केस हा आपला सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय. केसांची गळती, फ्रिजी होणं, कोरडे होणं, तेलकट दिसणं, कोंडा होणं यासारख्या समस्यांना सर्वांनाच सामोरं जावं लागतं. याची कारणं अनेक असतात. पण यामुळे अधिक ताण येतो. पण तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्याच्या उजळपणापासून ते त्वचेच्या अनेक समस्या सोडविणारी मुलतानी माती आपल्या केसांना अधिक घनदाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. याचे घरच्या घरी हेअरपॅक बनवून तुम्ही केसांच्या समस्या सोडवू शकता. मुलतानी मिट्टीचा वापर कसा करायचा हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण कोणतेही हेअरपॅक तयार करताना कोणत्या गोष्टीचा किती वापर करायचा हेदेखील महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्या गोष्टीमध्ये मुलतानी माती घालून त्याचा केसांसाठी वापर कसा करायचा आणि केसांच्या कोणत्या समस्येवर मुलतानी माती कशी वापरायची याची इत्यंभूत माहिती.
केसगळतीसाठी आपण अनेक उपाय करून बघतो. मुलतानी मातीचा वापरही आपण करू शकतो. त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे मुलतानी माती घाला. त्यात 1 चमचा दही मिसळा आणि 1 टी स्पून काळी मिरी पावडर मिक्स करा. पाणी घालून याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या. ब्रश अथवा हाताच्या बोटांनी तुमच्या केसांच्या मुळापासून ही पेस्ट लावा आणि अर्धा तास तशीच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. हा हेअरपॅक तुम्ही आठवड्यातून एक वेळा वापरू शकता. याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल.
बऱ्याच जणांचे केस फ्रिजी असतात. अशावेळी तुम्ही 2 चमचे मुलतानी माती घ्या. त्यामध्ये एक अंडं आणि 1 चमचा दही मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा नारळाचं तेल मिसळा आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिसळून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट स्काल्पवर लावा आणि अर्ध्या तासाने साध्या अर्थात गार पाण्याने केस धुवा. अंड्याचा वास केसांमध्ये राहू नये यासाठी पाण्यात एक लिंबाचा रस पिळून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा आणि 5 मिनिट पाणी ओतल्यानंतर तसेच राहा. त्यानंतर पुन्हा आंघोळ करा.
तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट
कोरड्या केसांवर कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल केली तरी त्याचा लुक चांगला दिसत नाही. पण तुम्हाला जर तुमच्या कोरड्या केसांमध्ये चमक आणि नवी जान आणायची असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या आपल्या केसांमध्ये चमक आणू शकता. त्यासाठी तुम्ही 1 चमचा मुलतानी माती घ्या त्यात 1 चमचा तिळाचं तेल आणि एक चमचा दही मिसळा. हे नीट मिक्स करून ही पेस्ट स्काल्पवर लावून साधारण 20 मिनिट्स तशीच ठेवा. त्यानंतर केस नीट धुवा. हा हेअरपॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की ट्राय करा. त्यामुळे तुमचे केस नक्कीच मऊ मुलायम आणि चमकदार होतील.
तेलकट स्काल्पमुळे केस अधिक चिकट दिसतात. त्यावर अधिक प्रमाणात धूळ साचते. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी मुलतानी मातीचा पॅक नक्कीच उपयोगी ठरतो. 4 चमचे मुलातानी मातीमध्ये एका लिंबाचा रस पूर्ण पिळून घ्या. हे नीट मिक्स करा आणि केसांना लावून साधारण 20 मिनिट्स लावा. नंतर साध्या पाण्याने धुवा आणि नैसर्गिकरित्या केसांना सुकू द्या. तुमच्या केसातील तेलकटपणा आपोआप कमी होईल.
केसांना मजबूत आणि लांबसडक बनवायचे असेल तर तुम्हाला मुलतानी मातीचा वापर अधिक फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी तुम्ही मुलतानी मातीसह रिठा पावडर मिक्स करा. त्यात पाणी घालून त्याती व्यवस्थित पेस्ट करून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळापासून लावा. त्यानंतर अर्धा तास केस तसेच ठेवा. नंतर साध्या पाण्याने केस व्यवस्थित धुवा. हा हेअरपॅक तुम्ही आठवड्यातून किमान तीन वेळा लावा आणि मग त्याचा परिणाम पाहा. तुमची केसगळती थांबून तुमचे केस लांबसडक होण्यास याची नक्कीच मदत होते.
लांब घनदाट केस हवे असतील तर टाळा ‘या’ चुका
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.