लग्नयोग म्हणजे नक्की काय आणि हा योग जुळून येतो तरी कसा

लग्नयोग म्हणजे नक्की काय आणि हा योग जुळून येतो तरी कसा

नेहमी आपण थोरामोठ्यांकडून ऐकत असतो की,  लग्नयोग जुळून आला की लग्न होईल. पण लग्नयोग म्हणजे नक्की काय हे माहीत आहे का? आपण फक्त म्हणतो की सारे नशीबाचे खेळ आहेत आणि योग यायला हवा. पण योग जुळून येतो म्हणजे नक्की काय होतं हेदेखील तितकंचं महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर राशीकुंडली काढण्यात येते. या कुंडलीनुसार अभ्यास करून लग्नयोग अर्थात लग्न होण्याचे साधारण वय काय असू शकेल हे सांगता येते. जन्म झाल्याच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती जन्मरास अथवा चंद्ररास असते. तर लग्नकुंडली म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितीजावर जी रास असते त्याला आपली लग्नरास असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास असतो आणि त्यानुसारच लग्नयोग पाहता येतो. कोणीही उठसूठ कुंडली पाहून लग्नाचा योग पाहू शकत नाही. आपले लग्न कसे होईल? प्रेमविवाह होईल की पत्रिका जुळवून केलेला विवाह असेल? आपला जोडीदार कसा असेल? वैवाहिक सौख्य मिळेल की नाही असे अनेक प्रश्न हे प्रत्येकाच्या मनात असतात. याची उत्तरं तुम्हाला नक्की मिळू शकतात. 

लग्नयोग जुळतोय की नाही कळण्यासाठी कुंडलीत काय बघावे?

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसला तरीही त्याची थोडीफार माहिती करून घेतली तर नक्कीच वाया जात नाही. तुम्हालाही नक्की काय आहे यामध्ये रस असेल तर तुम्ही याची माहिती करून घ्या. लग्नयोग आहे की नाही हे पाहण्यासाठी नक्की काय बघायला हवे - 

  • मुलाच्या कुंडलीत चंद्र - शुक्र आणि मुलीच्या कुंडलीमध्ये रवि - शुक्र हे महत्त्वाचे ग्रह बघावे लागतात
  • शनि, मंगळ आणि राहू हे तीन ग्रह विवाहाला विलंब करतात आणि त्याशिवाय विवाहसौख्यामध्येही बाधा आणतात
  • गुरु हा ग्रह नेहमीच शुभ मानण्यात येतो. कुंडलीत गुरू ग्रह कुठे आहे यावर वैवाहिक सौख्य अवलंबून असते
  • सप्तम स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा ग्रह हा विवाहाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा असतो. उदा. जर सप्तम स्थानामध्ये कन्या ही रास असेल तर त्या राशीसाठी बुध हा ग्रह महत्त्वाचा ठरतो. 

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

विवाह होण्याचा योग कसा कळतो?

विवाहयोग्य अर्थात लग्नयोग नक्की कसा बघावा अथवा तो कसा कळतो हा प्रश्न प्रत्येकालाच असतो. पण ज्योतिषशास्त्रात त्याचे काही आराखडे असतात.  त्यानुसार लग्नयोग पाहिला जातो. तुम्हालाही याची माहिती आम्ही देत आहोत. 

  • महिलांच्या कुंडलीत रवि - गुरू एकत्र असतील, रवि हा गुरूपासून पाचव्या अथवा सातव्या स्थानात असेल तर विवाह होतो. तसेच शनि, मंगळ, राहू यापैकी कोणत्याही ग्रहाचा दोष पत्रिकेत नसेल तर लग्नयोग लवकर म्हणजे योग्य वयात होतो
  • पुरुषाच्या कुंडलीत चंद्र आणि गुरू एकत्र  असतील आणि चंद्र गुरूपासून पाच अथवा सातव्या स्थानात असेल तर त्याचा लग्नयोग जुळून येतो
  • लवकर अथवा उशीर विवाह होण्याचे योग हे देश, काळ, जाती आणि समजानुसार बदलू शकतात. पण हा योग असतो.  त्या कालावधीत तुम्ही लग्न करू शकता
  • गोचरीचा गुरू जेव्हा प्रथम, तृतीय, सप्तम अथवा एकादश स्थानामध्ये असतो त्यावेळी लग्नयोग जुळून येतो. त्याचवेळी चंद्र, रवी, शुक्र याचा गुरूशी शुभयोग होत असतो अशी परिस्थिती असेल तेव्हा लग्नयोग जुळून येण्याची दाट शक्यता असते

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

सुखी विवाहाची स्थिती

लग्न केल्यानंतर आपला संसार सुखाचा व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं. चंद्र - गुरू, रवि - गुरू, सप्तमस्थानाचा ग्रह आणि गुरू यांचा शुभयोग असेल तर त्या व्यक्तींचे विवाह सुखकारक होतात. वैवाहिक जीवनात कोणतेही वादळ येत नाही. ज्या स्थानात गुरू आहे त्यापासून पाचवे, सातवे आणि नववे स्थान इथे रवि, चंद्र अथवा सातव्या स्थानाचा ग्रह असल्यास, शुभयोग जुळून येतो.

लग्नाआधी नक्की का जुळवली जाते पत्रिका, ही आहेत प्रमुख कारणे

 

प्रेम विवाहाची स्थिती

प्रत्येकालाच आपला प्रेमविवाह व्हावा असे वाटत असते. पण त्यासाठी कुंडलीत तसे ग्रहही असावे लागतात. त्यासाठी पाचवे आणि सातवे स्थान महत्त्वाचे आहे. चंद्र - गुरू, रवि - गुरू यांचा शुभयोग असल्यास, प्रेमविवाह होण्याची दाट शक्यता असते. तसेच यांचा विवाह टिकून राहातो. यासाठी पाचवे आणि सातवे स्थान एकमेकाला पूरक असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.