3 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

3 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

मेष : अपचनाची तक्रार होऊ शकते
आज अपचनाची तक्रार निर्माण होऊ शकते. खाण्यापिण्याची सवयीमध्ये सावधगिरी बाळगा. सहकर्मचारी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात. कामे वेळेच्या आतमध्ये पूर्ण करण्याची सवय लावून घ्या.वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कुंभ : कुटुंबात तणावाच्या परिस्थितीची शक्यता
बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यापारात नफा आणि नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळू शकेल.

मीन : कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये त्रिकोणाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. कटु शब्दांचा प्रयोग करणं टाळा.

वृषभ : जुन्या संपर्कांमुळे लाभ मिळण्याची शक्यता
विवाह योग्य तरुणांना चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये सर्व कामे पूर्ण करण्याची सवय लावून घ्यावी. यश मिळेल. जुन्या संपर्कांमुळे लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी योग्य संधी आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
व्यवसायात कामाची गती कमी झाल्यानं अस्वस्थ राहाल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकता. प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतात. कुटुंबातील वातावरण मौज-मजेचं राहील. खूप सुखद यात्रेचा योग आहे.

कर्क : नवे काम सुरू करण्याची योजना
आज भागीदारीमध्ये नवे काम सुरू करण्याची योजना आखली जाण्याची शक्यता आहे. पैशांसंदर्भात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान सतर्क राहा. आरोग्य ठीक आहे.

सिंह : निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावण्याची शक्यता
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावल्या जाण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये एखाद्या वरिष्ठाच्या व्यवहारामुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने कामे करा. वादांपासून दूर राहा. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आरोग्य ठीक राहील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : आजारापणामुळे त्रस्त राहाल
आरोग्याप्रति सावधगिरी बाळगा. आजारपणामुळे त्रस्त राहण्याची शक्यता. खाण्यापिण्याच्या सवयीमुध्ये निष्काळजीपणे वागू नका. व्यापारासाठी दिवस सुखद राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे.

तूळ : अपत्याकडून खूशखबर मिळण्याची शक्यता
तुमच्या प्रेमळ आणि काळजी करणारा स्वभाव सदस्यांना उत्साहित करेल. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकारी मिळतील. नवी संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाईल.

वृश्चिक : विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात कष्टाचं पूर्ण फळ मिळेल. वाढत्या खर्चांमुळे नवीन काम सुरू करू शकता. सामाजिक कार्यांमध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : फसवणुकीला बळी पडू शकता
एखादा व्यक्ती तुमचा विश्वास जिंकून फसवणूक करण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेणे टाळा. एखाद्या व्यावसायिक करारासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

मकर : मानसिक ऊर्जेमध्ये वाढ होईल
आज आराम आणि चिंतन करण्याची वेळ आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणे करू नका. मानसिक ऊर्जेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संपर्कांमुळे लाभ मिळतील. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.