13 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला मित्रांकडून महागडे गिफ्ट मिळू शकते

13 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला मित्रांकडून महागडे गिफ्ट मिळू शकते

मेष : विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटू शकते
आज विद्यार्थ्यांचं मन अभ्यासावरून भरकटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी थोडासाही निष्काळजीपणा केल्यास पदोन्नतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. एखाद्या वृत्तामुळे मनामध्ये भीती निर्माण होईल. अध्यात्मकडे आवड वाढू शकते. नवीन संपर्क निर्माण होतील.

कुंभ : आरोग्य अचानक खराब होऊ शकते
वडिलांचं आरोग्य अचानक खराब होऊ शकते. व्यवसायातही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा आणि पैशांमध्ये वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मीन : जुने वाद मिटतील
मित्रांना दिलेले वचन पूर्ण करण्यात यश मिळेल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासामुळे प्रत्येक अडचणींचा सहज सामना कराल. जोडीदारासोबत सुमधुरता कायम असेल. आज एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

वृषभ : मित्रांकडून महागडे गिफ्ट मिळू शकते
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती कायदेशीर स्वरुपात मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून एखादे महागडी भेटवस्तू मिळू शकते. व्यावसायिक यात्रा फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : हलगर्जीपणामुळे नुकसान होऊ शकते
कामाच्या प्रति हलगर्जीपणा दाखवणे नुकसानदायक ठरू शकते. निष्काळजीपणामुळे व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठाच्या व्यवहारामुळे अस्वस्थ होऊ शकता. वादांपासून दूर राहा. अपत्याकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क : जोडीदाराची प्रकृती बिघडू शकते
जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि दिनक्रमाची विशेष काळजी घ्या. ज्या कामामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, ते पूर्ण होण्याची संधी आहे. व्यवहारासंदर्भात सावधगिरी बाळगा, खर्च वाढू शकतात.

सिंह : वरिष्ठ तुमचं म्हणणं ऐकतील
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. वरिष्ठ तुमचे म्हणणे ऐकतील. सर्व आवश्यक कामे सहजरित्या पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ व्यतित होईल. प्रतिष्ठित व्यक्तींसोबत झालेल्या भेटीमुळे फायदा होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : यश मिळण्याची शक्यता
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली महत्त्वपूर्ण कामांना गती येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रेम प्रकरणामध्ये यश मिळू शकते. कौंटुंबिक वातावरण हसतेखेळते राहील.

तूळ : अपत्यावर पैसा खर्च होऊ शकतो
आज कमी पैशांच्या लोभापायी एखादी स्वस्त वस्तूची खरेदी करू नका. नंतर पश्चाताप होऊ शकतो. अपत्यावर अनावश्यक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल
जोडीदाराच्या मधुमेहसारख्या आजारात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळतील. सामाजिक कामांमध्ये आवड वाढू शकते. आर्थिक परिस्थिती राहील. मित्रांचं सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : कौंटुबिक तणाव वाढू शकतो
आज शब्दा-शब्दावरून कौटुंबित तणाव वाढण्याची शक्यता आहे. वयोवृद्धांच्या आरोग्याची चिंता राहील. कामानिमित्तानं घरापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. व्यवहाराच्या प्रकरणांमध्ये सतर्क राहा.

मकर : उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल
आज कौटुंबित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कायदेशीर प्रकरणांमुळे व्यस्त राहू शकता.