1 फेब्रुवारी 2020चं राशीफळ,कन्या राशीच्या अभ्यासातील अडचणी होतील दूर

1 फेब्रुवारी 2020चं राशीफळ,कन्या राशीच्या अभ्यासातील अडचणी होतील दूर

मेष : पदोन्नतीमध्ये अडचण येण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी केलेल्या छोट्याशा चुकीमुळे देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पदोन्नतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण प्रकरणात तातडीनं निर्णय घ्या. वृद्धांच्या आरोग्याची चिंता राहील. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

कुंभ : आरोग्य बिघडू शकते
अधिक कामकाजामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. दिनक्रम नियमित राखा. जुन्या मित्रांसोबत भेट होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. दुसऱ्यांची मदत घेण्यात यश मिळेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा.

मीन : जोडीदाराच्या सोबतीमुळे करिअरमध्ये मदत होईल
जोडीदाराच्या सोबतीमुळे करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबतचे मतभेद दूर झाल्यानं कामे सहजरित्या होतील. व्यावसायिक भागीदारीमध्ये फायदा होईल. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा.

वृषभ : आयात- निर्यातीत लाभ मिळण्याची शक्यता
आज आयात- निर्यातशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चात काटकसर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिक हवाई प्रवासाचा योग आहे. राजकीय कामांमध्ये व्यस्त असू शकता. संबंध सुमधुर होतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. जे काम करत आहात ते सांभाळ, भविष्यात लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. मित्रांसोबत केलेला प्रवास सुखद राहील. कायदेशीर प्रकरण मार्गी लागतील.

कर्क : सर्दी-खोकल्यामुळे हैराण
सर्दी खोकल्यामुळे अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार पूर्ण होण्यामध्ये काही अडचणी निर्माण होतील. मित्रांच्या सहकार्यामुळे बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

सिंह : भावासोबतची कटुता दूर होईल
आज एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. भावासोबत निर्माण झालेली कटुता दूर होईल. नवीन लोकांसोबत झालेल्या भेटीगाठींमुळे मन आनंदीत राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. वेतनात वाढ होईल. व्यावसायिक भागीदारीमध्ये फायदा होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील. विखुरलेली कामे पूर्ण करण्यास यश मिळेल. उत्पन्नातील स्त्रोत वाढतील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. धार्मिक यात्रेचा योग आहे. रचनात्मक कामांमधअये प्रगती होईल.

तूळ : कर्ज घेणं टाळा
नवीन योजनांवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आज कर्ज घेऊ नका.कारण त्याची परतफेड करणं कठीण ठरू शकतं. आत्मविश्वासात कमतरता आल्यानं तातडीनं निर्णय घेणे कठीण होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक : चांगला अहवाल येईल
आज गंभीर आजारासंबंधित चांगला वैद्यकीय अहवाल मिळेल, ज्यामुळे मन आनंदीत होईलल. कुटुंबात जल्लोषाचं वातावरण राहील. व्यवसायात प्रगती आणि लाभाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : नातेवाईक नाराज होऊ शकतात
आज कुटुंबातील लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. विरोधक त्रास देऊ शकतात, सतर्क राहा. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. तणावापासून दूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधीच्या अडचणी दूर होतील.

मकर : जंगम-स्थावर संपत्ती खरेदीची योजना
व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागल्यानं दिलासा मिळेल. जंगम स्थावर संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. परदेशी यात्रेचा योग आहे. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.