6 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीच्या तरुणांना मिळेल यश

6 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीच्या तरुणांना मिळेल यश

मेष : आरोग्य ठीक राहील
आरोग्य ठीक राहील. काही नवीन करण्यासाठी उत्साहित राहाल. नोकरीमध्ये बदलाची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रियकरासोबतची भेट सुखद ठरेल.

कुंभ : तरुणांना यश मिळू शकते
तरुणांना रोजगाराच्या दिशेनं यश मिळू शकते. नव्या करारासाठी तयार करण्यात आलेली योजना यशस्वी होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मीन : व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते
महत्त्वपूर्ण दस्तावेज हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. पैशांसंबंधी सावधगिरी बाळगा. आत्मविश्वासात कमतरता येईल. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

वृषभ : प्रेमात त्रिकोणाच्या स्थितीची शक्यता
प्रेमात त्रिकोणाची स्थिती बनण्याची शक्यता आहे. तुमच्या हट्टी व्यवहारामुळे पार्टनरसमोर समस्या निर्माण होऊ शकतात. प्रतिस्पर्धी अयशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहा. व्यावसायिक परदेश यात्रेचा योग आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : व्यवसायात नवीन करार मिळू शकतील
आज भाग्योदयाचा दिवस आहे. आयुष्यात सर्व काही सकारात्मक होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल.

कर्क : आजाराकडे दुर्लक्ष करू नका
छोट्याशा आजाराकडेही दुर्लक्ष करू नका, कारण नंतर ही गोष्ट महागात पडू शकते. प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. राजकीय जबाबदारी वाढू शकतात. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

सिंह : नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता
जुनी कटुता दूर होईल. नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदत मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. सामाजिक सन्मान आणि पैशांमध्ये वाढ होईल.

कन्या : वरिष्ठांसोबत तणाव वाढू शकतो
आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तणाव वाढू शकतो. सुविधेअभावी काम सोडण्याची इच्छा होऊ शकते. राजकारणात जबाबदारी वाढू शकते. वाहन चालवताना आणि व्यवहाराच्या प्रकरणामध्ये सावधगिरी बाळगा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार आणि नोकरीमध्ये पदोन्नतीचा योग आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. एखाद्या व्यक्तीप्रति विशेष ओढ वाढेल.

वृश्चिक : व्यवसायात चढ-उताराची स्थिती
आज कामाच्या ठिकाणी घाईघाई करणं तुम्हाला अडचणीत आणू शकते. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. मित्रांसोबतच्या भेटी सुखद असतील. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

धनु : नकारात्मक विचारामुळे तणाव येऊ शकतो
आज अधिक कष्ट केल्यानं थकवा जाणवू शकते. नकारात्मक विचारामुळे तणाव येऊ शकतो. बिघडलेली कौटुंबिक प्रकरणे मार्गी लागू शकतात. रचनात्मका कामांमध्ये प्रगती होईल. कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : अविवाहितांसाठी अनुकूल वेळ
अविवाहितांसाठी ही वेळ अतिशय अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होतील. प्रवास सामान्य पण फायदेशी असेल. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. राजकारणात आवड वाढेल.