नसते. त्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही शिवाय कोणताही संसर्गही होत नाही. पण याचा नक्की त्वचेवर कसा परिणाम होत असतो याची कल्पना बऱ्याच जणांना नसते. खरं तर अगदी अनादी काळापासून उटण्याचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी करण्यात येत आहे. उटण्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक वस्तूंमुळे त्वचेमध्ये साठलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते आणि त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते. यामध्ये असणारे हळद ही अँटिसेप्टिक असते. त्याच्या गुणधर्मामुळे त्वचेमध्ये होणाऱ्या संसर्गांचं संरक्षण होतं. तसंच यामध्ये समाविष्ट करण्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही नैसर्गिक असल्याने त्वचेवर संसर्ग होत नाही. आपण पाहूया घरगुती उटणे कसे तयार करायचे.

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार
 

घरगुती उटण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

Shutterstock

ADVERTISEMENT
  • 1 वाटी मसूराच्या डाळीचे पीठ
  • साधारण पाव कप कच्चे तांदूळ
  • 8 बदाम 
  • अर्धा कप गव्हाचा सांजा
  • अगदी चिमूटभर हळद
  • गुलाबपाणी 

मसूरडाळ, तांदूळ आणि बदाम एकत्र करून त्याची बारीक पूड वाटून तयार करा. या पावडरमध्ये गव्हाचा सांजा अथवा वाटलेली भरड आणि हळद घाला. व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण एकत्र करून त्यात गुलाबपाणी आणि थोडंसं पाणी घालून त्याची व्यवस्थित पेस्ट करा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या त्वचेवर, चेहऱ्यावर, मानेवर लावा. वाळल्यानंतर स्वच्छ गार पाण्याने चेहरा धुवा. या घरगुती उटण्याचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. 

DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे ‘आयुर्वेदिक उटणे’

घरगुती उटण्याची दुसरी पद्धत – साहित्य आणि कृती

Shutterstock

ADVERTISEMENT
  • अर्धा किलो मसूर डाळ
  • पाव किलो आंबेहळद 
  • 50 ग्रॅ. गुलाब पावडर 
  • 50 ग्रॅ. संत्र्याच्या सालीची पावडर
  • 50 ग्रॅ. चंदन पावडर
  • 50 ग्रॅ. कडूलिंबाच्या पानाची पावडर
  • 50 ग्रॅ. वाळा 
  • 50 ग्रॅ. मुलतानी माती
  • 50 ग्रॅ. पपई पावडर

या सगळ्या पावडर एकत्र करून व्यवस्थित बरणीत भरून ठेवा. तुम्हाला जेव्हा त्वचेसाठी वापरायचे असेल तेव्हा हे उटणे काढून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा आणि या घरगुती सुगंधी उटण्याची कमाल पाहा. तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही हे तयार करू शकता. त्यासाठी आता दिवाळी सणाची वाट पाहण्याची गरज अजिबातच नाही. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

13 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT