22 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, मिथुन राशीला मिळणार नवीन नोकरी

22 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, मिथुन राशीला मिळणार नवीन नोकरी

मेष -  आरोग्य बिघडेल

आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध राहील. राजकारणातील कामे वाढतील. अनुभवी व्यक्तीकडून मदत होईल. विनाकारण खर्च करू नका. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 


कुंभ -  नवीन कामे मिळतील

आज तुमची व्यवसायासाठी दगदग होण्याची शक्यता आहे. नवीन कामे वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुख-समृद्धी वाढणार आहे. मित्र परिवारासोबत फिरायला जाण्याची योजना आखाल.


मीन-  दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमावाल

आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे एखादी चांगली संधी गमवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या, पैशांबाबत एखादी आनंदवार्ता समजण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. 

 

वृषभ -  नवीन प्रेमसंबध निर्माण होतील

आज तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. एखाद्या सहकाऱ्यासोबत ओढ वाटेल. भावंडांमधील कडवटपणा कमी होईल. व्यवसायात राजकारणातील लोकांमुळे मदत होईल. आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन - नोकरीचा शोध संपेल

आज तरूणांना मनासारखी नोकरी मिळेल. कामाच्या ठिकाणी काम करण्याचा उत्साह वाढणार आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामातील रस वाढेल. 


कर्क - आर्थिक स्थिती बिघडणार आहे

आज अचानक खर्च वाढल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. बिघडलेली कामे सुधाराल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. प्रवासाला जाणे अचानक रद्द करावे लागेल. 


सिंह -  आईवडीलांच्या आरोग्यात सुधारणा होईल

आज तुमच्या आईवडीलांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. दिवस परोपकार करण्यात जाईल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. 


कन्या - तणाव वाढेल

आज तुमच्या जोडीदाराच्या वागण्यामुळे तुमचा तणाव वाढणार आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


तूळ - रखडलेली कामे पूर्ण होतील

आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामांचा विस्तार वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - पोटदुखी होण्याची शक्यता 


आज तुमच्या पोटात वेदना होण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध राहा. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. धुर्त लोकांपासून सावध राहा. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. 

 

धनु - आनंदाची बातमी मिळेल

आज तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. जोडीदारासोबत जवळीक वाढेल. भावनिक समाधान मिळणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमचे कौतुक करतील. 


मकर - नवीन कामाची सुरूवात कराल 

आज तुम्ही नवीन कामाची सुरूवात कराल. व्यावसायिक गोष्टींमध्ये जोखीम घेऊ नका. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मिळण्याची शक्यता आहे. आईवडीलांची साथ मिळेल. 

 

 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'