केसांमध्ये येणारा घाम कमी करण्यासाठी सोपे उपाय

केसांमध्ये येणारा घाम कमी करण्यासाठी सोपे उपाय


घामामुळे तुमचे  केस सतत चिकट आणि तेलकट होतात. केसांना येणारा हा चिकटपणा केसांच्या मुळांमधून येणाऱ्या घामामुळे असतो. आपल्या त्वचेला अनेक रोमछिद्रे असतात. ज्यामधून सतत घाम पाझरत असतो. वास्तविक या घामावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. जेव्हा तुमच्या शरीरात उष्णता वाढते तेव्हा शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो. कधी कधी यामागचं कारण आरोग्य समस्या, अती श्रम, अती व्यायाम, हॉर्मोन्समध्ये होणारे बदल असू शकतो. वास्तविक शरीरातून घाम येणं ही एक चांगली गोष्ट असली तरी अती घामामुळे तुमचे केस मात्र चिकट आणि तेलकट होतात. यासाठी जाणून घ्या अशा तेलकट आणि चिकट केसांची काळजी कशी घ्यावी.

केसांमध्ये घाम का येतो -

तुमची जीवनशैली कशी आहे यावरून ठरतं की तुमच्या केसांमध्ये किती घाम निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा अती उष्णता आणि शारीरिक कष्ट हे त्यामागचे महत्त्वाचे कारण असू शकतं. कधी कधी अती उष्ण आणि दमट वातावरण राहण्यामुळे तुमच्या केसांमध्ये सतत चिकटपणा निर्माण होतो. यासाठीच तुमची जीवनशैली आणि तुम्ही राहत असलेले वातावरण याचा नीट विचार करून हेअरस्टाईल करा. ज्यामुळे केस जास्त चिकट होणार नाहीत. 

Shutterstock

केसांमध्ये घाम राहील्यामुळे काय दुष्परिणाम होतात -

 • सतत केसांमध्ये घाम आल्यास केस चिकट होतात ज्यामुळे तुमचा लुक खराब होतो.
 • केसांना येणाऱ्या घामामुळे केसांमधून घाणेरडा वास येऊ लागतो.
 • जर तुम्ही अशा चिकट आणि तेलकट केसांची व्यवस्थित निगा राखली नाही तर तुमच्या केसांमध्ये येणाऱ्या घामामुळे केसांमधील त्वचेची रोमछिद्रे ब्लॉक होतात. ज्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
 • तेलकट केसांमध्ये जीवजंतूंची वाढ लवकर होते.
 • तेलकट केसांवर कोणतीही हेअरस्टाईल करणं शक्य नसतं. 
 • तेलामुळे केसांची रोमछिद्रे ब्लॉक होतात. ज्यामुळे केसांच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम दिसू लागतो. केसांची मूळं कमकुवत होतात आणि केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात.

केसांमधील घाम कमी करण्यासाठी काही टिप्स -

 • उन्हाळ्यात घराबाहेर पडताना अथवा व्यायाम करताना केस मोकळे सोडू नका कारण अशामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात घाम येतो. 
 • व्यायाम केल्यावर अथवा गरम पाण्याने अंघोळ केल्यावर केसांमध्ये आलेला घाम ड्रायरने सुकवा.
 • जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दर दोन दिवसांनी केस स्वच्छ धुवा. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
 • उन्हाळ्यात सुती आणि आरामदायक कपडे झाला आणि  केसदेखील सतत कॅप, स्कार्फने झाकून ठेवू नका.
 • केस घट्ट बांधून ठेवू नका. कारण जर तुमचे केस दाट असतील आणि तुम्ही ते घट्ट बांधून ठेवले तर अशा केसांमध्ये लवकर घाम जमा होऊ शकतो. 
 • केसांना आठवड्यातून एकदा हेअर मसाज अथवा हेअर स्पा करा. ज्यामुळे तुमच्या केसांमधील त्वचेचं रक्ताभिसरण सुधारेल.
 • केस धुण्यासाठी योग्य प्रकारचा ( केमिकल विरहित) शॅंम्पू वापरा.  

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस