18 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीला अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता

18 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीला अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता

मेष : वृद्धांच्या आरोग्यात होईल सुधारणा
कुटुंबात आजारी असणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणार होण्याची संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवहाराच्या प्रकरणात सतर्क राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कुंभ : विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील
कामाच्या ठिकाणी आपली क्षमता सिद्ध करण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील. व्यावसायिक यात्रेचा योग आहे. सामाजिक संस्थेद्वारे सन्मान होण्याची शक्यता आहे. नवीन संपर्कांमध्ये सावधगिरी बाळगा.

मीन : पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा
एखादी महत्त्वपूर्ण कागदपत्रं हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. पैशांच्या व्यवहारात विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येईल. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

वृषभ : कोणच्याही प्रेम संबंधामध्ये डोकावू नका
एखाद्या प्रेम संबंधांमध्ये डोकावू नका. नाते बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रकरणात राग येऊ शकतो. प्रॉपर्टी संबंधी निर्णय घाईगडबीत घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सतर्क राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते
जोडीदार आणि मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. एखाद्या खास व्यक्तीकडे ओढ वाढेल. परदेश यात्रेचा योग आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

कर्क : तणाव वाढू शकतो
कौटुंबिक समस्यांमुळे तणाव वाढू शकतो. एखाद्या मित्राची प्रकृती अचानक खराब होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्रात योजनेविना काम करू नका. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अधिक चांगली होण्याची शक्यता आहे.

सिंह : कुटुंबात उत्साह संचारेल
तुमच्या प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साह संचारेल. व्यवसायात नवीन सहकर्मचारी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : पदोन्नतीमध्ये बाधा येण्याची शक्यता
काम लवकर आटोपण्याच्या नादात मोठी चूक होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. धूर्तांपासून सतर्क राहा. आरोग्याच्या प्रकरणात सतर्क राहा. पार्टनरचं सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

तूळ : अडकलेला पैसा मिळण्याचा योग
आज अडकलेला पैसा मिळण्याचा योग आहे. जंगम-स्थावर संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. पैसा गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता.

वृश्चिक : आर्थिक नुकसानाची शक्यता
व्यवसायात निष्काळजीपणा करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल करावे लागतील. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकतो. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढेल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

धनु : आईच्या प्रकृतीमुळै हैराण
आईची प्रकृती बिघडल्यानं तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. स्वभाव चिडचिडा होईल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणसंबंधी समस्या दूर होतील.

मकर : नव्या प्रेम संबंधांची सुरुवात
एखाद्याच्या आकर्षणात तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. आज प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. धूर्तांपासून सतर्क राहा.