दही भात खाणं नेहमीच फायद्याचं ठरतं. महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांमध्ये स्वयंपाकात दही भात हमखास केला जातो. एकतर दही भात करणे फार सोपे असल्यामुळे तो घाईच्या वेळी पटकन करता येतो. शिवाय दही भातामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून तुमचं रक्षण होतं. तुमचं पोट बिघडलं असेल, अती जुलाब होत असतील, अंगामध्ये उष्णता वाढली असेल, अचपनाचा त्रास होत असेल अशा वेळी हा साधा दही भात खाणं नेहमीच चांगलं ठरतं. यासाठीच जाणून घ्या दही भात खाण्याचे फायदे
Shutterstock
पचनशक्ती सुधारते –
पोट बिघडलं असल्यावर अथवा अतीसाराच्या समस्येवर एक उत्तम उपाय म्हणजे दहीभात खाणे. कारण अशा वेळी तुम्ही अती तिखट अथवा तेलकट पदार्थ खाऊ शकत नाही. मात्र साधा दही भात खाण्यामुळे तुमचे पोट पुन्हा पूर्ववत होते. कारण दही आणि भात हे दोन्ही पदार्थ पचायला हलके आहे. शिवाय दह्यामध्ये प्रोबायोटीक असतात ज्यामुळे तुमच्या आतड्यामधील अपचनाची समस्या दूर होऊ शकते. बद्धकोष्ठता, पोटदुखीवर दही भात खाणं नक्कीच फायद्याचं ठरतं.
शरीराला थंडावा मिळतो –
दही खाण्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असतो अथवा वातावरणातील उष्णता वाढलेली असते. अशावेळी आहारात दहीभाताचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा वाढतो.
Shutterstock
ताण-तणाव कमी होतो –
दह्यामध्ये प्रोबायोटीक्स, अॅंटि ऑक्सिडंट आणि चांगले फॅट्स असतात. दही भात खाण्यामुळे मेंदूला वेदना आणि त्रासदायक भावना सहन करणे सहज शक्य होते. यासाठी ताणतणावात असताना दही भात खाल्यास तुम्हाला बरे वाटते. सहाजिकच दहीभात हा फक्त उत्तम खाद्यपदार्थच नाही तर तुमच्या ताणतणावाला कमी करणारं उत्तम औषधही आहे.
वजन कमी होते –
एक वाटी दही भातामुळे तुमचे पूर्ण पोट लगेच भरते. ज्यामुळे दही भात खाल्यावर तुम्हाला वारंवार भुक लागत नाही. दही आणि भातामध्ये कमी कॅलरिज असल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी आहारात दही भाताचा समावेश जरूर करा.
Shutterstock
रोगप्रतिकारशक्ती वाढते –
आजारापणात दहीभात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण दहीभातामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढते. दह्यामध्ये असलेले अॅंटि ऑक्सिडंट तुम्हाला इनफेक्शनला रोखण्याची शक्ती देतात. शिवाय दह्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशी ऊर्जादेखील निर्माण होते.
दहीभाताची झटपट रेसिपी
साहित्य – अर्धा कप घट्ट दही, एक वाटी तांदूळ, एक चमचा तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, चार ते पाच कडीपत्त्याची पाने, उदडाची डाळ, सुखी लाल मिरची, कोथिंबिर आणि चवीपुरते मीठ
कृती – भात शिजवून घ्या आणि त्यात दही मिसळून दहीभाताचे एकत्र मिश्रण करा. फोडणीच्या भांड्यात तेल गरम करा आणि त्यात कडीपत्ता, जिरे, मिरची, उडदाची डाळ, मोहरीची फोडणी तयार करा. भाताला वरून फोडणी द्या. मीठ घालून चांगल्या पद्धतीने भातात फोडणी मिक्स करा. कोथिंबीरीने वरून सजवा. दही भात खाण्यासाठी तयार आहे.
फोटोसौजन्य- शटरस्टॉक
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
घट्ट दही तयार करण्याची घरगुती पद्धत ( How To Make Curd At Home In Marathi)
बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे( Benefits of eating Rice in Marathi)
दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असेल… तर तुम्ही राहाल निरोगी