14 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीच्या संपत्ती वाढ होण्याची शक्यता

14 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीच्या  संपत्ती वाढ होण्याची शक्यता

मेष : प्रेमींना मिळू शकतो मार्ग
प्रेमींना त्यांचा मार्ग मिळू शकतो. नात्यामध्ये आलेली कटुता दूर होईल. जोडीदारासोबत मौज-मजेचं वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे जबाबादारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल.

कुंभ : संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते
आज पैशांसंदर्भात आनंदाचे वृत्त मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते.र राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या काम पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. 

मीन : मानसिक तणाव राहील
आज मानसिक तणाव आणि स्वभाव चिडचिडा होईल. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा होऊ शकतो. आत्मविश्वासात कमतरता येईल. प्रियकराकडून भावनिक सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृषभ : व्यावसायिक करार रद्द होऊ शकतात
आजचा दिवस आव्हानात्मक असेल. व्यावसायिक करार मिळवण्यात अपयश येईल. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. कोर्ट-खटल्याच्या प्रकरणामुळे अस्वस्थ असाल. मित्रांच्या सहकार्यामुळे कामे सहज होतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : बहुमूल्य वस्तू/ संपत्ती मिळू शकते
आई-वडिलांकडून बहुमूल्य वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यस्तता अधिक राहील. व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधानी बाळगा.

कर्क : अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज
आज निरर्थक धावपळ होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष देणे गरजेचं आहे. व्यावसायिक प्रकरणात सावधगिरी बाळगा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येईल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

सिंह : आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतो
आज डोळे किंवा डोके दुखीमुळे त्रस्त होऊ शकता. मन अशांत राहील. कामाच्या ठिकाण बदलण्याचा योग आखला जाईल. भाऊ-बहिणींचं सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : संबंध मधुर होतील
चांगल्या भावनात्मक व्यवहारामुळे संबंध सुमधुर होतील. लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. राजकीय परिस्थिती मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल.

तूळ : विशेष उपलब्धता मिळेल
आज शिक्षण किंवा स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष उपलब्धता मिळण्याचा योग आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. महत्त्वपूर्ण काम सर्वात आधी करून घ्या. कुटुंबीयांसोबत मौज-मस्तीचं वातावरणं राहील. रचनात्मक कामांमध्ये मन रमेल.

वृश्चिक : पैसा अडकण्याची शक्यता
आज पैशांचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. पैसा अडकण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तणाव वाढण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. मित्रांकडून व्यवसायात सहकार्य मिळेल. बऱ्याच दिवसांपासून अडलेली योजना पूर्ण होतील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : उत्साहित असाल
आज उत्साहित असाल. आरोग्य ठीक राहील. पैशांसंबंधीचा त्रास दूर होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. अपत्याच्या दायित्वांची पूर्तता होईल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

मकर : प्रेम संबंधांमध्ये तणाव
प्रेम संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मनमौजी व्यवहारामुळे नाराज व्हाल. दुसऱ्यांच्या नादात खासगी निर्णय बदलण्याची वेळ येऊ शकते. अपत्यासंबंधीच्या जबाबदारी पूर्ण कराल. सध्या प्रवास करणं टाळा.