2 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मिथुन राशीला व्यवसायात धनलाभाची शक्यता

2 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मिथुन राशीला व्यवसायात धनलाभाची शक्यता

मेष : नवीन मित्र बनतील
आज मन आनंदीत असेल. जी लोक विरोध करत होते, आता त्यांचं सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात नवीन मित्र येतील. प्रियकरासोबत मौज-मजेचं वातावरण असेल. एखाद्या संस्थेद्वारे सन्मान होण्याची शक्यता आहे.

कुंभ : मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते
मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकतात. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यशैलीमुळे कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. आत्मसन्मानात वाढ होईल. राजकीय आणि धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल.

मीन : वडिलांचे आरोग्य बिघडू शकते
वडिलांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. कामाच्या ठिकाणी वैचारिक मतभेद दूर होतील. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

वृषभ : वरिष्ठ त्रास देण्याची शक्यता
आज सहकर्मी तुमच्या कामात अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणादरम्यान काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीनं बिघडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आरोग्याप्रकरणी सतर्क राहा. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : व्यवसायात धन लाभ होईल
जोडीदाराच्या सहकार्यामुळे व्यवसायात धन लाभाची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. एखाद्या व्यक्ती प्रकरणी आकर्षण वाढण्याची शक्यता आहे. भावनिक पातळीवर भक्कम असाल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वेळ आहे. महत्त्वाची काम आधी पूर्ण करा.

कर्क : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
व्यवसायात निष्काळजीपणा करू नका. करार रद्द होण्याची शक्यता आहे. घाईमध्ये घेतलेले निर्णय बदलावे लागतील. जोडीदारासोबतचे नाते सुमधुर राहतील. रचनात्मक कामांमध्ये आवड निर्माण होईल.

सिंह : जुना आजार पुन्हा उद्भवल्यानं त्रस्त
जोडीदाराचा जुना आजार उद्भवल्यानं अस्वस्थ असाल. कौटुंबिक संबंधांमध्ये मधुरता येईल. असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे सामाजिक सन्मानावर वाईट परिणाम होतील. अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : नवीन प्रेमसंबंध तयारी होतील
नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखाद्या आदर्श व्यक्तीसोबत मनातील गोष्ट शेअर करू शकता. भावनिक पातळीवर सुधारणा होईल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

तूळ : विद्यार्थ्यांचे उद्देश यशस्वी होतील
विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांमुळे त्यांच्या उद्देशांमध्ये यश मिळेल. व्यवसायात गती येईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी संतुष्ट असतील. जोडीदारासोबत सामाजिक समारंभात जाण्याची संधी मिळेल.

वृश्चिक : आर्थिक संकटाची शक्यता
आयात-निर्यातीशी संबंधित लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.महागडी वस्तूची खरेदी करू नका. संपत्ती प्रकरणात कौटुंबित अडचणी येऊ शकतात. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागतील. आरोग्यासंबंधी सावधगिरी बाळगा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : आरोग्यात सुधारणा होईल
आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीविरोधात लढण्यात तयार असाल. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

मकर : जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो
जोडीदार किंवा प्रियकरासोबत तणाव वाढण्यासाठी शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अडचणींपासून सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतात. महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय तर्क लावून घ्या.