12 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, धनु राशीला पूर्वजांची मालमत्ता मिळण्याची शक्यता

12 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, धनु राशीला पूर्वजांची मालमत्ता मिळण्याची शक्यता

मेष : अचानक धनलाभ होण्याची शक्यता
आजचा दिवस जोडीदारासोबतच्या खरेदीमध्ये व्यतित होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मंगल कार्यांची योजना आखली जाऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्यासोबत रोमँटिक भेट होण्याची शक्यता आहे.

कुंभ : कुटुंबीयांसोबत सुखद वेळ
आजच्या दिवशी कुटुंबीयांसोबत सुखद क्षण व्यतित होतील. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार मित्रांच्या सहकार्यामुळे पूर्ण होतील. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

मीन : कामाच्या ठिकाणी बदलाची शक्यता
आज व्यवसायात काही समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढू शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो.

वृषभ : मौल्यवान वस्तू चोरी होऊ शकतात
आज नात्यांमध्ये देवाणघेवाण करू नका, संबंध बिघडण्याचा होण्याचा धोका आहे. मौल्यवान वस्तू चोरी होऊ शकतात. आर्थिक प्रकरणांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. वादांपासून दूर राहा. राजकारणात सक्रियता वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : आरोग्य खराब होऊ शकतं
आरोग्याच्या प्रकरणात थोडेसे अस्वस्थ होऊ शकता. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या निमित्तानं घरापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

कर्क : विवाहाचे योग
अविवाहितांसाठी अनुकूल वेळ आहे. विवाहसाठी योग आहेत. प्रभावशाली व्यक्तींसोबत झालेली भेट फायदेशीर राहील. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. अचानक एखाद्या ठिकाणी प्रवासाची योजना आखली जाऊ शकते.

सिंह : मुलाखतीत यश मिळू शकते
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल. इच्छित नोकरीचा शोध पूर्ण होईल. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : आर्थिक प्रकरणात धोका मिळू शकतो
आज व्यावसायिक प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळा. आर्थिक देवाणघेवाणीमध्ये धोका मिळू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश मिळू शकते. निरर्थक वादांपासून दूर राहा.

तूळ : काही नवे करण्यासाठी उत्साहित
आज तुमचं मन काही नवीन करण्यासाठी उत्साहित असेल. अपत्याच्या दायित्वांची पूर्तता होईल. जुन्या मित्रांसोबत भेट फायदेशीर ठरू शकते. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल.

वृश्चिक : जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता
आज नकळतपणे सांगितलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी चुकीची ठरू शकते. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढू शकते. व्यवहाराच्या प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : पूर्वजांची मालमत्ता मिळू शकते
वडिलांच्या सहकार्यामुळे पूर्वजांची मालमत्ता मिळू शकते. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्र आत्मसात केल्यानं फायदा मिळेल. नवीन वाहन खरेदी योजना देखील आखली जाऊ शकते. जोडीदारासोबत भ्रमंतीचा योग आहे.

मकर : मन अशांत राहील
आज मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव होऊ शकतो. मन अशांत राहील. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबात सुख-सुविधांचा विस्तार होईल. परदेश यात्रेचा योग आहे.