बाळाला काळा धागा बांधणं ठरू शकतं, बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक

बाळाला काळा धागा बांधणं ठरू शकतं, बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक

जर तुम्हाला वाटतं की, तुमच्या बाळाकडे लोकांचं जास्त लक्ष वेधल्याने त्याला वाईट नजर लागेल. तर बरेचदा बाळाच्या गळ्यात किंवा हाताला काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हणतात की, यामुळे बाळाचं वाईट नजरेपासून संरक्षण होतं.

काळा धागा बांधल्याने बाळाला होऊ शकतात हे अपाय

  • काळा धागा बांधणं हा खरोखरच योग्य उपाय आहे का, तर नाही. कारण धागा बांधल्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता वाढते. बाळाला कपडे घालताना किंवा काढताना हा धागा खेचला जाऊ शकतो. कदाचित हा धागा चोखल्यामुळे बाळाला इंफेक्शन होऊ शकतं. कारण हा धागा बाळाच्या हातात 24 तास असतो. त्यामुळे तो कितपत स्वच्छ असेल याबाबत शंकाच असते. 
  • जर तुम्ही धागा खेचला जाऊ नये किंवा बाळाला चोखता येऊ नये म्हणून जास्त घट्ट बांधलात तर बाळाला जळजळ किंवा त्याचं रक्त साकळू शकतं. सुरूवातीला धागा भलेही घट्ट वाटणार नाही पण जसंजसं बाळाचं वजन वाढेल तसं तो धागा घट्ट होईल. तसंच जेव्हा तो धागा ओला होईल, बाळाच्या आंघोळीदरम्यान किंवा घामाने तेव्हा बाळाला त्वचेचं इंफेक्शन होण्याचीही भीती असते. 

काळा धागा बांधण्याच्या प्रचलित प्रथेचं काय

बाळाला काळा धागा बांधण्याची परंपरा आपल्याकडे खूपच प्रचलित आहे. जर तुम्हालाही याच पालन करायचं असेल. तर आम्ही सल्ला देऊ की, काळा धागा हातावर किंवा मानेजवळ बांधण्याऐवजी तो टाचेजवळ म्हणजे पैंजणासारखा बांधावा. असं केल्याने बाळाला तो तोंडातही घालता येणार नाही आणि खेचलाही जाणार नाही. तसंच पायाजवळ बांधला असल्याने जखम होण्याचीही शक्यता नाही.

काळ्या धाग्याला पर्याय

  • सुती काळ्या धाग्याऐवजी तुम्ही पर्यायी प्लास्टिकच्या बाळांसाठी मिळणाऱ्या काळा बांगड्या ज्या तुटत नाहीत. त्या वापरू शकता. पण हे निश्चित करा की, बांगड्यांचं प्लास्टिक हे चांगल्या गुणवत्तेच असेल. कारण जर बांगडी बाळाने तोंडात घातली तर त्यानेही अपाय होऊ शकतो. 
  • दुसऱ्या पर्याय म्हणजे बाजारात मिळणारं काळ्या मनुकांचं ब्रेसलेटही मिळतं. जे धाग्यांपेक्षा सुरक्षित मानलं जातं किंवा याऐवजी तुम्ही चांदीचे वाळेही घालू शकता. कारण चांदीही कोणत्याही प्रकारे अपायकारक नाही. 
  • बाळाच्या कपाळावर किंवा तळव्याला काळी तीट लावणं हासुद्धा वाईट नजरेपासून वाचवण्याचं अजून चांगला उपाय आहे. फक्त काळजी घ्या की, जे काजळ तुम्ही वापराल ते त्याने बाळाच्या त्वचेला कोणताही अपाय होणार नाही. तसंच बाळांच्या डोळ्यालाही काजळ लावू नये. कारण ते सुरक्षित नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.