4 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, सिंह राशीला धनलाभ होण्याची शक्यता

4 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, सिंह राशीला धनलाभ होण्याची शक्यता

मेष : आर्थिक बाजू मजबूत राहील
आज तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. पैसा, सन्मान आणि यशात वाढ होईल. काही कामे वेळेत पूर्ण होताना दिसतील. नवीन व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. सुख-सुविधांच्या साधनांमध्ये वाढ होईल.

कुंभ : वृद्धांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता
कुटुंबात आजारी असलेल्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मीन : कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता
कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वाद करणं टाळा. धार्मिक कामांमध्ये श्रद्धा वाढू शकते. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृषभ : अपत्यामुळे चिंता वाटू शकते
अपत्यामुळे चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. आज व्यावसायिक किंवा कौटुंबिक तणाव मिळू शकतो. जोडीदाराचं सहकार्य आणि सानिध्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. राजकारणात जबाबदारी वाढू शकतात.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : काही भेटी नात्यात बदलू शकतात
कौटुंबिक आयोजनांमुळे दुरावा कमी होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत झालेली अचानक भेट प्रेम संबंधांमध्ये बदलू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.

कर्क : विद्यार्थ्यांचं मन अभ्यासावरून भरकटेल
आज विद्यार्थ्यांचं मन अभ्यासावरून भरकटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा दाखवल्यास करार रद्द होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहकार्य मिळेल. आवश्यक कामे योग्य वेळेत पूर्ण होतील. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह : भेटवस्तू किंवा पैसा मिळण्याची शक्यता
सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये नवीन व्यवसाय सुरू करू शकता. अडकलेल पैसा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची कला आणि संगीतात आवड वाढेल. प्रवासाचा योग आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : करिअरमध्ये नुकसान होण्याची शक्यता
टाळमटाळ करण्याच्या सवयीमुळे आज करिअरमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी इच्छित काम न मिळाल्यानं अस्वस्थ होऊ शकतात. वरिष्ठांसोबत तणाव वाढू शकतो. वाणीवर नियंत्रण राखा. कायदेशीर प्रकरणांमध्ये विजय होईल.

तूळ : मन उदास आणि अस्वस्थ राहील
आज मन उदास आणि अस्वस्थ होऊ शकते. स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काम करताना अडचणी येतील. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा. मित्रांसोबत झालेल्या भेटीगाठी सुखद असतील.

वृश्चिक : कौटुंबिक प्रकरण मार्गी लागतील
कौटुंबिक प्रकरणे वृद्धांच्या सल्ल्यामुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे. सामाजिक संपर्क वाढू शकतो. गरजवंतांना मदत केल्यानं आनंद मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि पैशांमध्ये वाढ होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : करिअरमध्ये चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात
आज नशीब तुमहाला साथ देईल. तरुणांना करिअरमध्ये चांगले पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी ओळखीचा लाभ मिळेल. व्यवसायात राजकारणामुळे सहकार्य मिळू शकते.

मकर : आरोग्यावर पैसा खर्च होऊ शकतो
आज एखाद्या नवे काम सुरू करणं टाळा. आरोग्यावर पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबतच्या भेट सुखद असतील. वादांपासून दूर राहा. महत्त्वपूर्ण रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.