10 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीला अडकलेला पैसा मिळण्याचा योग

10 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीला अडकलेला पैसा मिळण्याचा योग

मेष : शारीरिक थकावा राहील
आज निरर्थक धावपळीमुळे शारीरिक थकवा आणि अशक्तपणा राहील. व्यवसायात नवीन करार होण्याच्या संधी आहेत. राजकारणात आवड वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

कुंभ : पैशांसंबंधी चांगले वृत्त मिळेल
आयात-निर्यातीच्या व्यवसायासंबंधी अधिक नफा होण्याची शक्यता आहे. पैशांसंबधी चांगली बातमी मिळू शकते. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मीन : चांगल्या संधी गमावू शकता
आळस आणि निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावल्या जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. तरुण क्रीडा यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.

वृषभ : नव्या प्रेम संबंधाची सुरुवात
जुन्या मैत्रीचे नव्या प्रेम संबंधांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. आज प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. धूर्त लोकांपासून सावध राहा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये यश मिळेल. व्यवसायात कष्टाचं पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यामध्ये आणखी आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा
एखादा व्यक्ती तुमचा विश्वास जिंकून तुम्हाला फसवू शकतो. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसंबंधित निर्णय टाळा. जोडीदाराचं भावनिक सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळू शकते.

सिंह : उत्साहीत असाल
आज तुम्ही बऱ्याच दिवसांनंतर उत्साहाचा अनुभव घ्याल. जोडीदारासोबत सामाजिक समारंभामध्ये आनंद अनुभवाल. राजकारणातील जबाबदारी वाढू शकतात. रखडलेली कामे बिघडतील. विरोधक पराभूत होतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : प्रेमात कठीण काळ
प्रेमामध्ये अपयश मिळू शकते. तुमच्या जिद्दी व्यवहारामुळे पार्टनरसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहा. व्यावसायिक परेदश यात्रेचा योग आखला जाऊ शकतो. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

तूळ : अडकलेला पैसा मिळण्याचा योग
आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जंगम-स्थावर संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. पैसा गुंतवण्याची शक्यता आहे. पार्ट-टाइम काम करून संधी मिळू शकते. आत्मविश्वासात वाढ होईल.

वृश्चिक : आरोग्य खराब होऊ शकते
आज आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे किंवा एखादी दुखापत होऊ शकते. व्यर्थ तर्क-वितर्कामुळे वेळ आणि पैशांचे नुकसान होऊ शकते. प्रवासाचा योग आहे. नात्यात गोडवा येईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : नात्यातील नवलाई
नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. व्यवसायात एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे मदत मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. सामाजिक सन्मान आणि पैशांमध्ये वाढ होईल.

मकर : नोकरीमध्ये निरर्थक गुंतागुंत
व्यवसायात कष्ट अधिक आणि लाभ कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निरर्थक गुंतागुंत राहील. विवाहाच्या प्रकरणात होणारे प्रयत्न यशस्वी होतील. विवादास्पद प्रकरणे संवादानं सुटतील.