ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

प्रत्येक स्त्रीचं आई होणं हे स्वप्न असतं. मात्र त्यासाठी गरोदरपणाचा काळ घालवणं कधी कधी कठीण होतं. कारण गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात आणि मानसिक स्थितीत अनेक बदल होतात. या बदलांना सामोरं जाण्याची बऱ्याच महिलांची तयारी नसते. गरोदरपणात प्रत्येक महिलेमध्ये होणारे बदल हे निरनिराळे असू शकतात. वारंवार मळमळणं, उलटी, चक्कर येणं अशा लक्षणांसोबतच वजन वाढणं, त्वचेचा पोत बदलणं, हाता-पायांना सूज येणं असे अनेक बदल तिच्या मध्ये होत असतात. काही जणींचे गरोदरपणात मोठ्या प्रमाणावर केस गळतात. स्त्रीच्या सौंदर्यांत केस नेहमीच अधिक भर घालतात. म्हणूनच महिलांना गरोदरपणात केस गळायला लागले की थोडी भीती वाटायला लागते. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणात केस गळण्यामागची काही कारणं 

shutterstock

प्रेग्ननंसीमध्ये केस का गळतात –

प्रत्येक महिलेला लांबसडक आणि काळेभोर केस हवे असतात. यासाठी महिला नेहमीच स्वतःच्या केसांबाबत जागरूक असतात. मात्र गरोदरपणात तुमचे घनदाट केस आपोआप गळू लागतात. गरोदरपणाचा काळ हा नऊ महिन्यांचा असतो. या काळात हळूहळू गळायला लागलेल्या केसांमुळे आपल्याला टक्कल तर पडणार नाही अशी भीती त्यांना वाटू लागते. मात्र यामागचं कारण त्यांना माहीत नसतं. गरोदरपणात महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होत असतात. ज्यामुळे त्यांच्या केसांची मुळं कोरडी होतात आणि केसांवर याचा परिणाम होतो. बऱ्याचदा हा त्रास महिलांना त्यांच्या तिसऱ्या तिमाहीत जाणवतो. कारण या काळात जर गरोदर महिलेच्या शरीरात काही हॉर्मोनल असतुंलन निर्माण झाले तरच त्यांचे केस गळतात. मात्र जर गरोदरपणात तुमची शारीरिक स्थिती मजबूत असेल तर तुम्हाला केस गळण्याचा त्रास कमी जाणवतो. 

ADVERTISEMENT

गर्भाचे वजन वाढण्यासाठी पोषक आहार (Food To Increase Fetal Weight During Pregnancy)

गरोदरपणातील गळणारे केसांची समस्या रोखण्यासाठी करा उपाय –

गरोदरपणात गळणारे केस रोखणं नक्कीच शक्य आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही केमिकल असलेले प्रोडक्ट मुळीच वापरू नका. काही घरगूती उपाय करून तुम्ही तुमचे केस नक्कीच वाढवू शकता. 

लिंबाचा रस –

केस गळण्याची समस्या रोखण्यासाठी तुम्ही हा घरगूती उपाय करू शकता. एक अंडे घ्या ते चांगले फेटून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका. मिश्रण चांगले एकजीव करा. हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना लावा आणि तीस मिनीटांनी केस धुवून टाका. केसांना शॅंपू लावून तुम्ही केस धुवू शकता. कारण यामुळे तुमच्या केसांना अंड्याचा वास येणार नाही. लिंबात व्हिटॅमन्स आणि अंड्यात प्रोटिन्स असल्यामुळे तुमचे केस मजबूत होतात. 

ADVERTISEMENT

shutterstock

नारळाच्या तेलाने केसांना मसाज करा –

केसांसाठी नारळाचे तेलाचा मसाज नेहमीच उत्तम असते. त्यामुळे जर गरोदरपणात तुमचे केस गळत असतील तर केसांना नारळाच्या तेलाने मसाज करणं तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण यामुळे तुमच्या केसांची पुन्हा नैसर्गिक पद्धतीने वाढ होईल. मात्र मसाज करताना तेल थोडं कोमट जरूर करा. 

कोरफडाचा गर –

कोरफड हे निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. तुमच्या त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही कोरफडाचा वापर अगदी बिनधास्त करू शकता. कारण याचा कोणताच दुष्पपरिणाम तुमच्या अथवा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होत नाही. यासाठी  कोरफडाचा गर काढून घ्या आणि केसांच्या मुळांना तो लावा. दहा ते पंधरा मिनीटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’

ADVERTISEMENT

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

गरोदरपणातही करा ही सोपी योगासने

 

 

ADVERTISEMENT
03 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT