घरीच नैसर्गिक पद्धतीने प्रेगंन्सी टेस्ट करून ओळखा 'गूडन्युज'

घरीच नैसर्गिक पद्धतीने प्रेगंन्सी टेस्ट करून ओळखा 'गूडन्युज'

गरोदरपणाचा काळ हा एक सुखद आणि आनंददायी काळ असतो. लग्नानंतर बाळाची वाट पाहणाऱ्या जोडप्यासाठी आई-बाबा होण्यासारखं दुसरं कोणतंच सुख नसतं. मात्र बाळासाठी प्रयत्न करताना संयम राखण्याची देखील तितकीच गरज असते. गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजण्यासाठी मासिक पाळी चुकल्यावर एक ते दोन आठवड्याचा काळ जावा लागतो. या काळात गर्भ तुमच्या गर्भाशयात रूजत असतो. अशावेळी फार घाई अथवा उताविळपणा मुळीच करू नये. शिवाय गर्भधारणा झाल्यावरही परक्या व्यक्तीला कमीत कमी तीन महिने ही गोडबातमी सांगू नये असं मानण्याची पद्धत आहे. त्यामुळे आधीच या गोष्टीचा खुलासा इतरांजवळ करू नये असं म्हणतात. मात्र काहिही असलं तरी प्रत्येक स्त्री ही याबाबत फार संवदेनशील असते. त्यामुळे आई होण्याची चाहुल तिला लगेच लागू शकते. यासाठीच घरच्या घरी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून तुम्हाला तुमची गर्भधारणा ओळखता येऊ शकते. 

Shutterstock

साखर अथवा मीठाचा वापर करा -

स्वयंपाक घरात वापरण्यात येणारी साखर  गर्भधारणा ओळखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका स्वच्छ भांड्यामध्ये साखर घ्या आणि त्यामध्ये सकाळी उठल्यावर लगेचच तुमच्या युरिनचे सॅंपल त्यात मिसळा. जर तुम्ही गरोदर असाल तर तुमच्या युरिनमध्ये HCG म्हणजेच human chorionic gonadotropin या हॉर्मोन्सचे प्रमाण असते. ज्यामुळे साखर विरघळू शकत नाही. जर साखर न विरघळता त्याचे घट्ट स्फटिकांमध्ये रूपांतर झाले तर तुम्ही गरोदर आहात. पण जर साखर विरघळली तर मात्र टेस्ट निगेटिव्ह आहे असं समजा. मीठाचा वापर करूनही तुम्ही  गरोदर आहात का हे ओळखू शकता. युरीन मिसळल्यावर तुम्ही गरोदर असाल तर मीठ फेसाळ आणि क्रीमप्रमाणे दिसू लागतं. मात्र जर तुम्ही गरोदर नसाल तर मीठात काहिही बदल होऊ शकत नाहीत. परिणाम काहिही आढळला तरी मेडिकल प्रेग्नन्सी टेस्ट जरूर करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. 

Shutterstock

साबणाचा वापर करून ओळखा गर्भधारणा -

गर्भधारणा ओळखण्यासाठी साबणाचा वापर करणं ही एक सोपी युक्ती आहे. यासाठी तुम्ही कोणताही साबण घेऊ शकता. यासाठी कोणताही विशिष्ठ साबण घेण्याची गरज नाही.  यासाठी एका स्वच्छ भांड्यांत साबण ठेवा आणि त्यावर सकाळचे युरीन सॅंपल टाका.  काही वेळाने साबणावर बुडबुडे येण्यास सुरूवात होईल. असं असेल तर तुम्ही गरोदर आहात हे ओळखा. मात्र जर गर्भधारणा झालेली नसेल तर साबणावर कोणताच परिणाम झालेला दिसणार नाही. 

Shutterstock

दंतमंजन अथवा टुथपेस्टचा करा असा वापर आणि ओळखा प्रेगंन्सी -

गर्भधारणा ओळखण्यासाठी टुथपेस्टचा वापर करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटेल पण याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. टुथपेस्ट यासाठी अगदी सहज आणि कुठेही उपलब्ध होणारं साधन आहे. तुम्ही घरी असा अथवा वेकेशनवर तुमच्याजवळ टुथपेस्ट असणारच. फक्त पांढऱ्या रंगाची टुथपेस्ट असेल याची काळजी घ्या. तुमचे युरीन सॅंपल मिसळल्यावर जर तुम्ही जर गरोदर असाल तर पांढऱ्या रंगाच्या टुथपेस्ट निळ्या रंगाची होईल. मात्र जर तुम्ही गरोदर नसाल तर ती टुथपेस्ट पांढऱ्याच रंगाची असेल. मात्र रिझल्ट काहिही असला तरी आठवड्यानंतर मेडिकल प्रेगंन्सी टेस्ट जरूर करा. 

Shutterstock

सूचना - घरी नैसर्गिक पद्धतीने प्रेगंन्सी टेस्ट केल्यावर परिणाम काहिही आला तरी एक ते दोन आठवड्यांनी पुन्हा मेडिकल प्रेगंन्सी टेस्ट करू शकता. शिवाय त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास मुळीच विसरू नका. त्याच प्रमाणे टेस्ट करताना स्वच्छ भांड्याचा वापर करा. शक्य असल्यास काच अथवा चिनीमातीचे भांडे वापरा. मेटल अथवा प्लास्टिकचे भांडे वापरू नका. नाहीतर तुम्हाला चुकीचा परिणाम मिळू शकतो. नेहमी सकाळी उठल्यावर लगेचच युरिन टेस्ट करा.  युरिन टेस्ट करण्यापूर्वी रात्री झोपताना भरपूर पाणी प्या. टेस्ट करताना स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घ्या. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत उपयुक्त आहे बायो ऑईल

गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट

प्रेगन्सी टेस्टबाबत या गोष्टी प्रत्येकीला माहीत असायलाच हव्या