29 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आनंदवार्ता

29 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आनंदवार्ता

मेष -कोणाच्या प्रभावखाली येऊ नका

जोडीदारावर अविश्वास ठेवल्यामुळे नातं खराब होईल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. नवीन कामांचा फायदा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कुंभ - मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

आज तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी  घेण्याची गरज आहे. अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. जोखिमेच्या कामांपासून दूर राहा. कौटुंबिक साथ मिळेल. धनसंपत्तीबाबत सावध राहा. 


मीन- आरोग्य सुधारेल

आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अधिक मेहतन करण्याची गरज आहे. रचनात्मक कामात प्रगती होईल. वाहन चालवताना सावध राहा. 


वृषभ -धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळेल

आज धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळेल. व्यवसायातील योजना यशस्वी होतील. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. सन्मानात वाढ होईल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


मिथुन - दुखणे वाढण्याची शक्यता आहे

आज तुमच्या खांद्याचे दुखणे वाढणार आहे. राग आणि चिडचिड जाणवेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. व्यवसायातील रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


कर्क - कौटुंबिक वाद दूर होतील

सासरच्या मंडळींकडून आनंदवार्ता मिळेल. कौटुंबिक वाद दूर होतील. व्यवहारातील समस्या दूर होतील. वाहन चालवताना सावध राहा. सामाजिक समारंभात मित्र भेटतील.


सिंह -व्यवसायातील समस्या वाढतील

व्यवसायातील कामे पूर्ण होतील. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका. अधिकारी तणाव वाढण्याची शक्यता आहे. मुलांची कर्तव्य पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. 


कन्या - कौटुंबिक संपत्ती मिळेल
आईवडीलांकडून संपत्ती मिळेल. व्यावसायित कामे मिळण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्यामुळए व्यवसायात प्रगती होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. 


तूळ -विद्यार्थी भटकतील

काही विद्यार्थ्यांचे मन भटकण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे काम करण्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे येतील. आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक - आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे

बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. जोडीदाराची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. छोट्या छोट्या गोष्टींचा राग करू नका. 


धनु - भरपूर प्रेम मिळेल

आज एखाद्या व्यक्तीला भरपूर प्रेम मिळण्याची शक्यता आहे. भावंडांच्या मदतीने नवीन कामाला सुरूवात कराल. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक मानसन्मानात वाढ होईल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे सर्वात आधी करा. 


मकर - विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. व्यवसायात नवीन संधी मिळतील. सहकाऱ्याकडून मदत मिळेल. रोमांटिक होण्यासाठी अनुकूल काळ आहे. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'