मानवाची भावना व्यक्त करण्याची पद्धत फारच वेगळी असते. भावना व्यक्त करताना तुमचे मन आनंदी असेल तर ठिक. पण या भावना व्यक्त करताना जर तुम्ही ताण घेत असाल, रागवत असाल किंवा घाबरत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. आता तुम्ही म्हणाल मानवी भावभावना व्यक्त काही केल्या आपल्याला आवरता येत नाही. ही गोष्ट खरी असली तरीदेखील मानवी भावना आपल्याच नियंत्रणात असतात. तुमच्या भावना तुमच्या शरीरावर कसा परिणाम करता हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट किती महत्वाची आहे ते सुद्धा कळेल.
काही जणांचा राग हा काही केल्या आवरत नाही. त्यांना अगदी क्षुल्लक कारणावरुनही राग येतो. ते अगदी काहीही झाले तरी त्यांचा राग बाहेर काढायला तयार असतात. रागावल्याशिवाय जणू त्यांना जमतच नाही. पण तुम्हाला किंवा तुमच्या आजबाजूला असणाऱ्या तुमच्या जवळच्या व्यक्तिंना तुम्ही असे रागावताना पाहिले असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत हवी की, तुमच्या सतत रागवण्याचा परिणाम हा थेट तुमच्या यकृतावर हो तो.तुम्हाला यकृतासंदर्भातील विकार त्यामुळे होण्याची शक्यता असते.
काही जण सतत दु:खी असतात. त्यांच्यासोबत काहीही झाले तरी त्यातून बाहेर पडण्याचा विचार करण्यापेक्षा ते त्याच दु:खात राहतात. सतत दु:खी राहिल्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत ही बदलून जाते. त्यांना सगळ्या गोष्टीत नकारात्म गोष्टी दिसू लागतात. जर तुम्ही सतत दु:खी राहात असाल तर त्याचा परिणाम थेट फुफ्फुसांवर होतो. यामुळे तुम्हाला सर्दी, कफ होण्याची शक्यता असते. शिवाय तुम्हाला श्वसनाचा विकार होण्याचीही शक्यता असते.
काही जणांना सतत काळजी करण्याची सवय असते काहीही झाले की,ही लोक टेन्शन घेतात. जर तुम्ही असे सतत टेन्शन घेणारे किंवा चिंता करणारे असाल तर तुम्हाला पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. अपचन, पोटदुखी, गॅस सारखे त्रास तुम्हाला होऊ लागतात. जर तुम्ही सतत चिंता करत असाल तर आतापासूनच या गोष्टी सोडून द्या.
काही जण सतत कसल्या ना कसल्या विचारात असतात. ते स्वत:च्या विचारात इतके गुरफटलेले असतात की, त्यांचा अप्रत्यक्षरित्या परिणा तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर होतो.जर तुम्ही सतत ताण घेत असाल तर तुमच्या मेंदूवर ताण येऊ शकतो. मेंदूवर ताण पडल्यामुळे तुम्हाला अन्य काही त्रासही होण्याची शक्यता असते.
मानवी भावनांपैकी आणखी एक भावना असते ती म्हणजे भीतीची. प्रत्येकाला कशाचीना कशाची भीती असते. पण ही भीती सतत वाटत राहिली तर हा त्रास आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. जर तुम्ही सतत कसल्या दडपणाखाली असाल भीती खाली असाल तर तुम्हाला हमखास काही तक्रारी जाणवण्याची शक्यता असते. भीतीचा परिणाम हा थेट तुमच्या मूत्रपिंडावर होतो. त्यामुळे तुम्ही सतत काळजी करत असाल तर ती करण आताच थांबवा
आता जसं आम्ही म्हटलं की, भावना या काही केल्या आवरता येत नाहीत. पण तुमच्या शरीरीवर त्याचे दुष्परिणाम होईपर्यंत तुम्ही ताण घेऊ नका.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.