आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची. पण चेहऱ्याप्रमाणेच आपल्या शरीराचे इतरही भाग महत्त्वाचे आहेत आणि त्यावरदेखील काळेपणा येऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आहेच. त्यापैकी महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मान. महत्त्वाचं म्हणजे मानेची त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते त्यावर सर्वात जास्त ऊन आणि प्रदूषणाचा प्रभाव असतो. चेहरा आपण दिवसातून किमान दोन ते तीन वेळा धुतो पण मान इतक्या वेळा धुणं शक्य नसते. त्यामुळे मानेवरील काळे डाग वाढत जातात. अशा वेळी काळी मान गोरी करण्यासाठी उपाय आपण शोधतो. मानेवर काळे डाग येणे हे काही नवीन नाहीत. त्याशिवाय मानेवरील काळे डाग जाण्यासाठी उपाय आपण घरच्या घरीही करू शकतो. मानेचा काळेपणा घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही सोपे घरगुती आणि सोपे उपाय सांगणार आहोत. घरच्या घरी उपाय करून मानेवरील काळेपणा आपण सहजपणे दूर करू शकतो. चेहरा व्यवस्थित असला आणि मान काळी दिसली तर दिसायला हे अतिशय वाईट दिसतं. त्यामुळे चेहऱ्याचा आणि मानेचा रंग एकसारखा राहावा यासाठी नक्की काय सोपे उपाय करता येतील ते आपण पाहूया.
मान काळी असली तर त्यावर नक्की काय उपाय करायचे आणि कशा स्वरूपात करायचे ते आपण पाहूया. मानेवरील काळे डाग जाण्यासाठी उपाय असून त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. मान काळी उपाय अनेक आहेत पण त्याचा वापर कसा करायचा हेदेखील महत्त्वाचे आहे. त्याच्या काही स्टेप्स आणि सहजसोप्या पद्धती आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
पपई हे आपल्या त्वचेसाठी एक रामबाण इलाज आहे हे तर सर्वज्ञात आहे. मानेवरील काळे डाग घालवायचे असतील तर तुम्ही पपईचा वापर नक्कीच करू शकता. पपईममध्ये त्वचेवर उजळपणा आणणारे गुण असतात.
कसे वापरावे:
आठवड्यातून तुम्ही दोन वेळा असं केलंत तर तुमच्या मानेवरील काळेपणा निघून जाण्यासाठी मदत होईल.
वाचा - सी सॉल्ट स्क्रबचे फायदे
उन्हातून बाहेर जात असताना आपण नेहमीच हाताला आणि चेहऱ्याला सनस्क्रिन लावतो. पण त्याचबरोबर याचा वापर तुम्ही मानेवरही करणे गरजेचे आहे. शरीराच्या प्रत्येक उघड्या अंगाला उन्हातून बाहेर निघताना तुम्ही सनस्क्रिन लावायला हवं. विशेषतः मानेला. कारण ऊन्हाचा सर्वात जास्त परिणाम हा मानेवर होत असतो. मान हा आपल्या शरीराचा सर्वात मऊ आणि मुलायम भाग असतो. त्याशिवाय सनस्क्रिन लावण्याची एक पद्धत आहे.
कसे वापरावे - घराबाहेर पडण्याआधी तुम्ही साधारण 20 मिनिट्स आधी सनस्क्रिन आपल्या चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्या.
काळेपणा जसा चेहऱ्यावर दिसतो तसाच मानेवरील काळे डागही लपून राहात नाहीत. यासाठी तुम्ही दैनंदिन जीवनातील ओटमीलचा स्क्रब म्हणून वापर करू शकता.
कसे वापरावे:
आठवड्यातून तुम्ही हे दोन वेळा केल्यास, तुम्हाला तुमच्या काळ्या मानेवर फरक दिसून येईल.
पॅची आणि पिगमेंटेशन असलेली त्वचा असेल तर त्यावर बेकिंग सोडा हा रामबाण इलाज आहे. पण याचा जास्त प्रमाणात वापर करू नये.
लिंबामध्ये विटामिन सी चा अधिक समावेश असतो जो त्वचेला उजळपणा देण्यासाठी फायदेशीर ठरतो. तर मधानेही त्वचा अधिक उजळण्यास मदत होते. त्यामुळे याचे मिश्रण तुमच्या मानेच्या त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
कसे वापरावे:
लिंंबू हे त्वचेसाठी उत्तम आहे. याबरोबर काही मिक्स करा अथवा करू नका याचा मानेचे काळे डाग घालवण्यासाठी खूपच चांगला फायदा तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही मानेवर लिंबू घासूनही त्यावरील डाग काढू शकता. लिंबामध्ये असणारे सायट्रिक अॅसिड हे काळे डाग घालवण्यासाठी उपयुक्त ठरते.
कसे वापरावे:
मुलतानी मातीचे महत्त्व तर अनादी काळापासून आहे हे आपल्याला माहीत आहे. केवळ चेहऱ्यासाठी नाही तर आपल्या मानेसाठीही याचा फायदा होतो. मुलतानी मातीचे गुण मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी मदत करतात.
कसे वापरावे:
आठवड्यातून असे दोन वेळा केल्यास, मानेवरील काळे डाग कमी होऊन योग्य परिणाम दिसू लागेल.
गुलाबपाणी हे आपल्या त्वचेसाठी उत्तम समजण्यात येते. त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी त्वचेला तकाकी देण्याचे काम गुलाबपाणी करते.
कसे वापरावे:
आठवड्याभरात मानेवरील काळे डाग गायब होतील. तुम्ही आठवडाभर रोज हा प्रयोग करून पाहा.
टॉमेटोमधील आंबटपणा मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तुम्हाला त्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत.
कसे वापरावे:
आठवड्याभरात मानेवरील काळे डाग गायब होतील. तुम्ही आठवडाभर रोज हा प्रयोग करून पाहा.
हळद ही अँटिसेप्टिक असते आणि यामुळे चेहऱ्यावर उजळपणा येतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण याचा उपयोग तुम्ही काळ्या मानेसाठीही करू शकता. लिंबू आणि हळद हे मिश्रण यावर रामबाण इलाज आहे.
कसे वापरावे:
बेसन हे नेहमीच त्वचेला चकाकी आणून देते. आपल्याला याबद्दल माहीत आहे. चेहऱ्याला तुकतुकीतपणा आणून देण्यासाठी बेसन आणि दह्याचा वापर करण्यात येतो. त्यातप्रमाणे मानेवरील काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
कसे वापरावे:
ग्लिसरीनचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा तुमची त्वचा अधिक उजळवण्यासाठी तुम्हाला करता येतो. पण यासह इतरही काही गोष्टी त्यामध्ये मिक्स कराव्या लागतात. घरगुती उपाय करताना तुम्ही ग्लिसरीनचा उपयोग करून घेऊ शकता.
कसे वापरावे:
1. मान काळी पडण्याची काय कारणे आहेत?
अनेक वेळा केवळ चेहरा आणि शरीराच्या इतर भागांकडे लक्ष दिले जाते आणि मानेकडे दुर्लक्ष होते. उन्हाने अथवा खोटे दागिने घातल्यानेही मान काळी पडते. पण अशावेळी लगेच लक्ष देऊन मान काळी पडल्यास उपाय करायला हवेत.
2. काळी मान होणे हे डायबिटीसचे (मधुमेह) लक्षण आहे का?
घरगुती उपाय केल्यानंतरही तुमच्या मानेवरील काळा डाग निसत नसेल अथवा मान तशीच काळी राहात असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना दाखवायला हवे. कारण मानेवर काळे डाग येणे हे मधुमेहाचे अर्थात डायबिटीसचे लक्षण आहे. सर्वात पहिले मान काळी पडू लागते. त्यामुळे रक्ताची चाचणीदेखील वेळीच करून घ्या.
3. मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय परिणामकारक आहेत का?
हो मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी तुम्हाला अनेक घरगुती उपाय करता येतात. वर दिलेले सर्व उपाय तुमच्या मानेवरील काळे डाग काढण्यासाठी उपयुक्त अर्थात परिणामकारक आहेत.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.