28 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मेष राशीच्या सुखसाधनात वाढ

28 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मेष राशीच्या सुखसाधनात वाढ

मेष -  सुख साधनांमध्ये वाढ होईल

सुखसाधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीसाठी चांगला खरेदीदार मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी मदत करतील. रचनात्मक कार्यात मन रमवाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कुंभ -  हेल्थ रिपोर्ट चांगले असतील

आज घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आजारपणाचे रिपोर्ट चांगले येतील. संपूर्ण दिवस उत्साहाचा असेल. घरातील मंडळींसोबत आनंद साजरा कराल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. 


मीन-  शेजाऱ्यांकडून ताणतणाव जाणवेल

आज तुम्हाला प्रिय व्यक्तीमुळे एखाद्या तणावाला सामोरे जावे लागेल. शेजाऱ्यांशी वाद वाढण्याची  शक्यता आहे. त्वरीत लाभ मिळवण्यासाठी तडजोड कराल. व्यावसायिक प्रवासाचा योग आहे. 


वृषभ - थकवा आणि अशक्तपणा येण्याची शक्यता

आज दिवसभर तुमची दगदग होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता  आहे. जोडीदाराकडून भावनात्मक सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. 


मिथुन - एखाद्या प्रभावी व्यक्तीबद्दल आकर्षण जाणवेल

आज तुमचे मन एखाद्या प्रभावी व्यक्तीकडे आकर्षित होणार आहे. महत्त्वाच्या लोकांची ओळख मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. आधात्म आणि योगामध्ये रस वाढेल. 


कर्क - दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

दुर्लक्षपणामुळे तुम्ही  आज एखादी चांगली संधी गमवणार आहात. कामच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यक्रमातून प्रतिष्ठा आणि संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. 


 सिंह - कौटुंबिक संपत्तीत वाढ होण्याची शक्यता

आज तुमच्या कौटुंबिक संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू होणार आहे. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. 


कन्या - आयात निर्यातीच्या व्यवहारात समस्या

आज आयात - निर्यातीतील व्यवसायाशी निगडीत लोकांना समस्या जाणवतील. गुंतवणूक करताना सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल. उत्पन्नांचे साधन वाढेल. 


तूळ - आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका

आज एखाद्या किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम मिळेल. देणी - घेणी करताना सावध राहा. जोखिमेची  कामे करू नका. जोडीदाराची साथ मिळेल. 


वृश्चिक -  भावंडाचे वाद मिटतील

आज तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. भावंडांमधील वाद कमी होतील. नवीन लोकांशी ओळख वाढेल. मन प्रसन्न राहील. सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक भागिदारीत नफा जाणवेल.


धनु - नवीन नोकरी मिळेल

आज तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळेल. मीडिया लेखन क्षेत्रातील काम मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या समस्या सुटणार आहेत. 


मकर -  मौल्यवान वस्तू खराब होईल

आज तुम्हाला एखाद्या मौल्यवान वस्तूला गमवावं लागणार आहे. वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी