ADVERTISEMENT
home / Shoes
बेस्ट कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स – Kolhapuri Chappal Designs

बेस्ट कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स – Kolhapuri Chappal Designs

कोणताही पारंपारिक समारंभ म्हणा किंवा सण म्हटलं की, कोल्हापुरी चप्पल हमखास आणि आवडीने घातली जाते. प्रत्येकाच्या फूटवेअरमध्ये एक तरी कोल्हापुरी चप्पल असतेच. पण आता कोल्हापुरी चप्पल ठराविक डिझाईन्सपुरती मर्यादित राहिली नसून त्यात अनेक हटके आणि सुंदर डिझाईन्स आल्या आहेत. त्यातीलच काही निवडक डिझाईन्स POPxoMarathi घेऊन आलं आहे तुमच्यासाठी ज्यामध्ये अगदी बेसिक कोल्हापुरी चप्पलपासून डिझायनर आणि वेडिंग वेअर कोल्हापुरीचाही समावेश आहे. पाहा ही वेगळी आणि हटके कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स.

बेसिक एक अंगठ्याची कोल्हापुरी

कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स मधील हे अगदी बेसिक डिझाईन आहे. पण या डिझाईनला नेहमी मागणी असते. तसं तर कोल्हापुरी चप्पल तुम्हाला अगदी सहज आणि कुठेही मिळते. पण या चप्पलची खासियत म्हणजे ही हँडमेड आहे. या चप्पलचं डिझाईन हे तुमच्या कोणत्याही फंक्शनसाठी सूटेबल असून ते सर्व आऊटफिट्सवर छान दिसेल.

पॉम पॉम ब्रेडेड ग्रीन कोल्हापुरी स्लाईडर

तुम्हाला जर कोल्हापुरीतील त्याच त्याच रंगांचा कंटाळा आला असेल तर हे कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स तुमच्यासाठी आहे. नेहमीच्या कोल्हापुरी चपलांपेक्षा हे डिझाईन अगदीच हटके आहे. याला पॉम पॉम लावून ट्वीस्ट देण्यात आलं आहे. तसंच याचा रंगही ऐरवी मिळणाऱ्या कोल्हापुरीपेक्षा वेगळा आहे. ही चप्पल पीयू (PU) मटेरिअलची असून याचा टीपाआर सोल (TPR sole) आहे आणि ही चप्पल हाताने शिवलेली आहे. कोणत्याही जीन्स किंवा अगदी वनपीसवरसुद्धा ही चप्पल तुम्ही पेअरअप करू शकता.

लाईम ग्रीन कोल्हापुरी

ही कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स पेक्षा हटके आहे ती यावरील कमळाच्या पॅचमुळे. ही डिझाईनर कोल्हापुरी वजनाला अगदी हलकी असून कोणत्याही फंक्शनला किंवा कॅज्युअल वेअर म्हणूनही तुम्ही घालू शकता. ही कोल्हापुरी फॉक्स लेदरपासून बनवण्यात आली आहे. त्यामुळे ती पायाला लागण्याचीही भीती नाही.

ADVERTISEMENT

कोल्हापुरी स्लीप ऑन्स

ही कोल्हापुरी चप्पल किंवा स्लीप ऑनसुद्धा कॅज्युअल वेअर म्हणून बेस्ट आहे. अगदी कुठेही बाहेर जाताना किंवा कॉलेजसाठी ही बेस्ट आहे. ही कोल्हापुरी चप्पल हँडमेड आहे. ही ओरिजिनल लेदरपासून बनवलेली असून यामध्ये तीन रंग आहेत (Red / Yellow / Original Leather Color). ही चप्पल लेदरची असल्याने पहिल्या वापरात लागू शकते त्यामुळे शक्यतो आधी या चप्पलला तेल लावून ठेवावे आणि मग वापरा.

रेड घुंगरू कोल्हापुरी

कोणत्याही फंक्शनला जाताना पायात पैंजण घालण्याऐवजी तुम्हाला ही चप्पल घालता येईल. ही आहे घुंगरू लावलेली ट्रेडिशनल लुक कोल्हापुरी. ही डिझाईनर कोल्हापुरी डिझाईन केली आहे प्रीत कौर यांनी. ही वेलव्हेट आणि घुंगरू लावलेली कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स तुमच्या वेडिंग किंवा पार्टी लुकला नक्कीच अजून छान करेल. यात शंका नाही.

इथनिक लेडीज कोल्हापुरी

कुर्ती किंवा पंजाबी ड्रेसवर घालण्यासाठी हे कोल्हापुरी चप्पल अंगठा आणि हिल्स असलेलं डिझाईन बेस्ट आहे. ही वजनाला हलकी असून याच्या सोलमुळे ती घसरत नाही. तसंच याला हिल्स असल्यामुळे चालतानाही एक एलिगन्स येईल. क्वचितच कोल्हापुरी चपलांमध्ये हिल्सचा पर्याय मिळतो. त्यामुळे तुम्हालाही हिल्सच्या चपला आवडत असतील तर हे डिझाईन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

हँडक्राफ्टेड प्युअर लेदर सिल्व्हर कोल्हापुरी

ही कोल्हापुरी तुमच्या लुकमध्ये अॅड करेल ब्लिंग फॅक्टर. कोणत्याही फंक्शन किंवा कॅज्युअल आऊटिंगसाठी ही कोल्हापुरी बेस्ट आहे. ही प्युअर लेदर कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स असून त्याला सिल्व्हर रंगामुळे अगदी हटके लुक आला आहे. फक्त अशी कोल्हापुरी चप्पल घातल्यास ती पाण्यात वापरता कामा नये.

ADVERTISEMENT

रेग्युलर कोल्हापुरी लेडीज चप्पल

हे डिझाईन नेहमीच्या डिझाईनपेक्षा थोडं हटके असूनही बेसिक प्रकारात मोडतं ते याच्या रंग आणि स्टिचिंग पॅटर्नमुळे. तुमच्याकडे जर नेहमीचं कोल्हापुरी अंगठावालं डिझाईन असल्यास हे थोडं हटके डिझाईन घ्यायला काहीच हरकत नाही.

टो-रिंग कोल्हापुरी चप्पल्स

हे कोल्हापुरी डिझाईन नेहमीसारखी असलं तरी त्याला आलेला लुक मात्र वेगळा आहे तो त्याच्यावरील शिवण कामामुळे. तसंच याला थोड्या हिल्स असल्याने अगदी फ्लॅट चपला न आवडणाऱ्यांसाठी हे डिझाईन परफेक्ट आहे. याचा सोल टीपीआर (TPR sole) आहे. ही चप्पल वापरताना घ्यायची काळजी म्हणजे ही चप्पल नेहमी कोरड्या कपड्यानेच पुसावी.

ब्लिंगी गोल्ड हँड एम्ब्रॉयर्ड कोल्हापुरी वेजेस

तुमच्या दी डे म्हणजेच लग्नासाठीही तुम्हाला कोल्हापुरीच हवी असेल तर हे कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स अगदी परफेक्ट आहे. लग्नाच्या नऊवारी लुक आणि रिसेप्शन लुकला ही कोल्हापुरी अगदी छान दिसेल. ही डिझाईनर कोल्हापुरी चामड्याची नाही. तसंच लग्नाच्या साडीत तुमची उंची उठून दिसण्यासाठी याला आहे 4.5 इंचाचे हिल्स आणि कुशन्स सोल. कुशन्स सोल असल्याने तुम्ही कितीही वेळ उभं राहिलात तरी पाय दुखणार नाहीत. ही चप्पल हँडक्राफ्टेड असून डिझाईनर आणि ट्रेडीशनलचं उत्तम कॉम्बो आहे.

डिओरा नाईट ब्लॉसम कोल्हापुरी फ्लॅट्स

जीव्हानाने कोल्हापुरीमध्ये अनेक डिझाईनर चपला आणल्या आहेत. त्यापैकीच ही एक काळ्या रंगाची कोल्हापुरी चप्पल. फुलांचा बहर ही थीम डोळ्यांसमोर ठेवून ही चप्पल डिझाईन करण्यात आली आहे. याचं मटेरिअल फॉक्स लेदर असून ते मऊ आहे. त्यामुळे तुम्हाला चालताना ही चप्पल अजिबात लागणार नाही. फक्त ही चप्पल पाण्याच्या संपर्कात येता कामा नये.

ADVERTISEMENT

ब्लॅक आणि पिंक टू टोन कोल्हापुरीज

नेहमीच्या कोल्हापुरीला ट्वीस्ट देऊन बनवण्यात आलेलं हे अजून एक डिझाईन. ज्यामध्ये टू टोन म्हणजे दोन रंगात कोल्हापुरी चप्पल डिझाईन करण्यात आली आहे. ही चप्पल चांगल्या प्रतीच्या चामड्यांपासून बनवण्यात आली असून त्याचा सोल रबरचा आहे. तुम्हीही चप्पल कोणत्याही आऊटफिटसोबत पेअर अप करू शकता.

कोल्हापुरीबाबत विचारले जाणारे प्रश्न-उत्तरं – FAQs

कोल्हापुरी चप्पल कशापासून बनवलेली असते?

प्रसिद्ध कोल्हापुरी चपल म्हणजे पायताण हे कोल्हापुर आणि आसपासच्या गावात तिथल्या रहिवाश्यांकडून बनवल्या जातात. या चपला मुख्यतः चामड्यांपासून बनवल्या जातात. ऐतिहासिक दस्तावेजांनुसार,  पहिल्या कोल्हापुरी चपलांचा उल्लेख हा 13 व्या शतकातला आहे.  

कोल्हापुरी जगभरात एवढ्या प्रसिद्ध का आहेत?

ADVERTISEMENT

खरंच आज जगभरात कोल्हापुरी चपला प्रसिद्ध आहेत. एक अंगठा किंवा टी स्ट्रॅप सँडल अशा विविध डिझाईन्समध्ये आज कोल्हापुरी चपला उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या सर्व वयोगटात पसंत केल्या जातात. तसंच त्या वापरायलाही अगदी सोयीच्या असतात. 

कोल्हापुरी चपलांच्या किमती साधारण कितीपासून आहेत?

तुम्ही जर खऱ्या चामड्याच्या कोल्हापुरी चपला घेतल्या तर त्या साधारण 500 रूपयांपासून सुरू होतात. पण आजकाल खऱ्या चामड्याच्या वापर न केलेल्या कोल्हापुरी चपला या अगदी 150 रूपयांपासून मिळतात.  

कोल्हापुरी चपलांची निगा कशी राखावी?

ADVERTISEMENT

बरेचदा खऱ्या चामड्याच्या कोल्हापुरी चपलांना बराच काळ न वापरल्यास बुरशी येते. तसंच पहिल्यांदा वापरताना या चपला पायाला लागू शकतात. त्यामुळे त्या मऊ करण्यासाठी आणि त्यांना बुरशी येऊ नये म्हणून तुम्ही चपला वापरात नसताना नारळाचं किंवा एरंडेल तेल लावून ठेवू शकता. पण लक्षात घ्या हातावर थोडंसं तेल घेऊन ते चपलांना लावा. अगदी ब्रशने तेल चपलांना जास्त प्रमाणात लावू नये.

हेही वाचा – 

नववधूसाठी परफेक्ट आहेत हे स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’

पायाचं दुखणं आणि त्यावरील घरगुती उपाय

ADVERTISEMENT

वेदनादायी शू बाईटवर ’15’ घरगुती उपाय आणि इतर टीप्स

कुलाबा कॉसवेवर गेलात तर हमखास करा या वस्तूंची खरेदी

हाय हिल्स घालून होतं शरीराचं नुकसान, कसं ते जाणून घ्या

25 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT