15 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीची नव्या प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते

15 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीची नव्या प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते

मेष : शारीरिक थकवा जाणवेल
आज निरर्थक धावपळीमुळे हैराण असाल. शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबतचे प्रेम कायम राहील. अचानक धन लाभ होऊ शकतो.

कुंभ : प्रियकरासोबत तणाव वाढू शकतो
जोडीदार किंवा प्रियकरासोबत तणाव वाढू शकतो. कौंटुबिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींपासून सतर्क राहा. कटु शब्दांचा प्रयोग करू नका. विरोधक त्रास देऊ शकतात. व्यावसायिक संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय तर्काच्या आधारावर घ्या.

मीन : पैसा मिळण्याची शक्यता
अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. प्रियकराकडून महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन सहकारी मिळतील. तुमच्या कामाच्या शैलीमुळे पदोन्नती वाढण्याची शक्यता आहे. आत्मसन्मानात वाढ होईल. राजकारणात आवड वाढेल.

वृषभ : एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल
जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात. जोडीदारासोबत नात्यात गोडवा कायम राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : नवे काम सुरू करण्याची योजना टाळा
आज नवे काम सुरू करण्याची योजना टाळा. विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. विरोधकांपासून सतर्क राहा. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अध्यात्म आणि योगमध्ये मन रमेल.

कर्क : प्रॉपर्टीमुळे मिळेल लाभ
वारसाहक्कामध्ये मिळालेली संपत्तीमुळे लाभ मिळेल. व्यावसायिक योजनांमुळे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. विरोधकांचा पराभव होईल. रचनात्मक क्षेत्रात प्रसिद्धी मिळू शकते. प्रेमामध्ये त्रिकोणाची स्थिती निर्माण होऊ शकते.

सिंह : व्यावसायिक अडचणी येऊ शकतात
चांगले निकाल येण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक अडचणी येऊ शकतात. राजकीय सहकार्यामुळे यश मिळू शकते. आर्थिक प्रकरणांमध्ये जोखीम स्वीकारू नका. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : आजारामुळे अस्वस्थ असाल
आरोग्याप्रति सावधगिरी बाळगा. आजारपणामुळे अस्वस्थ होऊ शकता. व्यापाराच्या प्रकरणात दिवस सुखद असेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. एखाद्या संस्थेकडून सन्मान मिळू शकतो. मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल.

तूळ : नवीन प्रेम संबंध स्थापित होतील
नव्या प्रेम संबंधांची सुरूवात होऊ शकते. एखाद्या आदर्श व्यक्तीसोबत मनातील गोष्ट शेअर करू शकता. भावनात्मक स्तरावर सुधारणा येईल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. व्यवसाय संबंधी यात्रेची शक्यता आहे.

वृश्चिक : अभ्यासात आवड वाढेल
विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढण्याची शक्यता आहे. राजकीय कार्यांसंबंधित जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी चांगली संधी उपलब्ध होईल. जोडीदारासोबत यात्रेचा योग आहे. रखडलेले कामे पूर्ण होतील. आरोग्य ठीक राहील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

धनु : आर्थिक नुकसानीचा सामना
आज व्यावसायिक करार सुरू करण्यात घाई करू नका. आर्थिक निर्णय विचारविनिमयपूर्वक घ्या. नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. प्रभावशाली लोकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.

मकर : आरोग्यात सुधारणा होईल
जोडीदाराच्या बिघडलेल्या प्रकृतीत सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विरोधक पराभूत होतील. आर्थिक पक्ष भक्कम होईल. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. परेदश यात्रेवर जाण्याची शक्यता आहे.