पाठदुखीवर करता येते व्यायामाने मात...कसे ते जाणून घ्या

पाठदुखीवर करता येते व्यायामाने मात...कसे ते जाणून घ्या

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःकडे सर्वात जास्त दुर्लक्ष होत असतं आणि त्यातही ऑफिसमध्ये सतत बसून  काम करत असल्याने सर्वात जास्त दुर्लक्ष होते ते म्हणजे पाठदुखीकडे. पाठदुखी ही अशी समस्या आहे जी एकदा सुरू झाली की त्यावर उपाय करणं अत्यंत कठीण होतं. पण पाठदुखीवरही मात करता येते.  त्यासाठी तुम्ही नित्यनियमित व्यायाम करायला हवा. पण नेमका काय व्यायाम करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणता व्यायाम करायचा याची माहिती देणार आहोत. तसा तर प्रत्येक आजार हा बेजार करत असतो. पण पाठदुखीचा आजार जडला तर माणूस अधिक बेजार होतो. ज्यांना ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ बसून काम करावं लागतं त्यांना तर हा आजार हमखास होतो. पण पाठदुखी चालू झाल्यावर तुम्ही जास्त काळजी घ्यायला हवी. याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही वेळच्या वेळी यावर उपचार करणं हेच योग्य आहे. त्याआधी जाणून घेऊया पाठदुखी नक्की का होते? 

नियमित व्यायाम केल्याने होतील हे '10' आश्चर्यकारक फायदे

पाठदुखी निर्माण होण्याचं कारण

Shutterstock

खरं तर पाठदुखी निर्माण होत असते ती व्यायाम न करण्यामुळे. तुम्हाला जर रोजच्या व्यायामाची सवय नसेल तसंच तुम्ही रोज तासन् तास जागेवर बसून मध्ये न उठता काम करत असाल, शरीराची हालचाल कमी करत असाल, तुमची बसण्याची पद्धत योग्य नसेल, कोणत्याही प्रकारची जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलत असल्यास, प्रवास करताना गाडीमध्ये चुकीच्या पद्धतीने बसत असल्यास पाठदुखीचा त्रास सुरू होतो. पण हा त्रास सुरू झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणं हे तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरू शकतं. कारण असं केल्यास,  तुम्हाला हे दुखणं कायमचं झेलावं लागतं. पाठदुखीचा आजार हा अत्यंत बेजार करून सोडणारा आजार आहे. एकदा हा आजार सुरू झाला की त्यावर नियंत्रण आणणे डोकेदुखीचं ठरतं. पण हा आजार नित्यनियमित व्यायाम केल्याने बरा होऊ शकतो असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे तुम्ही पाठीचे व्यायाम करायला हवेत. 

तुम्हाला पोटावर झोपायची सवय असल्यास, त्वरीत बदला ही सवय

कोणते व्यायाम ठरतील फायदेशीर

Shutterstock

आपल्या पाठदुखीवर कोणते व्यायाम फायदेशीर ठरतील हे सर्वात पहिले आपण डॉक्टरांना आणि आपल्या जिम इन्स्ट्रक्चरला विचारून घेणं सोयीस्कर ठरेल. पण साधारणतः तुम्ही घरी व्यायाम करणार असाल तर सिटअप्स, पाय पसरवून करण्याचे व्यायाम,  टो - टचेस, तसंच दूरवर जॉगिंग करायला जाणं हे व्यायाम करणं तुम्हाला सोयीस्कर आणि फायदेशीर ठरू शकतं. पण कोणतेही व्यायामाचे प्रकार करणं हे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. तुम्हाला योगादेखील यासाठी उपयोगी ठरू शकतं. शरीर सुदृढ करण्यासाठी आणि रक्ताभिसरण योग्य ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि योगाचा उपयोग करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही कंबर आणि हृदयाशी संबंधित असलेले व्यायाम केल्यास, तुमची पाठदुखी कमी होण्यास मदत मिळते. तसंच रोज चालण्याचा व्यायाम हा यावर रामबाण इलाज आहे. त्याशिवाय पोहणं हा व्यायामही चांगला आहे. एरोबिक करण्यानेही तुमची पाठदुखील नियंत्रणात येऊ शकते. पण हे सर्व करत असताना तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे यापैकी कोणतेही व्यायाम करण्याआधी तुम्ही डॉक्टर अथवा तज्ज्ञांचा सल्ला हा घ्यायलाच हवा. 

एकाच ठिकाणी बसून काम करणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.