9 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मिथुन राशीनं व्यवहार करणं टाळावं

9 फेब्रुवारी 2020चं राशीफळ,  मिथुन राशीनं व्यवहार करणं टाळावं

मेष : जोडीदारासोबतचे तणाव दूर होण्याची शक्यता
आज अपत्यासंदर्भात एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. जोडीदारासोबतचे तणाव दूर होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांसोबत संवाद घडून आल्यानं मन आनंदीत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. पगारामध्ये वाढ होईल.

कुंभ : व्यवसायात चढ-उताराची स्थिती
व्यवसायात चढ-उताराची स्थिती राहील. मानसिक तणावापासून स्वतःचा बचाव करा. गोड संबंधांमध्ये दुरावा वाढण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढू शकते. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे अन्य स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे.

मीन : दुखण्यामुळे त्रास होऊ शकतो
कंबर किंवा गुडघे दुखीमुळे हैराण होऊ शकता. उत्पन्न-खर्चावर नियंत्रण राखा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. बिघडलेली कामे पूर्ण होतील. प्रियकरासोबतची भेट सुखद असेल. नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात.

वृषभ : तरुणांना नव्या संधी मिळण्याची शक्यता
तरुणांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात ओळख निर्माण करताना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : व्यवहार करणं टाळा
आज व्यवसाय प्रकरणात कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणत्याही मोठ्या व्यवहाराची देवाण-घेवाण करणं टाळा. निरर्थक धावपळ होईल. कौटुंबिक तणाव वाढू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल.

कर्क : आरोग्य सुधारेल
खराब झालेल्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज आराम आणि चिंतन करण्याची वेळ आहे. मानसिक ऊर्जेमध्ये वाढ होईल. व्यवसायात नवीन संपर्कांचा लाभ होईल. नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

सिंह : स्वतःची दिशाभूल होऊ देऊ नका
कौटुंबिक सदस्यांची नाराजी नुकसानकारक ठरू शकते. दुसऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या बोलण्यामध्ये येऊन फसवणूक होऊ देऊ नका. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. व्यापारात नफा आणि कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यात बिघाड होऊ शकतात.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : जंगम-स्थावर खरेदीची योजना
आयात-निर्यातशी संबंधित लोकांना चांगले लाभ मिळू शकतात. जंगम-स्थावर संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. यात्रेचा योग आहे.

तूळ : अधिक कष्टामुळे थकवा होऊ शकतो
अधिक कष्ट केल्यानं थकवा आणि तणाव निर्माण होऊ शकतो. लवकरात लवकर कामे उरकण्याच्या नादात चुका होऊ शकते. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. सामाजिक कार्यांमध्ये वाढ होऊ शकतात. आनंदाची बातमी मिळू शकते.

वृश्चिक : बिघडलेली नाती सुधारतील
मित्रांसोबत बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यात यश मिळेल. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामाजिक समारंभामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणांमध्ध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची आवश्यकता
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. अभ्यासावरून भरकटण्याची शक्यता आहे. धूर्तांपासून सतर्क राहा. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. सुखद प्रवासाचा योग आहे. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर : पैसा मिळू शकतो
सासरच्या मंडळींकडून महागडी भेटवस्तू किंवा धनसंपदा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रेसाठी अनुकूल वेळ आहे. नवीन योजना यशस्वी यशस्वी होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांवर खर्च अधिक होईल. राजकारणामुळे लाभ मिळतील.